श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा
अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी:-
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग, प्रमुख अतिथी डॉ.अपर्णा मारगोनवार, डॉ. एम पी सिंग, डॉ. कश्यप, प्रा.सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग बारावीची विद्यार्थिनी रिया कर्मकारने हिने महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे, 'बेटी बचाओ,बेटी पढाओ चा' नारा आपल्या भाषणातून दिला. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी के सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की रासेयो विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जाऊन समाजातील निरक्षरांना साक्षर करण्याचे कार्य व समाजामध्ये असलेला अज्ञान तथा अंधश्रद्धा दूर करून समाजाला शिक्षित करण्याचे कार्य स्वयंसेवकांनी करावे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार रासेयो प्रमुख प्रा.सुबोध साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक नागापुरे, डॉ. सोनाली ढवस, डॉ.प्रकाश राठोड प्रा.महेशकुमार सीलमवार, प्रा. सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा.जया रोकडे, प्रा. कवींद्र साखरे, विजुभाऊ खोबरागडे,अविनाश जीवतोडे, संदीप मानापुरे,रवींद्र झाडे, रमेश वागदरकर, पोर्णिमा गोहणे आदींनी सहकार्य केले आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
IAS Interview Questions In Hindi: IAS इंटरव्यू में पूछे गए कुछ अनोखे सवाल और उनके हैरान कर देने वाले जवाब IAS परीक्षा, भारत की सबसे कठिन परीक्षाओं में से एक है, और इसका इंटरव्यू चरण विशेष रूप से चर्चित होता है। इस चरण में, उम्मीदवारों से कई प्रकार के सवाल पूछे जाते हैं, जिनमें से कुछ बेहद अनोखे और सोचने पर मजबूर करने वाले होते हैं। यहां हम कुछ ऐसे सवालों और उनके जवाबों पर चर्चा करेंगे जो इंटरव्यू के दौरान पूछे गए और जो बेहद दिलचस्प रहे।
ये सवाल और उनके जवाब न केवल सोचने पर मजबूर करते हैं बल्कि यह भी दर्शाते हैं कि IAS इंटरव्यू में प्रत्याशियों को किस तरह के अनोखे और चुनौतीपूर्ण सवालों का सामना करना पड़ सकता है।
कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
मंगळवेढा -; मंगळवेढा पंचायत समिती मार्फत सन २०२४-२५ मध्ये दिले जाणारे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील शिक्षिका श्रीमती कविता महादेव वाघमारे यांच्या सह २१ जणांना जाहीर झाले असून आज शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोड वरील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे शानदार समारंभात आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी रूपाली भावसार या भूषविणार असून गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी बिभिषण रणदिवे, शिक्षणविस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड व शामराव सरगर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गडचिरोली : जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये CTET व TET च्या नावाखाली जिल्ह्यातील बेरोजगार डीएड, बिएड धारकांना डावलून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्यात आले असून प्रसिद्ध झालेल्या यादीत 70 ते 80 टक्के बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देण्यात आल्याचे दिसून येते, हा जिल्ह्यातील बेरोजगारांवर पुन्हा एकदा अन्याय होत असल्याचा आरोप बेरोजगार संगठना व आझाद समाज पार्टी च्या वतीने करण्यात आला आहे. हा अन्याय जर थांबला नाही तर बेरोजगार संघटना निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उतरणार असेही यावेळी सांगितले.
त्यामुळे शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व खासदार हे कुणीही बेरोजगारांच्या प्रश्नावर बोलत नसल्याने यांचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे. जो पर्यंत शिक्षणमंत्री किंवा मुख्यमंत्री यांचेशी कॉन्फरेन्स वर बोलणे होणार नाही तो पर्यंत जिल्हा परिषदेच्या दरवाजातून हटणार नाही असा इशारा निवेदनातून सीईओ ना देण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, जिल्ह्यातील अनेक जण पात्र असून सुद्धा भोंगळ कारभारामुळे अपात्र यादीत नाव आले त्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील बेरोजगारांना घेऊन आझाद समाज पार्टी लढा देणार असे आवाहन करत, 5 सप्टेंबरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने जनतेने सहभागी होण्याचे आवाहन बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी ने केले.
यावेळी निवेदन देताना उपस्थित बेरोजगार युवकांसोबत आसपाचे प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रवक्ते प्रितेश अंबादे, शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे. आदी उपस्थित होते..
