STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
17-01-2025
छत्तीसगडमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ही माहिती पोलिसांनी दिली. या जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जंगलात सुरक्षा दलाने केलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईदरम्यान ही घटना घडली. जानेवारी महिन्यात सुरक्षा दलांबरोबरच्या विविध चकमकीत आतापर्यंत २६ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
या कारवाईत जिल्हा राखीव दलाचे तीन जिल्ह्यांतील जवान, सीआरपीएफच्या कोब्रा विंगच्या पाच बटालियन तसेच २२९व्या बटालियनचे जवान सहभागी झाले होते. पोलिसांनी सांगितले की, चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती हाती आली आहे. त्या भागात नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी भागात सुरू असलेली मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. चकमकीमध्ये सुरक्षा दलाची कोणतीही हानी झालेली नाही. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (वृत्तसंस्था)
गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी २१० नक्षलवादी टिपले
गेल्या १२ जानेवारी रोजी बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. त्यात दोन महिलांचा समावेश होता. गेल्यावर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी चकमकींत २१० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
दोन जवान जखमी
बस्तरचे आयजी सुंदरराज पी. यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. विजापूर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोब्राच्या वेगवेगळ्या बटालियन आणि सुमारे १२०० ते १५०० सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. काही बडे नक्षलवादी नेते जंगलात आहेत. विजापूरमध्येच आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments