संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
28-11-2024
महाराष्ट्र: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला यश संपादन करून देण्यात लाडकी बहिण योजना हा फॅक्टर गेमचेंजर ठरल्याचे दिसून आले आहे. महायुतीला प्रचंड असे यश मिळाले आहे.
निवडणूकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना लागू केली होती. त्यानुसार पात्र महिलांना महिना पंधराशे रूपये मिळाले होते. निवडणूकीपूर्वी राज्यातील महिलांना पाच हफ्ते मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी या योजनेमध्ये आता पंधराशे ऐवजी २१०० रूपये मिळणार असे आश्वासन दिले होते. मात्र आता शासनाने आता योजनेचे पूर्ण निकष लागू केले आहेत. त्यामुळे अपात्र महिलांना सहावा हफ्ता मिळणार नाही. लाडकी बहिण योजनेच्या पोर्टलवर एक कोटी बारा लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यातील एक कोटी सहा लाख महिला पात्र ठरल्या आहेत. ज्या महिला संजय गाधी निराधार योजनेचा लाभ मिळवत आहेत त्यांनीही या योजनेसाठीअर्ज दाखल केले होते.
मात्र तरीही काही महिलांनी अर्ज दाखल केले होते. आता त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. जाच्याकडे चारचाकी वाहन नोंद आहे अशा महिलांनाही आता योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणाऱ्या महिलांनाही यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत दीड हजार रूपये लाभ मिळत असलेस त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
मात्र आता सदर महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही असे बोलले जाते. संजय गाधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येणार आहे. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल तर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र काही एकत्रित कुटुंबामध्ये २१ वर्षे पूर्ण झालेल्या दोन-तीन अविवाहित मुलींनी अर्ज केला आहे. यापुढे सदर युवर्तीना त्याचा लाभ मिळणार नाही. आता काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जादा आहे त्या महिलांनी अर्ज करू नये असे सांगितेले
सर्व अर्जाची आता फेर पडताळणी केली जाणार आहे. डबल डोअर फ्रोज, वंशिंग मशिन, स्पोर्टस बाईक चार चाकी वाहन दिसून आल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
No Comments