आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची हमी आणि गाव तेथे रस्त्याचे नियोजन करा- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके
गडचिरोली, दि. ६: आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४८२ कोटी ३६ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रारूप आराखड्याची मागणी शासनाकडे सादर केली आहे. हा आराखडा जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
निधीवाढीसह प्रस्ताव सादर
गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर्वी १९७ कोटी ९६ लाख रुपयांची वित्तीय मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील कार्यान्वयन यंत्रणेकडून २८४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आल्याने एकूण ४८२ कोटी ३६ लाखांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला. यावेळी मंत्री उईके यांनी गडचिरोली जिल्ह्यात अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
गाव तेथे रस्ता – आदिवासी विकास मंत्र्यांचे स्पष्ट निर्देश
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील प्रत्येक गाव रस्त्याने जोडला जावा, यावर भर देण्याचे व ‘गाव तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रस्तावित करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बैठकीत दिले.
शिक्षणाला प्राधान्य – प्रत्येक विद्यार्थ्याला संधी
शाळा तसेच वसतीगृहांमध्ये प्रवेशाच्या सुविधा अधिक सुटसुटीत आणि सर्वसमावेशक करून आदिवासी समाजातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळण्यासाठी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास यावर भर देवून महत्त्वाकांक्षी योजना आखण्याची गरज असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (एटापल्ली) तसेच विविध कार्यकारी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदिवासी वार्षिक उपयोजनेचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते
आयुर्वेद एक प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धति है जो शरीर, मन और आत्मा के संतुलन को बनाए रखने पर आधारित है। यह 5000 साल से भी अधिक पुरानी है और इसमें प्राकृतिक तत्वों जैसे जड़ी-बूटियाँ, आहार, और जीवनशैली के उपायों का उपयोग किया जाता है। आयुर्वेद का मुख्य उद्देश्य शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक स्वास्थ्य को बनाए रखना है।
आयुर्वेद के प्रमुख सिद्धांत:
पंचमहाभूत: आयुर्वेद में पाँच प्रमुख तत्वों का वर्णन किया गया है – पृथ्वी, जल, अग्नि, वायु और आकाश। इन पाँच तत्वों का शरीर में संतुलन बनाए रखना महत्वपूर्ण होता है। प्रत्येक व्यक्ति की प्रकृति इन तत्वों के संतुलन पर आधारित होती है।
त्रिदोष: आयुर्वेद में तीन प्रमुख दोषों का उल्लेख है – वात, पित्त और कफ। ये शरीर और मन के कार्यों को नियंत्रित करते हैं। संतुलन बनाए रखने के लिए इन दोषों को समझना और उनका उपचार करना ज़रूरी होता है।
आहार: आयुर्वेद में आहार को विशेष महत्व दिया गया है। यह माना जाता है कि सही आहार शरीर और मन के संतुलन को बनाए रखता है। प्रत्येक व्यक्ति का आहार उसकी प्रकृति (वात, पित्त, कफ) के आधार पर निर्धारित किया जाता है।
जीवनशैली: आयुर्वेद में दैनिक दिनचर्या, योग, प्राणायाम, और ध्यान जैसी आदतों को अपनाने की सलाह दी जाती है। यह शारीरिक और मानसिक स्वास्थ्य को बनाए रखने के लिए आवश्यक माना जाता है।
आयुर्वेद के फायदे:
प्राकृतिक उपचार: आयुर्वेद में औषधियाँ और उपचार प्राकृतिक संसाधनों से प्राप्त होती हैं, जिससे दुष्प्रभावों का खतरा कम होता है।
व्यक्तिगत उपचार: आयुर्वेद में प्रत्येक व्यक्ति की शारीरिक प्रकृति के अनुसार उपचार किया जाता है, जिससे अधिक प्रभावी परिणाम मिलते हैं।
मानसिक शांति: आयुर्वेद में मानसिक संतुलन और तनाव मुक्त जीवन जीने के लिए ध्यान और योग को भी शामिल किया जाता है।
आयुर्वेद में उपचार के तरीके:
हर्बल औषधियाँ: आयुर्वेद में जड़ी-बूटियाँ और पौधों से बनी औषधियाँ उपयोग की जाती हैं, जो शरीर को प्राकृतिक रूप से संतुलित करती हैं।
पंचकर्म: यह आयुर्वेद का एक प्रमुख उपचार तरीका है जिसमें शरीर को शुद्ध करने के लिए विभिन्न प्रक्रियाओं का उपयोग किया जाता है, जैसे तेल मालिश, बवासीर का उपचार, और सूक्ष्म चिकित्सा।
आहार और पोषण: आयुर्वेद में आहार का सेवन शरीर के दोषों और प्रकृति के अनुसार किया जाता है, जिससे शरीर की शक्ति और रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ती है।
गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल पासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत २५ कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेदेखील डासांमध्ये कीटकनाशक प्रतिरोधकता निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मलेरियावर नियंत्रण मिळवणे ही अत्यंत महत्त्वाची प्राथमिकता आहे. गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यासह २०१७ मध्ये विविध निर्णय घेण्यात आले होते. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मलेरिया निर्मूलन टास्क फोर्स सुरू करण्यात आला होता. त्यानुसार, टास्क फोर्सने राष्ट्रीय आणि जागतिक तज्ञांच्या शिफारशींचा समावेश करून गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. गडचिरोलीत येत्या १ एप्रिल २०२५ पासून या आराखड्यातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून गडचिरोली जिल्हा लवकरच मलेरियामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याकरिता हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
गेट्स फाउंडेशन आणि सन फार्माचेही सहकार्य गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणाच्या या कामासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यामार्फतही महत्त्वपूर्ण मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर सन फार्मा/एफडीईसी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. सन फार्मा कंपनीच्या FDEC ने मलेरिया निर्मूलनासाठी मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात काम केले आहे. मलेरिया दूर करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक मार्गांचे मॉडेल विकसित केले आहे. मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे, फील्ड प्रोग्रामचे निरीक्षण करणे, तांत्रिक पुनरावलोकन यासारख्या विविध गोष्टींमध्ये सन फार्मा कंपनीमार्फत मदत करण्यात येणार आहे. गेट्स फाउंडेशन आणि सन फार्मा यांच्या योगदानामुळे गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या कार्यात महत्वपूर्ण मटत मिल शक्तेल असे मख्यमंत्री फटाणतीस यांनी सांगितले
गडचिरोली -:
विहान बहुउद्देशिय संस्था संचालीत तिरंगा मेरी शान प्रकल्पा अंतर्गत मेरा गाव मेरी पहचान,मेरा स्कुल मेरा अभिमाण या परियोजना प्रकल्पाची सुरुवात यशोदा धर्माजी निकुरे यांच्या मरण दिवसा निमित्य 26/11/2023 रोजी सुरुवात करण्यात आली या परियोजना मध्ये गावातील सर्व नागरीक व शाळेचे विद्यार्थी यांना आतापर्यंत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात 50 हजार स्टुडन्ट ला मोफत यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड वितरण करण्यात आले या कार्ड चा लाभ ऍक्सरे व प्लास्टर ला झालेला खर्चाला आर्थिक मदत म्हणून 50% रक्कम संस्था देणार त्यात नुकताच जिल्हा परिषद उच्छ प्राथमिक शाळा भवराळा ता. मूल,जी. चंद्रपूर या शाळेतील सातव्या वर्गातील विध्यार्थी अनार्य मनोज दुधे याच्या हाताला दिनांक 30/12/2024 ला अपघात झालेला आहे असे वर्ग शिक्षक व विद्यार्थी चे पालक मनोज दुधे यांनी माहिती दिली x-ray व प्लास्टर साठी काही आर्थिक खर्च झालेला आहे व आपण यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड च्या माध्यमातून आज दिनांक 03/02/2025 ला अर्धा खर्च विहान बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे व व्हॉइस चेअरमन सौ.मनाली कबिर निकुरे,व तनुष्का कबिर निकुरे यांनी काही आर्थिक नुकसानी चे भरपाई म्हणून अनार्य दुधे ला नगदी स्वरूपात आर्थिक मदद करण्यात आली,, संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे, व्हॉइस चेअरमन सौ. मनाली कबिर निकुरे, तनुष्का कबिर निकुरे व जिल्हा परिषद भवराळा शाळेचे प्रिन्सिपल एकनाथ गेडाम सर , शिक्षिका अनघा जक्कुलवार, देवांगणी सुरपाम, मनोज दुधे सर यांनी तर आपल्या शाळेत आपल्या मुलाला नेवून शिक्षण देत आहेत असे फार कमी बघायला मिळते आपल्या मुलाला आपल्याच शाळेत नेवून शिक्षण देणारे एकमेव शिक्षक मनोज दुधे यांना सॅल्यूट,,,,संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत नियमानुसार आर्थिक मदत देण्यात आली.
संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे है नेहमीच कुणाची ना कुणाची मदत करीत राहतात व 2008,पासून सामाजीक कार्यात सक्रीय आहेत हे सर्वांची गोरगरिब असो स्वास्थ ने खचलेले असोत हे मदत करित असतात. संस्थेच्या वतीने आतापर्यंत दुर्धर आजार ग्रस्तचे , जोडप्यांचे लग्न सुद्धा लावुन देतात कोरोना 2020 मधे गरीब लोकांना अन्न धान्य वाटून खूपच मोलाचे काम त्यांनी केले आहे.
हा आर्थिक मदत कार्यक्रम जिल्हा परिषद भवराळा शाळेच्या आवारात पार पाडण्यात आला यावेळी कार्यक्रमात उपस्थित विहान बहुउद्देशिय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे संस्थेचे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन
अहेरी:-
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनाच्या वतीने देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अशा गटप्रवर्तक यांच्या विषयी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात याव्या अशा मागणीची निवेदन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनातून आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा तसेच सामाजिक सुरक्षा लागू करावी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांच्या समावेश करण्यात आला आहे.
गडचिरोली : येथील फुले वार्डात नागरिकांच्या तक्रारी वरून आजाद समाज पार्टीने वॉर्डातील आयुष्यमान आरोग्य केंद्राला भेट दिली असता गेल्या 15 -20 दिवसापासून दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध नसल्याची माहिती उघडकीस आली. शहरातील इतर वार्डातील माहिती घेतली असता बरेचदा डॉक्टर च उपस्थित राहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर डॉक्टर आणि कर्मचारीच नाही तर शासनाने मोहल्ल्यात दवाखाना कशासाठी उघडला असा सवाल उपस्थित केला. शहरातील गोर, गरीब, मजूर, कामगार लोकांना तातडीने मोफत उपचार घेता यावा या करीता असे हॉस्पिटल शासनाने वार्डा वार्डात सुरु केले पण कर्मचाऱ्यांची अभावी ही दवाखाने ओस पडल्याचे चित्र शहरात आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे असल्याने आरोग्य विभागात मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकाच डॉक्टर ला 2 ते 3 दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे नागरिकांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लवकरच आजाद समाज पार्टी च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे या संदर्भात मागणी करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. दवाखान्यात भेटी दरम्यान जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार,, आशिष गेडाम, गडचिरोली शहर सचिव कैलास रामटेके उपस्थित होते.
पेट्रोल पंपावरील स्वच्छालय सामान्य लोकांच्या वापरासाठी आता खुले करण्यात आली आहे. याचा वापर करू न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची मनपाच्या आरोग्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी रिलायन्स पेट्रोल पंप शहरातील सर्व चालकांना बजावणी दिली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयाने तसे आदेश मानपा सर्व पालिकांना काढले आहे. देशभरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छालय हे सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहणार आणि यामध्ये अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कायदा मंत्रालय यांचे कडून आले आहे. ही अधिसूचना सर्व पेट्रोल पंप धारक मालकांना देण्यात आली आहे.
जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर
प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९ गड़चिरोली
मो. 9325766134
जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्ह्यातील युवकांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव देण्यासाठी देण्यात येतो. या पुरस्काराच्या माध्यमातून युवा विकासाचे काम करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन मिळते. जिल्हास्तर युवा पुरस्कार स्वरुप एक युवक व एक युवती यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम दिल्या जाते.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली द्वारा सन 2022 -23 या वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सदर पुरस्काराचे वितरण दि. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्ह्याचे सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री.ना.ॲड. आशिष जयस्वाल, यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी अविशांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रवींद्र सुनीता मोहन बंडावार यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नये व वेळेवर गरजू व्यक्तीला तात्काळ रक्तसेवा उपलब्ध होण्याच्या दृतिकोनातून त्यांनी जिल्ह्यात क्तदाता शोधमोहिम व जनजागृती अभियान गडचिरोली हा नवीन उपक्रम यांच्या संकल्पनेतून राबिण्याबाबत येत आहे. ज्यांना रक्ताची गरज भासली अशा आजपर्यंत त्यांनी 500 पेक्षा जास्त व्यक्तीला मदत केली आहे. सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमी मोलाचं वाटा असतो. निस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या अशा युवकाचा प्रशासनाने दखल घेवून त्यांची आज जिल्हा युवा पुरस्कार म्हणून निवड होऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे श्रेय आई-वडील, मित्र परिवार यांना दिलं आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू,वडीलांची तक्रार
राजुरा, ता. प्र. -राजुरा तालुक्यातील भेंडाळा या गावातील युवक समाधान दीनानाथ जीवतोडे, वय 20 हा युवक शेतात फवारणी करून घरी आला असता त्याची अचानक तब्येत बिघडली आणि त्याला तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिका-यांनी त्याच्याकडे एक तास दुर्लक्ष केले आणि नंतर त्याची प्रकृती गंभीर होताच सलाईन लावून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचवेळी या युवकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे गावकरी व नातेवाईक गोळा झाले आणि त्यांनी वैद्यकीय अधिका-यांना जाब विचारला. यावेळी रूग्णालयात पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर गावकरी व नातेवाईकांनी राजुरा पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार दाखल केली. आज दिनांक 23 जानेवारी ही घटना घडली.
समाधान हा युवक गावातून मोटरसायकल वर बसून आणि चालत बोलत रूग्णालयात आला. मात्र त्याचेवर परिस्थिती पाहून तातडीने त्याचेवर योग्य औषधोपचार झाला असता तर त्याचा जीव वाचला असता, परंतु येथील उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हेळसांड केल्यामुळेच आपल्या मुलाचा जीव गेला, असा आरोप समाधानचे वडील दीनानाथ जीवतोडे आणि गावकऱ्यांनी केला आहे. आपला मुलगा मरण पावल्यावर त्याला चंद्रपूर ला रेफर करण्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे राजुरा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येंने गावकरी जमा झाले आणि रूग्णालयातून प्रेत उचलण्यास विरोध केला. यानंतर राजुरा पोलिसांनी समजूत घालून नागरिकांना शांत केले. अखेर राजुरा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात वडील व नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. उशिरा या युवकाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर 7-30 वाजता प्रेत परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले.
समाधान हा गावातील अतिशय मनमिळाऊ आणि एकुलता एक मुलगा होता. त्याला वेकोलित भूमी अधिग्रहण झाल्याने लवकरच नोकरी मिळणार होती. या युवकाच्या अकस्मात मृत्यूने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. त्याच्यामागे आई वडील आणि दोन विवाहित बहिणी आहेत.
यासंदर्भात राजुरा उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. अशोक जाधव यांना विचारणा केली असता यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिका-यानी योग्य औषधोपचार केला. मात्र त्याला विषबाधा झाल्याने या युवकाला वाचवू शकलो नाही
वडलापेठ येथे गरोदर आणि बाळंतीण महिलांची आरोग्य तपासणी
अहेरी:-
महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वडलापेठ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. लूबना हकीम यांच्या नेतृत्वात किशोरवयीन आरोग्य आणि कल्याण कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता तसेच बाळंतीण झालेल्या मातांची तपासणी करण्यात आली आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी गरोदर मातांना घ्यावयाची काळजी आणि बाळंतीण महिलांनी स्वतः तसेच आपल्या नवजात बाळांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ लुबना हकीम यांनी मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी किशोवयीन मुलांच्या शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी जागरूकता,समुपदेशन व नियमित तपासणी यावर भर देण्यात आला.पोषण,स्वच्छता व पुनरुत्पादक बद्दल माहिती देण्यात आली.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मध्ये मातांना मिळणाऱ्या ५ हजार रोख रक्कम बद्दल, जननी सुरक्षा योजना मध्ये घरी प्रसूती न करता दवाखान्यातच प्रसूती करावी,पोषण अभियानामध्ये राष्ट्रीय पोषण अभियानाचे महत्व पटवून देत अंगणवाडी केंद्रातून मिळणाऱ्या पूरक पोषण आहाराचे महत्व सांगण्यात आले. त्याचप्रमाणे १०० दिवस टी बी कार्यक्रम यांबदल मार्गदर्शन करण्यात आले.
याच कार्यक्रमात मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून हळदी कुंकू चां आणि वान वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ लूबना हकीम यांनी नवजात बाळांसाठी स्वतः स्वखर्चाने दूध पावडर ची व्यवस्था करून दिली.
यावेळी RDK,रक्तदाब,हिमोग्लोबिन,ब्लड शुगर तपासणी,उंची वजन आदी तपासणी करण्यात आली.
यावेळी अधीपरीचारिका सिंग,महिला आरोग्य तपासिका गोगे,आरोग्य सहायक मुलकलवार तसेच वडलापेठ,चींतलपेठ आणि दिणाचेरपल्ली च्या आशा वर्कर उपस्थित होत्या.
हळदवाही येथे क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत एक्स-रे तपासणी शिबिर
प्रमोद झरकर/ उपसंपादक
घोट:-
प्राथमिक आरोग्य केंद्र घोट अंतर्गत उपकेंद्र हळदवाही येथे क्षयरोग मुक्त भारत अभियाना अंतर्गत एक्स-रे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
100 दिवस क्षयमुक्त भारत अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले या वेळी क्षयरोग या आजाराबद्दल माहिती देऊन , क्षयरोग लक्षणे , उपचार , तपासणी व त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले ,तसेच LCDC बद्दल माहिती देऊन कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र याविषयी डॉ. विवेक हजारे यांनी माहिती सांगून सर्वांनी अभियान कालावधीत आपले तपासणी करून घेण्यात यावे असे आवाहन केले.IDA कार्यक्रम माहिती देण्यात येऊन सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्याचा सेवन करावे जेणे करून हत्तीरोग आपल्याला होणार नाही तसेच निक्षयमित्र , प्रोटीन युक्त आहाराचे महत्त्व क्षयरोग रुग्णाला किती महत्वाचे आहे हे पटवून देण्यात आले . या वेळी सौ. निता पुडोजी सरपंच ग्रा. पं हळदवाही, डॉ. विवेक हजारे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र घोट , डॉ शितल चाटे (CHO), डॉ शिवानी खेडकर (MO MMU टीम ) विलास कुभारे जिल्हा क्षयरोग पर्यवेक्षक , एक्स- रे टीम सनजली क्षकिरण तज्ञ , मयुरी कोरीवार , निखिल मेश्राम , मनोज बागमारे क्षयरोग पर्यवेक्षक, विलास कस्तुरे आरोग्य निरीक्षक, पुरुषोत्तम चलाख आरोग्य पर्यवेक्षक , डेविड पेंद्राम ,सौ . ऐश्वर्या भैसारे,सूरज राहुलवार, व्यंकटेश गौरावार आरोग्य सेवक , धरती भडके आरोग्य सेविका , सौ. प्रीती उईके आरोग्य सेविका ,कू दिक्ष्या बावणे आरोग्य सेविका , दुषांत गेडाम वाहन चालक,आशा ताई जयश्री अलोने , इंदिराबाई मधमवार व इतर कर्मचारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
२ अस्वलांचा वाहनचालकावर हल्ला, ईसम गंभीर
चंद्रपूर:-
जिल्हा चारही बाजूने वन क्षेत्राने व्याप्त असल्याने सतत जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहेत. वन्य प्राणी जंगलातील अधिवास सोडून शहरी भागात येत असल्याने मानवी जीवनाला आता धोका निर्माण होत आहे.
चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन मधील अल्ट्राटेक ऐश लोडींग प्लांट जवळ २० जानेवारीला वाहन चालकावर २ अस्वलीनी हल्ला केला हि घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली, या हल्ल्यात वाहनचालक रघुनाथ यादव वय ५२ जखमी झाला आहे
सकाळी रघुनाथ यादव हे झुडपी भागात शौचासाठी गेले होते त्यावेळी अचानक २ अस्वलीनी त्यांच्यावर हल्ला केला, अचानक झालेल्या या हल्ल्याने यादव घाबरून गेले, त्यांनी काही वेळ अस्वलाचा प्रतिकार करीत आरडाओरड सुरु केल्याने कामगार वर्गाने तात्काळ यादव यांच्याकडे धाव घेतली. कामगार वर्ग आल्याने अस्वलीनी पळ काढला.
सीएसटीपीएस मध्ये दररोज असंख्य वाहने येतात मात्र ऐश प्लांट येथे वाहन चालकांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही, त्यामुळे हे चालक झुडपी भागात शौच करण्याकरिता जात असल्याने त्याठिकाणी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून यामुळे हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसटीपीएस मध्ये अस्वलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, या भागात सीसीटीव्ही लावण्यात आला आहे व अस्वल सीसीटीव्ही दिसून येतात, मागील २ महिन्यात तिघांवर अस्वलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले वाहनचालक रघुनाथ यादव यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सीएसटीपीएस मध्ये वनविभागाने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे.
संस्कृती सोबत आरोग्य,पोषण यांचे
प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्गदर्शन
डॉ.लुबना हकीम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव यांचा पुढाकार
अहेरी:- (अशोक खंडारे),
भारतीय संस्कृती मध्ये महिलांचा कार्यक्रम मकरसंक्रांत याला फार महत्त्व आहे.महिला विशेष सजून या दिवसात हळदी कुंकू साठी व वान वाटतात किंवा घ्यायला जातात मात्र अनेक विभागाच्या महिलांना कर्तव्यामुळे हा सण वेळेवर साजरा करता येत नाही विशेषतः आरोग्य विभाग च्या महिला या कर्तव्यावर असतात त्यामुळे प्राथमिक महागाव आरोग्य महागाव यांनी मकर संक्रांत संस्कृती साजरा करण्यासह महिलांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर, जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदन योजना यांची माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव च्या वैद्यकीय अधिकारी डॉ लूबना हकीम यांच्या संकल्पनेतून महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम तथा वाण वाटप करन्याची संकल्पना सुचली आणि याच कार्यक्रमात महिलांना,गरोदर मातांना,बाळंतपण झालेल्या मातांसाठी असलेल्या विविध योजनेची माहिती दिली.
ग्रामीण भागातील महिलांना व नागरिकांना आजही अनेक योजनांची माहिती नाही त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात त्यामुळे डॉ लूबना हकीम यांनी अनोखी संकल्पना राबवून महिलांना एकत्र करून मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे शून्य ते १ वर्ष वयोगट मध्ये मोडणारे लहान बालक,यांच्या साठी सकस आहार याची ही माहिती यावेळी देण्यात आली.उपस्थित महिलांना या वेळी वान ही देण्यात आले.
तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे ए.एन.एन व आशा वर्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.आरोग्य सेवेतील हे दुवे अत्यंत महत्वाचे असून ग्रामीण भागात ग्राउंड लेव्हल ला या काम करीत असतात त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला..
यावेळी महागाव चे सरपंच पुष्पा ताई मडावी पर्यवेक्षीका गोगे, ए एन एम डोंगरे, ए एन एम दुर्गे तसेच इतर आरोग्य कर्मचारी आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
वाघाने वनमजूरावर हल्ला करून केले ठार व मांडला मृतदेहाजवळ ठिय्या
बल्लारपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सोबतच मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे. या वन्यजीव संघर्षाच्या मालिकेत १४ जानेवारीला वाघाने एकावर हल्ला करीत ठार केले मात्र वाघ इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहाजवळ ५ ते ६ तास ठाण मांडून बसला होता. वनविभागाने वाघाला डार्ट मारत त्याला बेशुद्ध केले.
१४ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास बल्लारपूर वनपरिक्षेत्रात बांबू कंत्राटदार यांना वाटप करण्यात आलेल्या बांबू युनिट क्रमांक ५ राखीव वनखंड क्रमांक ४९३ मध्ये कामगार ५७ वर्षीय लालसिंग बरेलाल मडावी रा. जिल्हा मंडला राज्य मध्यप्रदेश हा बांबू निष्कासनाचे काम करीत होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने लालसिंग वर हल्ला करीत त्याला ठार केले.
घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र वाघ उलट वन कर्मचाऱ्यांवर धावण्याचा प्रयत्न करीत होता. वाघ मृतदेहाजवळ बराच वेळ बसून होता, बराच वेळ निघून गेल्याने वनविभागाने अतिशीघ्र दलाला पाचारण केले.
अतिशीघ्र दलाचे शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध केले, पशुवैधकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी वाघाची तपासणी करीत त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सदर वाघ हा नर असून तो ४ वर्षाचा आहे, वाघाला पुढील तपासणी साठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे नेण्यात आले असून मृत लालसिंग यांचा मृतदेह शवविच्छेदन करिता रुग्णालयात नेण्यात आला आहे सदर मृतकाचे नातलगांना वनविभागाने तत्परतेने कारवाई करुन आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे
त्रिवेणी कंपनीचे एमडी .बी. प्रभाकरण यांनी दिले मोफत हेल्मेट व जनजागृतीचा संदेश
आष्टी:- (अशोक वासुदेव खंडारे)
त्रिवेणी कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडच्या टेकड्यांवर तिन वर्षांपूर्वी लोहखनिज उत्खननाचे काम सुरू केले असून ते काम अजूनही सुरू आहे.
कंपनी जिल्ह्याच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करीत असून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छता सेवा पुरवत आहे. यासोबतच वाहतूक व्यवस्थित आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी वाहतूक मार्गावर विनोद कुमार यांच्या देखरेखीखाली बचाव प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे. रेस्क्यू रिस्पॉन्स टिम रस्ते अपघातांचा तपास करणे, जखमींना हॉस्पिटलमध्ये नेणे आणि वाहतूक व्यवस्थापनाचे कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील वर्षांत झालेल्या अपघातांचे विश्लेषण केल्यास असे दिसून आले की, बहुतांश अपघात हे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यामुळे आणि रस्त्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाले आहेत. या सर्व चुका लक्षात घेऊन त्रिवेणी कंपनीचे एमडी श्री.बी. प्रभाकरन यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात चार एलईडी व्हॅनच्या माध्यमातून लोकांना जनजागृतीचा संदेश दिला आणि मोटारसायकल स्वारांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करून आनंदी जीवन जगण्याचा सल्ला दिला.दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच वाहण चालवावे जेणेकरुन आपल्या जीवनात आनंदी आनंद राहील असा संदेश दिला आहे.
महागाव येथे क्षयरोग उच्चाटनसाठी जन जागृती रॅली
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
अहेरी:-
टी बी म्हणजेच क्षय रोगाच्या उच्चाटनासाठी १०० दिवस टी बी कार्यक्रम अंतर्गत महागाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे क्षयरोगाबाबत जनजागृती साठी भव्य रॅली काढण्यात आली.
टी बी प्रतिबंध,लवकर तपासणी,उपचार, समुपदेशन करून नागरिकांना या रोगाबद्दल माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम, प्राथमिक आरोग्य केंद्र च्या एएनएम गोगे,आरोग्य उपकेंद्राच्या ए एन एम सिंग,आशा वर्कर जिजा सडमेक,चालक दिनेश अलोणे तथा जिल्हा परिषद शाळा महागाव चे मुख्याध्यापक आत्राम तथा शिक्षक उपस्थित झाले होते.
रॅली ही संपूर्ण गावात काढण्यात आली आणि रस्त्यावरील घरोघरी माहिती देण्यात आली.
टी बी विषयी भीती न बाळगता त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे कारण योग्य औषध उपचार आणि चांगला आहार,योग्य काळजी याने टी बी आजार बरा होऊ शकतो.आणि रोग्याने कोणती खबरदारी घेतली तर तो इतरांना होणार नाही याबाबत डॉ लूबना हकीम यांनी विद्यार्थी तथा इतरांना मार्गदर्शन केले.