ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
29-09-2024
गडचिरोली
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे एकोणचाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी श्री. ऊकंडराव नारायण राऊत यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "अर्धांगिनी" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
श्री. ऊकंडराव नारायण राऊत हे पोर्ला (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून ते जिल्हा परिषद गडचिरोली येथून केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना भजनाची व गाण्याची विशेष आवड असून नवोदित कवी आहेत. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गीते तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या एकोणचाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी. एस. बनसोडे, पुनाजी कोटरंगे, गजानन गेडाम, अजय राऊत, गणेश रामदास निकम, संगीता ठलाल, तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे, रेखा दिक्षित, प्रिती ईश्वर चहांदे, वामनदादा गेडाम, सोनाली रायपुरे - सहारे, डॉ. मंदा पडवेकर, लता शेंद्रे, मुरलीधर खोटेले, रोहिणी पराडकर, वंदना मडावी, वंदना सोरते, सुरेश गेडाम, यामिनी मडावी, कृष्णा कुंभारे, सुभाष धाराशिवकर, सुनिल चडगुलवार, सिध्दार्थ गोवर्धन, सोनू अलाम, विलास टिकले, ऊकंडराव नारायण राऊत, पुरुषोत्तम दहिकर, चरणदास वैरागडे, शैला चिमड्यालवार, ज्योत्स्ना बंसोड, केवळराम बगमारे, खुशाल म्हशाखेत्री, पी.डी.काटकर,संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments