संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
26-09-2024
दिं. २६ सप्टेंबर २०२४
आष्टी:- युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आज दिं. २६ सप्टेंबर ला श्री..छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था,व श्री.छत्रपती शिवाजी महाराज फुटबॉल क्लब आष्टी द्वारा भव्य फुटबॉल सामन्याचे आयोजन महात्मा ज्यो.फुले हाँय.च्या पटांगणात करण्यात आले होते.
माजी खासदार अशोकजी नेते यांनी फित कापुन व दीपप्रज्वलन करत पायाने फुटबॉल उडवून सामन्यांचे उद्घाटन केले. या फुटबॉल सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी बोलतांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आजच्या काळी मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहे.कारण आजचे अनेक युवक वर्ग हे दिवसेंदिवस मोबाईल मध्यें व्यस्त असतांना दिसते अशावेळी त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही.यासाठी शरीर तंदुरुस्तीसाठी व निरोगी राहण्यासाठी अशा मैदानी खेळाचे अतिशय आवश्यक आहे. आपण हा फुटबॉलचे सामन्यांचा खेळ एक हप्ता चालतोय आपण चांगल्या पद्धतीने व वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे.असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
या फुटबॉल प्रतियोगितेचे प्रथम पुरस्कार मा.खा.श्री. अशोकजी नेते यांचेकडून ५१,००१/- व शिल्ड पोलीस निरीक्षक काळे यांचेकडून द्वितिय पुरस्कार जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चाचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे यांच्याकडून ३१,००१/- व शिल्ड तृतीय पुरस्कार आमदार देवरावजी होळी यांचेकडून २१,००१/- व शिल्ड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे ह्यांचेकडून चतुर्थ पुरस्कार ॲड.विश्वजीत कोवासे यांचेकडून ११,००१/-व शिल्ड एफ.डी. सी एम यांचेकडून अशा पद्धतीने आयोजन करण्यात आले.
यावेळी फुटबॉल प्रतियोगितेच्या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव जी कोहळे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके, सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,आष्टीच्या सरपंच बेबीताई बुरांडे,आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे,पांडे सर,बैस सर, प्राचार्य साहेब व शिक्षकवृंद, रतन पोतगंटवार,अशित बैरागी,योगेश बिशवास, शुभम हावलादार, तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments