ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
19-12-2024
आरमोरी: नियतीचा खेळ कधी कुणाला कळलाच नाही, पाशातून नियतीच्या कधी कोणी सुटलाच नाही... एका कवीने लिहून ठेवलेल्या या ओळींची प्रचिती येथे १८ डिसेंबरला दुपारी आली अन् संपूर्ण शहर शोकमग्न झालं. तान्हुलं लेकरू घरी ठेवून दुसऱ्या बाळाला कॉन्व्हेंटमधून आणायला सायकलवर निघालेल्या आईला वाटेत काळ बनून आलेल्या ट्रकने चिरडले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तिकडं घरी तान्हुलं अन् इकडं शाळेत लेकरू आईची वाट पाहत होतं, पण माय-लेकरांची भेट अधुरी राहिली.
किरण संजय गोंदोळे (२५, रा. बर्डी परिसर, आरमोरी) असे मयत महिलेचे नाव आहे. मोलमजुरी करून जीवन कंठणाऱ्या गोंदोळे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची. पदरात दोन मुलं. राजू (५)व वल्लभ (अडीच वर्षे) नावं त्यांची. जानकाबाई कोल्हे कॉन्व्हेंटमध्ये मोठा मुलगा राजू शिकत होता.
रोज सकाळी वडील संजय हे त्यास शाळेत सोडून कामावर जायचे तर दुपारी आई किरण ही त्याला घेण्यासाठी सायकलवरून जायची. नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजता ती छोटा मुलगा वल्लभ यास घरी ठेवून मोठा मुलगा राजूला आणण्यासाठी सायकलवरून जात होती. मात्र, वाटेत पोस्ट कार्यालयासमोर देसाईगंजहून आरमोरीकडे निघालेल्या मालवाहू ट्रकने (एमएच ३४ एव्ही- १२९६) जोराची धडक दिली. यात किरण गोंदोळे ही चिरडली गेली. शरीरावरून चाक गेल्याने तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
ट्रक चालक मनीषकुमार वीरबहादुर सिंग (रा. कोलवारा, बिहार) यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
निरागस भांवडं मातृप्रेमाला पारखी
शाळेत गेलेला राजू प्रवेशद्वारावर आईची वाट पाहत होता, पण आई आलीच नाही. ती गेल्याची खबर धडकली. त्यामुळे माय-लेकराची भेट झालीच नाही. या घटनेने दोन चिमुकली निरागस भावंडं मातृप्रेमाला पारखी झाली.
नागरिकांची धाव, गोंदोळे कुटुंबाला दिला धीर
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे व आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. आशिष कोरेटी यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन मृत किरणच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. • मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला. यावेळी कुटुंबीय व नातेवाइकांनी काळीज पिळवटणारा आक्रोश केला.
आणखी किती बळी गेल्यावर अतिक्रमण हटविणार, शेडमाके यांचा सवाल
या घटनेनंतर आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांनी पालिकेवर टीका केली आहे. शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. महामार्ग असूनही रस्ता अरुंद बनला आहे. वळणावर, गर्दीच्या ठिकाणी सिग्नल नाहीत. पालिकेच्या हलगर्जीचा हा बळी असल्याचा आरोप त्यांनी केला. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा जळजळीत सवाल त्यांनी केला आहे. गोंदोळे कुटुंबाचे सांत्वन करुन त्यांनी मदतीचा हातही दिला.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments