ProfileImage
18

Post

0

Followers

0

Following

PostImage

JAWED PATHAN

Feb. 16, 2024

PostImage

चिमूर 22 फेब्रुवारी रोजी श्री हरी बालाजी महाराजांचा 'रातघोडा' घोडा यात्रेला सुरुवात


 

 

चिमूर  : - संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतातील पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्री हरी बालाजी महाराजांच्या घोडा यात्रेला सुरुवात झाली आहे. रथावर स्वार असलेल्या घोडेस्वार भगवान श्री कृष्णाची मूर्ती भक्तांसाठी महत्त्वाची मानली जाणारी प्रतिकृती नगरी 'रातघोडा' म्हणून ओळखली जाते. 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजता हा महोत्सव सुरू होणार आहे. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. रात्रभर शहरात प्रदक्षिणा केल्यानंतर हा रथ बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवला जातो.
महाशिवरात्रीपर्यंत भाविकांना या रथाचे दर्शन घेता येणार आहे. 
हा उत्सव 397 वर्षांपासून साजरा केला जात आहे. बालाजी महाराज देवस्थान ट्रस्टने उत्सवाच्या आयोजनाची तयारी पूर्ण केली आहे. यात्रेदरम्यान होणाऱ्या जत्रेची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षाही 22 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने नेहरू विद्यालयात सुरू असलेली जत्रा तलावाच्या वरच्या टोकाला हलवण्यात आली आहे.


PostImage

JAWED PATHAN

Feb. 12, 2024

PostImage

व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्यपदी श्रीहरी सातपुते यांची निवड..


 

चिमूर - पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या चंद्रपूर जिल्हा शैक्षनींक मदत कक्षाच्या सदस्यपदी श्रीहरी सातपुते यांची चिमूर व सिंदेवाही तालुक्याकरिता निवड करण्यात आली आहे राज्यभरात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक अडचणी येऊ नये म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेने देशभरात शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे राज्यप्रमुख तथा व्हॉईस ऑफ मीडिया राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांचे सुचणेनुसार व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तालुका निहाय शैक्षनिक विभागाचे काम करण्यासाठी पंधरा तालुक्याकरीता प्रत्येकी दोन या प्रमाणे सात जणांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये चिमूर - शिंदेवाही करीता श्रीहरी सातपुते यांचे सोबत चंद्रपूर - बल्लारपुर करीता शंकर महाकाली. राजुरा -  कोरपना - जिवती करीता दीपक शर्मा. वरोरा - भद्रावती करीता चेतन लूतडे. मुल - सावली करीता रमेश माहुंरपवार. नागभीड - ब्रम्हपुरी करीता गोवर्धन दोनाडकर. व गोंडपिपरी - पोंभूर्णा करीता बाळू निमगडे यांची तालुका निहाय पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


PostImage

JAWED PATHAN

Feb. 8, 2024

PostImage

जाभूलघाट -मालेवाडा मुख्य मार्ग वर रुग्णवाहिका पलटी


 

चिमूर :  8 फरवरी  बुधवारी चिमुर  उपजिल्हा रुग्णालयातील सरकारी रुग्णवाहिका(एबुलेंस)  काही कामासाठी ब्रह्मपुरी ला पाठवण्यात आली होती मात्र या गाडीवर नवीन चालक पाठविन्यात आले असून
सदर चालक ने माँगलगाव वरुण परत येत असताना खेमजई -भटाला (शेगाव) तालुका वरोरा येथील महिलाना पैशाच्या लालसेने चिमूर पर्यन्त बसवले प्रात्र माहितीनुसार गाडी चालक हा दारू पिउन असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याने अदांजे  सायकाळ ७:०० वाजेच्या सुमारात जाभूलघाट -मालेवाडा जवळ वाहन जोराने चालवत असताना त्याच्या तोल गेला व ती रुग्णवाहिका क्रमांक MH 34-A 7126 वाहन पलटी झाले
त्याच वेळी तिथुन येणार सुधीर मयककर या तरुणाने सामाजिक बाधिलकी जोपासत दुजाकी वाहणाने सर्व जख्मी महिलांना चिमुर येथे उपजिल्हा रुग्णालयात आणले पुढिल तपास चिमूर पोलीस करीत आहे


PostImage

JAWED PATHAN

Feb. 1, 2024

PostImage

कोलारा गाव ग्राम विकासासाठी तिन वर्ष दत्तक घेण्यास कटिबंध  अध्यक्ष केदारसिंग चंदनसिंग रोटेले


 

चिमूर :- आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर आणि ग्राम पंचायत कोलारा यांचे संयुक्त विद्यमाने ग्राम विकास  मतदान जागृती युवा शक्ती या संकल्पनेवर राष्ट्रीय सेवा योजना ग्रामिण समाजकार्य श्रमसंस्कार विशेष शिबिर दि. २४ जाने . ते ३० जाने, कार्यक्रमाच्या समारोपीय प्रसंगी ग्राम विकासासाठी कोलारा हे गाव ३ वर्षासाठी शिबीर घेण्यास कटीबद्ध राहु असे प्रतिपादन डॉ. केदारसिंग रोटेले यांनी केले.ते पुढे म्हणाले की ग्रामाच्या विकासासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू सुर्य हमेशा उगता रहे, सुर्य की रोशनी हमेशा बरकरार रहे, विद्यार्थी हमारा घडता रहे असे सांगुन महाविद्यालय नविन नविन कोर्सेस आणुन विद्यार्थ्यांचा विकास घडवेल विद्यार्थी हा लोकल टु ग्लोबल जाईल याकडे पुर्ण प्रयत्न करू आणि कोलारा गावचा विकास घडवु असे अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त केले. डॉ. गजानन बन्सोड म्हणाले की समाजकार्य विद्यार्थी संपूर्ण भारतभर विविध क्षेत्रात आहेत. त्यांच्या माध्यमातुन गावचा विकास साधु असे ते बालले. कार्यकारी प्राचार्य डॉ. विठ्ठल ठावरी कला वाणिज्य महाविद्यालय भिसी यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुनांच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर घेतल्या जाते. डॉ. विजय घरत सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी ३ वर्ष शिबीर या गावात घेण्यासाठी मी विद्यापीठ स्थरावर पर्यंत करेल. डॉ.आनंद किन्नाके यांच्या वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या मार्गदर्शना नुसार ३२२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर डॉ. राठोड पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांनी २३० गुरांची तपासणी केली, ग्राम स्वच्छता, मतदार जागृती अभियान यावर पथनाट्य तसेच मा. निशिकांत मेहरकुरे यांनी मार्गदर्शन केले. सामुदायिक ध्यान योगा प्रार्थना दररोज डॉ. दिवाकर कुमरे यांनी प्रत्याशिकाद्वारे शिबीरापर्थ्यांना करून दाखविले, सामुदायिक प्रार्थना दररोज डॉ. चंद्रभान खंगार कार्यक्रम अधिकारी रा. से.यो.यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थ सज्जनराव गेडाम, योगेश गेडाम, संतोष गेडाम, अमित उईके, यांच्या साथीने घेतल्या जात होती. वनउपजापासुन उद्योगाची यावर डॉ. अजय पिसे यांनी मार्गदर्शन केले, राष्ट्रसंताचे साहित्य यावर मा. राजु देवतळे आजिवन प्रचारक तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य गुरूकुंज मोझरी यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. अशोकरावजी चरडे यांनी सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर मार्गदर्शन केले. श्री. संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी यावर मनोगत व्यक्त केले. शेतीसाठी जोडव्यवसाय मधुमख्खी पालन यावर मा. रमेश चौधी यांनी प्रात्याक्षिकाद्वारे याचे महत्व समजावुन सांगीतले, श्रमदान ग्रामस्वच्छता विद्यापिठ आपल्यादारी सर्वेक्षण तसेच दररोज सायंकाळी ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये श्री. उईके कु. धनश्री शेडामे, मेघा गेडाम, वैष्णवी गुडघे, ऋतुजा भजभुजे तसेच सर्व शिबीरातील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामधुन जनप्रबोधन करण्याचे कार्य ग्रामस्थांसाठी केले. प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे यांनी सात दिवसीय शिबीरात झालेली कामे. याबद्दल समाधान व्यक्त करून ग्रामस्थांकडुन असाच प्रतिसाद मिळाल्यास पुढील दोन वर्ष शिबीर घेण्यासाठी विचार करू असे मत मांडले. सदर कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रभान खंगारे, डॉ. दिवाकर कुमरे, डॉ. सुरेश मिममिले, डॉ. प्रिति दवे, डॉ. रागीनी मोटघरे, प्रा. हेमंत वरघने, डॉ. गजानन बन्सोड, डॉ. सुदर्शन खापर्डे, गजु सिडाम रतिराम वांढरे, गणेश येरमे, सरपंच सौ. शोभा कोयनाडे, अंगणवाडी सेवीका मा. इंद्रायनी रामटेके, संगीता काळयेंगे, रेखा गणविर, अविनाश गणतिर, किशोर गभणे बहुसंख्यने ग्रामस्थ व सर्व शिबीरार्थी यांच्या उपस्थितीत ग्रामिण समाजकार्य श्रम संस्कार विशेष शिबीराचा समारोपीय कार्यक्रम पार पडला.


PostImage

JAWED PATHAN

Feb. 1, 2024

PostImage

वनक्षेत्रात अवैध रेती उत्खनन करणारे JCB मशीन जप्त 


 

चिमूर :  दिनांक ३१  जानेवारी बुधवारला सायंकाळी ६ः १० वाजेच्या सुमारात  चिमुर उपक्षेत्रातील कर्मचारी आर. मेश्राम, क्षेत्र सहाय्यक चिमूर,  ए. एम. मेश्राम, वनरक्षक चिमुर, कु. एल. बी. बोनगीरवार, वनरक्षक झरी व इतर मजुरासह कक्ष चिमूर  बिट क्रमांक 368 मध्ये गस्तीवर असतांना जंगलात वाहनाचा आवाज आला असता खात्री करण्यासाठी गेले असता वनक्षेत्रातील नाल्यावर JCB ने रेम्प तयार करतांना आढळले, त्यांना विचारणा केली असता रेती काढण्यासाठी रैम्प तयार करीत आहो असे सांगितले.

सदर प्रकरणाची माहीती  के. बी. देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांना दिली असता ते तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यानंत्तर अवैधरित्या वनक्षेत्रात उत्खनन करणारे JCB मशीन जप्त करुन वनपरिक्षेत्र कार्यालयात येथे आणुन भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 33(1), अ, ब, 41 व 42 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे
सदर कार्यवाही मा. उपवनसंरक्षक, ब्रहपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, सुनिल हजारे, सहाय्यक वनसंरक्षक (तदू), ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी के. बी. देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून जप्त कार्यवाहीत आर. डी. मेश्राम, क्षेत्र सहाय्यक, चिमूर  यु, बी, लोखंडे, क्षेत्र सहाय्यक, मुरपार आर. डी. नैताम, वनपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) खडसंगी (चिमुर), ए. पी. पोटे, वनरक्षक (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) खडसंगी (चिमुर)  आर. बो केदार, वनरक्षक नियतक्षेत्र मान्सुली ए. एम. मेश्राम, बनरक्षक नियतक्षेत्र चिमुर आर. डब्लू हजारे, वनरक्षक नियतक्षेत्र गदगाव, कु एल. बी. बोनगीरवार, वनरक्षक नियतक्षेत्र झरी, तसेच अविनाश डफ, विनोद श्रीरामे व रविंद्र नन्नावरे यांनी सहकार्य केले


PostImage

JAWED PATHAN

Jan. 21, 2024

PostImage

वंदनीय राष्ट्रसंताची तपोभूमीतील गुंफा गोंदेडा यात्रेला प्रारंभ


 

चिमूर तालुक्यातील गुंफा गोंदेडा यात्रेला असंख्य गुरुदेव भक्तांचे भाविकांचे श्रद्धास्थान ,विदर्भाची पंढरी समजली जाणारी  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत रविवार २१ जानेवारी  ६४ व्या गुंफा गोंदेडा यात्रा महोत्सवाला घटस्थापना करून सुरवात झाली आहे सदर यात्रा ही २१  ते २५ तारखे पर्यंत अनेक विविध कार्यक्रम संपन्न होणार असून २५ जाने ला गोपाळकाला व महाप्रसादाने सांगता होणार आहे 
          श्री गुरुदेव गुंफा समिती गोंदेडा तथा श्री गुरुदेव साधनाश्रम गुंफा यात्रा महोत्सव समिती तपोभूमी गुंफा गोंदेडा च्या वतीने आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेला गुंफा महोत्सव यात्रेला रविवारला घटस्थापना करून सुरवात झाली या यात्रेत अनेक कार्यक्रमाने होणार आहे घटस्थापना प्रवीण मोतीराम वाघे अध्यक्ष गोदांडो यात्रा महोत्सव व विठ्ठल शंकरराव सावरकर अध्यक्ष गुंफा समिती यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे  यानंतर सामुदायिक ध्यान ग्रामगीता वाचन रामधून  चिंतन प्रबोधन श्रमदान यज्ञ पशु रोगनिदान शिबीर  कृषी चर्चासत्र मेळावा ग्रामगीता पाठांतर स्पर्धा कीर्तन संमेलन आदी कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत २२ जानेवारी ला भजन स्पर्ध्या बाल विभाग महिला विभाग या स्पर्धेचे उद्घाटन झाली  आहे 
दि. २३  ला विविध कार्यक्रमांचे अंतर्गत महिला मेळावा आयोजित केला असून अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे यानंतर पुरुष भजन स्पर्धेचे व व्यसनमुक्ती च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दि. २४ ला चंद्रपूर जिल्हा श्री  गुरुदेव भक्तांचा गुरुदेव कार्यकर्ता मेळावा तसेच युवक कार्यकर्ता मेळावा व सर्व स्पर्धाचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे संगीत भजन संध्या आणि इतर अनेक कार्यक्रम होणार आहेत दिनाक २५ जानेवारीला रामधून व पालखी मिरवणूक ध्वजारोहण रक्तदान शिबिर मोफत रोगनिदान शिबिर व मोफत औषध शिबिराचे आयोजन केले आहे यानंतर पालखी सत्कार व पालखी श्रमदान रक्तदान शिबीर होऊन  स्वरगुरुकुंजचे कार्यक्रम होणार आहे यानंतर गोपाळकाला व मार्गदर्शन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोजरी अशोक नेते खासदार चिमूर गडचिरोली मितेश भांगडिया माजी आमदार विधान परिषद बंटी भांगडीया आमदार चिमूर विधान सभा क्षेत्र दामोदर पाटील उपसेवाधिकारी मोझरी प्रकाशपंत वाघ महाराज प्रचारप्रमुख जनार्धांनपंत बोथे सरचिटणीस सौ गिरजा गायकवाड सरपंच जीतू होले यावली  आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत यानंतर गोपाळकाला व महाप्रसादाने यात्रा महोत्सवची सांगता होणार आहे


PostImage

JAWED PATHAN

Jan. 20, 2024

PostImage

पिपर्डा : डुकराची धडक दुचाकी अपघातात १ जण ठार १ गंभीर जखमी


 

Breking news चिमूर तालुक्यातील पिपर्डा गावातील माणिक चूनारकर वय ५३ ठार तर मोरेश्वर चुनारकार वय ३२ गंभीर जखमी झाले आहे प्रास्त माहीती नुसार माणीक चुनारकर व मोरेश्वर चुनारकर है नात्याने काका पुतणे आहे
चिमूर मध्ये प्लाटच्या विक्रीच्या कामासाठी गेले होते
परत गावाला जात असताना शुक्रवार दिनाक १९ जानेवारी रात्रौ ८ः ३० सुमारात विहीरगाव फाट्याजवळ जंगली डुकराच्या सरीने दुचाकी गाडीला धडक दिली माणिक चुनारकार है जागीच गतप्राण झाले तर मोरेश्वर चुनारकार गंभीर जखमी असून या मार्गानी येणार्या लोकांनीं पोलीसाना फोन वर माहीती दिली पोलिस हवालदार विलास निमगडे, प्रविण तिरनकर , पोलिस झिलपे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचणामा केला .प्रेत उत्तरीय तपासनी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पिपर्डा गावात आत्महत्या अपघात अशा दुःखत दोन घटना घडल्या आहे यामुळे चुनारकार परिवारात गावात शोकाकूल वातावरण आहे आत्महत्तेचे कारण अजुन स्पस्ट झाले नसुन पुढील तपास सुरु आहे.


PostImage

JAWED PATHAN

Jan. 17, 2024

PostImage

अविवाहीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या  


 

Breking news चिमूर तालुक्यातील पिपर्डा गावातील अविवाहित तरुणाने गुराच्या गोट्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोज बुधवारला दुपारी ३. ०० च्या सुमारास उघडकीस आली. मृतक अविवाहीत होता तरुणाचे नाव राहुल पटवाळी मेश्राम (वय २४) रा. पिपर्डा असे आहे.
 खडसंगी येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरून दोन दिवसापूर्वी राहुल आपल्या गावाला आला.आई वडील मजुरी करीता नाशिकला असतात संक्रात असल्यने ते पण मुलीची गावाला आले होते.त्याचा आपल्या मोठ्या वडीलाकडे मुक्कामी होता. मोठ्या वडीलाकडील सर्व मजुरी करीता बाहेर गेल्याची संधी साधत राहुलने गावातच रस्त्याच्या कडेला असलेल्या गुराच्या गोठ्यात दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली.या मार्गाने जाणाऱ्या गावकर्‍यांना राहुल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.याची माहीती गावकऱ्यांनी चिमूर पोलिस तथा राहुलच्या नातेवाईकांना दिली.
पोलिस हवालदार विलास निमगडे, प्रविण तिरनकर , पोलिस घोन्नाडे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचणामा केला .प्रेत उत्तरीय तपासनी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. आत्महत्तेचे कारण अजुन स्पस्ट झाले नसुन पुढील तपास सुरु आहे.


PostImage

JAWED PATHAN

Jan. 12, 2024

PostImage

जिजाऊ पतसंस्थेत जिजाऊ जन्मोत्सव साजरा


 

चिमूर येथील जिजाऊ नागरी पतसंस्था सभागृहात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्य मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. संजय पिठाडे यांनी राजमाता जिजाऊ बापत मार्गदर्शन केले. सर्व उपस्थितांनी जिजाऊच्या प्रतिमेस हारार्पण व फुले बाहुन जिजाऊ वंदना घेवुन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी संस्थचे अध्यक्ष ग्रंथमित्र सुभाष शेषकर, सचिव रामभाऊ खडसिंगे, लोन अध्यक्ष डॉ. संजय पिठाडे, शाखा व्यवस्थापक मिलिंद जांभुळे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक शुभम भुजे, रुपाली राणे, संचालक मंगलाताई वेदी, सपना गंपावार, डॉ. खानेकर, डॉ. पोर्णिमा खानेकर, विठ्ठल धोटे, सी, भावना पाहुणे, लिना कोराम, कोकीळा दुधनकर आदी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली आहे.


PostImage

JAWED PATHAN

Jan. 10, 2024

PostImage

नेरी श्री पंढरीनाथ देवस्थान येथे संगितमय श्रीरामचरित मानस ज्ञानयज्ञ सत्संग सप्ताह साजरा


 चिमुर तालुक्यातील नेरी येथील पेठ विभागातील श्री पंढरीनाथ देवस्थान पेठ विभाग तथा समस्त ग्रामवासीय जनतेच्या वतीने संगीतमय श्रीराम चरीत मानस ज्ञानयज्ञ सत्संग सप्ताहाचे गुरुवार दि ४  जानेवारी २०२४ ते गुरूवार दि ११ जाने २०२४ पर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .कथा प्रवक्ता म्हणून सुश्री स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे (आळंदीकर) जि. अमरावती ह्या  आहे. 
४ जानेवारी ला घटस्थापना करुन सप्ताहाची सुरवात करण्यात आली त्यानंतर दररोज सकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत सामुदायिक ध्यान, सकाळी ८ वा. गावातील प्रत्येक वार्डातुन रामधुन काढण्यात आली.
सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी ७ ते ८.३० पर्यंत हरिपाठ हरीओम बाल हरिपाठ मंडळ हिवरा- हिवरी हेमंत कुबडे आणि संच ता. उमरेड जि नागपूर यांचे 
विशेष आकर्षण हभप नामदेव अलोने महाराज यांचे भारुड होते
आणि सायंकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत सुश्री स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे ( आळंदीकर) जि. अमरावती यांचे अम्रुतमय वाणीतुन प्रवचनाचा लाभ भाविक भक्त उपस्थित घेत होते

या सप्ताहाची सांगता दि ११ जानेवारी रोज गुरवारला दु. १२ ते ४ पर्यंत गोपाल काल्याचे कीर्तनाने सुश्री -- स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे (आळंदीकर) जि अमरावती यांच्या अम्रुतमय वाणीने होणार आहे तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी ५ वा सुरू होणार आहे
 या सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून सौ रेखा पिसे सरपंच  ग्रा. पं नेरी, आ.बंटी भांगडीया  विधानसभा क्षेत्र, मंगेश चांदेकर अध्यक्ष व्यापारी युनियन नेरी, दादाराव पिसे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ नेरी, रूपचंद चौधरी अध्यक्ष शंकरजी देवस्थान नेरी, अशोक लांजेकर अध्यक्ष जगन्नाथ बाबा मंदीर नेरी, प्रा. राम राऊत सर ग्रामगीता चार्य नेरी, कमलाकर  लोणकर सामाजिक कार्यकर्ते नेरी यांच्या व समस्त गाववासीयांच्या उपस्थितीत या सप्ताहाचा समारोप गोपाल काला व महाप्रसादाने होणार आहे तरी नेरी व समस्त जनतेनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पंढरीनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने तथा गाववासीयांकडुन  करण्यात येत आहे.


PostImage

JAWED PATHAN

Jan. 10, 2024

PostImage

मनातील घान दूर झाल्याशिवाय अंधश्रध्दा जाणे अशक्य  - प्रकाश मेश्राम


 

Chimur news चिमूर : दिनांक ९/१/२०२४ ला मौजा येरखेडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर च्या वतीने सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मध्ये पहिला दिवस अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे प्रसंगी प्रकाश मेश्राम बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक हरिभाऊ पाथोडे तर प्रमुख अतिथी म्हणून मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रकाश मेश्राम , प्राध्यापक कार्तिक पाटील, प्राध्यापक प्रफुल्ल राजुरवाडे, प्राध्यापक कात्रज वार, प्राध्यापिका सोनटक्के मॅडम, संजय गेडाम सरपंच येरखेडा विचार मंचावर उपस्थित होते पुढे प्रकाश मेश्राम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात युवा पिढी निर्माण करण्याची ताकत आहे आणि श्रम संस्काराचे धडे यातून मिळतात तर प्रा  हरिभाऊ पठोडे यांनी प्रत्याक्षिक द्वारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा उजाळा दिला असले अंधश्रद्धा दूर कशी केल्या जाईल आणि अंधश्रद्धा कशी निर्माण होते त्याचे स्पष्टीकरण करून दिले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कात्रजवार सर तर आभार प्रदर्शन प्रा राजुरवाडे सर यांनी मानले शिबिराला महाविद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

JAWED PATHAN

Jan. 9, 2024

PostImage

नुकसान भरपाई व बोनस  संदर्भातील नोंदणी करीता टाळाटाळ खपवून घेणार नाही -  बंटी भांगडीया आमदार 


Breking news चिमूर : दि. ९ जानेवारी आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांनी चिमूर येथील जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून नुकसान भरपाई व बोनस संदर्भातील समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रशासनाला सक्त सूचना दिल्या. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन काळात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २०,०००/- (विस हजार रुपये) बोनस देण्याची घोषणा केली आणि त्यासंदर्भातील कार्यवाहीकरीता संबंधित प्रशासन संस्थेकडे नोंदणी केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करण्याचे आवाहन धान उत्पादक शेतकरी बांधवांना केले. 

चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था मर्या. शाखा - चिमूर या नोंदणी केंद्रावर मागील एक आठवड्यापासून तालुक्यातील शेतकरी बांधव नोंदणी करण्यासाठी जात आहे, सदर संस्थेकडून बोनस संदर्भातील त्यांची कागदपत्रे व फॉर्म स्विकारण्यास वारंवार टाळाटाळ केली गेली. सदर शेतकऱ्यांना ऊद्या या, परवा या अशा बतावण्या करून ताटकळत ठेवून नंतर परत जाण्यास सांगितले जाते. संस्थेच्या नोंदणी केंद्रावर फक्त एक कर्मचारी त्याच्या खाजगी मोबाईल द्वारे रजिस्ट्रेशन करीत असून, अधिकच मनुष्यबळ कर्मचारी संस्थेत उपलब्ध नाही. त्यामुळे राज्य सरकारने १५ जानेवारी ही अंतिम तारीख वाढवून दिली असली तरी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी दररोज जात असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी होणार नसल्याचे जवळपास निश्चितच झाले होते. हा सर्व प्रकार बघता बोनसचा लाभ घेण्यासाठी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत नोंदणी आता कशी करता येईल ? असा गंभीर प्रश्न लाभार्थी शेतकरी वर्गात निर्माण झाला.

सदर सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांची चिमूर येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. दरम्यान, आमदार बंटीभाऊंनी त्यांच्या सर्व समस्यांची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रशासनाशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांना बोलावून घेतले, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई व बोनस संदर्भातील कार्यवाहीसाठी होणारी टाळाटाळ, हयगय अजिबात खपवून घेतली जाणार नाही असे खडे बोल त्यांना सुनावले. तसेच, शेतकरी बांधवांच्या सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रशासनाला सक्त सूचना दिल्या. यापुढे आपल्याला कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी किंवा जनसंपर्क कार्यालयाशी तात्काळ संपर्क करण्यास सांगितले. उपस्थित शेतकरी बांधवांनी आमदाराचे आभार मानले व समाधान व्यक्त केले. यावेळी भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.


PostImage

JAWED PATHAN

Jan. 2, 2024

PostImage

हिट अँड रन कायद्या विरोधात वाहन चालक ,मालक यांचा चक्का जाम


 

चिमूर : जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अंन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 
नुकताच संसदेत जुन्या हिट अँड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे. यात करावसाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ववस्त होणार आहे. अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र या अपघातात वाहन चालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघाता नंतर वाहन चालकांना गंभीर मारहाण केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जख्मीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलिस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु नवीन कायदा हा वाहन चालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.
त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने चिमूर शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे


PostImage

JAWED PATHAN

Jan. 2, 2024

PostImage

अंगणवाडी सेविकेचा अप्पर जिल्हाधिकारी व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर धडकणार मोर्चा


 

चिमूर - महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवार दिनांक ३ जानेवारी दुपारी एक वाजता मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात बचतगटाची आहार पुरवठा व समृध्दी आहाराची रक्कम वाढविण्यात यावी  व इतर मागन्यासाठी हुतात्मा स्मारक येथुन निघून अंगणवाडी सेविकेचा मोर्चा थेट चिमूर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकणार आहे
गेली ४८ वर्षे कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी सेविका महागाईने भरडल्या आहेत त्यांच्या कडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत त्यामुळे बुधवार ला निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागण्यासाठी मोर्चा आयोजीत केला आहे.
सदर मोर्च्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व बचत गट प्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहन माधुरी रमेश विर चिमुर प्रभा विश्वनाथ चामटकर नागभीड लता राजु देवगडे भद्रावती ललीता सोनुले मुल विद्या वारजुकर ब्रम्हपुरी संयोगिता गेडाम सिंदेवाही अन्नपुर्णा हिरादेवे वरोरा, रोशनी चंदेलअध्यक्ष चिमुर तालुका बचत गट आहार पुरवठा संघटना  यांनी केले आहे.


PostImage

JAWED PATHAN

Dec. 29, 2023

PostImage

तब्बल २ वर्षांपासून माकोणा अंगणवाडी सेविका नाही


 

चिमुर तालुक्याच्या टोकावर असलेल्या माकोणा गावात दोन वर्षांपासून अंगणवाडी सेविका नाही यांचे मुख्य कारण म्हणजे निर्मला पुरुषोत्तम सेलकर या माकोणा गावाच्या अंगणवाडी च्या सेविका आहेत परंतु गेल्या २ वर्षांपासून त्याची परीस्थिती हालावली त्यामुळे माकोणा गावच्या अंगणवाडी ला अंगणवाडी सेविका नाही त्यामुळे लहान मुलांना शिक्षण घेणे, किंवा हुशार होण्यासाठी बुध्दीमता जागृत करण्यासाठी अंगणवाडी सेविका उपलब्ध नाही आहे त्यामुळे आता माकोणा गावकऱ्यांच्या वतीने तालुका व जिल्हा स्तरावरील संबंधित प्रशासनाला मागणी करत आहे की माकोणा गावच्या अंगणवाडी सेविका ची जाहिरात काढण्यात यावी आणि गावातील सुशिक्षित महिलेला संधी मिळावी कारण शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे त्यामुळे लहानपणापासून हे मुलांना पाजले तर मुलं अतिशय बुद्धिमान होणार कारण मुलांना शिक्षण घेणे गरजेचे आहे पंरतु शिक्षण देणारे सुध्दा सक्रिय होणे गरजेचे अपेक्षीत आहे कुठल्याही काॅपी करुन पास होणार्या अंगणवाडी सेविका बनवु नयेत असे झालेतर गावातील सुशिक्षित नागरिक चौकशी बसवून पित उघडे पाडणार अशी माहिती माकोणा गावातील सुशिक्षित युवक जगदीश खटुजी मेश्राम यांनी दिली आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकाचे सेवावृत्तीची वेळ झाली त्यामुळे आता लवकरच जाहिरात काढून अंगणवाडी सेविका म्हणून नवीन भरती करा अशी मागणी माकोणा ग्रामवासी करत आहे


PostImage

JAWED PATHAN

Dec. 25, 2023

PostImage

रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुतळा जाळला.


 

सतांपलेल्या शेतकर्यांचा ‍जाहीरपणे निषेध.


चिमूर : पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्यासाठी अनेक शेतकरी २५ वर्षांपासून सतत मागणी करत आहे.या रस्त्याच्या मागणीसाठी सन २०२० पासून भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर - वरोरा तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम सातत्याने पाठपुरावा करत आहे, शासन व इतर कोणीही या मागणीकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या पुढाकाराने दिनांक २३ रविवारी सकाळी आंदोलन स्थळी जिल्हाधिकाऱ्यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध केला.

            वरोरा तहसीलदार,  सार्वजनिक बांधकाम वरोरा विभाग, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील आमदार,  जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री या सर्वाना सातत्याने पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरवला या रस्त्याला वि.आर नबंर व रस्त्याच्या मंजुरीची मागणी करत आहे.पण या मागणीकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.त्यामुळे  ७ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन येथे मुख्यमंत्री यांचे प्रधान विकास करणे यांना या रस्त्याच्या मागणीसाठी निवेदन सादर केले होते.

या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मागणी पुर्ण करा असे निर्देश दिले होते.परंतु जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी याकडे विशेष लक्ष दिले नाही व शेतकऱ्यांनी या संबंधात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने  १९ डिसेंबर २०२३ पासून पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्याला वि.आर नबंर व रस्त्याला मंजुरी देण्यात यावी भीम आर्मी संरक्षक च्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी " बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर " नावाचे धरणे आंदोलन दिवसा व कडाक्याच्या थंडीत रात्री येथील शिवबंधाऱ्या जवळ सुरू केले आहे. परंतु अजूनही या मागणीकडे शासन लक्ष देत नसल्याने  शेतकरी आक्रमकपणे सरकारचा निषेध व्यक्त केला  अशा घोषणा देत आज २४ डिसेंबर रोज रविवारला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आंदोलन स्थळी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करुन पुतळा जाळला , 
शेतकऱ्यांना रस्त्याच्या मागणी करीता आंदोलन करावे लागत असेल तर " शासन आपल्या दारी " असा प्रश्न गिरोला, आबमक्ता, येरखेडा,माकोणा, पाजरेपार रीठ, या परीसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.

पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्याला वि.आर नबंर देऊन रस्ता मंजुरी देण्यात यावा  मागणी  करत याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र होत जाणार असून या मागणीकडे लक्ष न दिल्यास वरोरा भद्रावती आमदार जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांचेही पुतळे जाण्याचा  इशारा शेतकरी व भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी  दिला आहे.


PostImage

JAWED PATHAN

Dec. 25, 2023

PostImage

शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचें आयोजन


 

चिमूर येथे कार्यक्रमाला डॉ . सतीश वारजुकर यांची उपस्थिती

 चिमूर : शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचा स्मृतिदिन कार्यक्रम चिमूर येथील जागतिक गोंड संगा मांदी शाखा चिमूर वतीने गोंड मोहल्ला येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ.सतीश वारजूकर, प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे,अध्यक्ष म्हणून मनोज शिंह गोंड मडावी,विजय शिंह मडावी, संदीप कावरे, वैधकीय अधिकारी डॉ. आनंद किन्नाके,सहायक लेखाधिकारी विकासजी सिडाम, सौ. उर्मिला वरखडे, सौ. माधुरी वरखडे, नागोजी मडावी, दागोजी वरखडे, व समाज बांधव उपस्थित होते
आयोजित स्मृतिदिन दुसरा सत्र गोंडी रेला सांस्कृतिक नृत्य महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून आदिवासी प्रथेनूसार विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली. यावेळी  डॉ. सतिश वारजुकर यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, त्यातही अनेक थोर क्रांतिकारकांचे बलिदान आणि शौर्य अजूनही उपेक्षित असेच आहे. त्यापैकीच एक आहेत थोर क्रांतिकारी शहिद वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके यांचे बलीदाना बद्दल बहुमूल्य मार्गदर्शन करून शहिदाचे प्रतिमेला अभिवादन केले


PostImage

JAWED PATHAN

Dec. 24, 2023

PostImage

शिक्षणा शिवाय सर्वांगीण विकास होत नाही - डॉ. सतिश वारजूकर.


 

चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील माना आदिम जमात मंडळ मालेवाडा यांच्या सयुक्त विद्यमाने नागदिवाळी महोत्सव स्नेहमीलन सोहळा तथा नूतनवर्षाभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजूकर,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जेष्ठ नेते केशवजी वरखडे,पत्रुजी दडमल,बंडू बारेकर, दिगांबर दडमल,बंडूभाऊ घोडमारे, जांबूळे सर,व समस्त समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान समाज बांधवानी कार्यक्रम घेण्यासाठी व्यासपीठाची मागणी केली असता कसलाही विलंब न करता व्यासपिठाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले समाज बांधवानी डॉ. सतिश वारजुकर यांचे आभार मानले

   डॉ. सतिश वारजूकर यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले शिक्षणा शिवाय सर्वांगीण विकास होत नाही, त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाला समान बुद्धी असते म्हणून प्रत्येकाने त्या बुद्धीचा वापर करून स्वतःची प्रगती साधावी. शिक्षण व पुस्तक वाचन यामुळे बुद्धी प्रगल्भ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की मानवाचे जीवनाचे अंतिम ध्येय हे त्यांच्या बुद्धीचा विकास कसा होईल यावर असले पाहिजे. कारण जगात जे लोक हाताने काम करतात फक्त आपले पोट भरतात आणि जे लोक बुद्धी ने मेहनत करतात ते चैनीचे जीवन जगत असतात म्हणून थोर महापुरुषांचे विचार अंगी कारणे काळाची गरज आहे