-------------------
दि. 02 सप्टेंबर 2024
*राज बन्सोड*
जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी
गडचिरोली
8806757873
शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड दिल्यास मोठे यश - आमदार डॉक्टर देवरावजी होळी
दिनांक ३१ ऑगस्ट गडचिरोली
विद्यार्थी ,युवक युवतिंनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानार्जना सोबतच विद्येची देवता माता सरस्वती व आध्यात्मिकतेला आदर्श ठेवून विद्यार्जन केल्यास शिक्षणात तसेच जीवनात नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना मार्गदर्शन करताना केले.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री शेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन दादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये कात्रटवार सभागृह गडचिरोली येथे आयोजीत करण्यात झाला. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या समारंभाला उपस्थित राहून सोहळ्यामध्ये सहभाग घेतला.
यावेळी ते म्हणाले की, आजची पिढी वाईट व चुकीच्या दिशेने जात असल्याचे आपणाला दिसून येत आहे. ही पिढी केवळ भौतिक वादाला महत्त्व देत आहे. त्यामूळे विद्यार्थी युवक तरुण तरुणी चुकीच्या मार्गाला जात आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्मिकतेचे महत्त्व समजावून सांगने आवश्यक आहे. त्यांना शिक्षणासोबतच अध्यात्मिकतेची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे. करिता आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपण सर्वाँनी आध्यात्मिकतेला महत्व द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना केले.
Gadchiroli News: जुलै 2024 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीसाठी रणजीत सर मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आणि विहान फाऊंडेशन संचलित स्वराज व वीरांगना अकादमीने 450 उमेदवारांना मोफत शारीरिक शिक्षण व शिकवणी दिली. या विशेष योजनेचा लाभ घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींनी पोलीस भरतीमध्ये उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे.
या शिक्षण व प्रशिक्षणामुळे 150 पेक्षा जास्त उमेदवारांची महाराष्ट्र पोलिसांत निवड झाली आहे. त्यांच्या यशस्वीतेचा उत्सव 18 ऑगस्ट 2024 रोजी सेमना हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गडचिरोली नगरपरिषदेचे माननीय मुख्याधिकारी सूर्यकांत पिंडुरकर, चेअरमन कबीर यशोदा धर्माजी निकुरे, रणजीत सर, आकाश संगनवार, दिनेश देशमुख, मेनीराम सर आणि विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
विहान बहुउद्देशीय संस्था गरीब, सुशिक्षित, बेरोजगार आणि गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी विविध योजना राबवत आहे. संस्थेच्या पहिल्या टप्प्यात पोलीस भरतीसाठी 450 मुला-मुलींना मोफत शिक्षण दिले गेले. याचा परिणाम म्हणून 150+ नवीन महाराष्ट्र पोलिसांची निवड झाली आहे.
हे यश गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी केलेल्या कठोर परिश्रमांचे आणि विहान बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नांचे प्रमाण आहे. यामुळे स्थानिक युवक-युवतींना उत्तम संधी मिळाल्या आहेत आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक आदर्श उदाहरण स्थापन झाले आहे.
निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
गडचिरोली : जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद शिक्षक भरतीवर जिल्ह्यातील डीएड -बिएड झालेले बेरोजगार प्रचंड नाराज असून आज दि. 27 ऑगस्ट रोजी गडचिरोली येथील संविधान सभागृहात बेरोजगारांच्या वतीने सहविचार बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अध्यक्ष म्हणून निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धर्मानंद मेश्राम होते तर अतिथी म्हणून युवा कार्यकर्ते राज बन्सोड, विनोद मडावी, पत्रकार रेमाचंद निकुरे, अंकुश कोकोडे उपस्थित होते.
सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीविषयी बेरोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून गडचिरोली जिल्हा हा मागास जिल्हा आहेचं पण रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा दुर्मिळ आहे. अशात शिक्षक भरतीमध्ये बेरोजगाराना डावलून सरकार निवृत्त लोकांना घेत आहे आणि इतर जिल्ह्यातील अर्ज मोठ्या प्रमाणात येत असल्याने जिल्ह्यातील युवकांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बेरोजगार आता आक्रमक झाले असून जिल्हा भरातून बेरोजगार मुले एकत्रित येऊन डीएड -बिएड बेरोजगार संघटनेची स्थापना करून महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या विरोधात 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनी डोळ्यावर काळ्या फिती बांधून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरु करणार आहेत. बैठकीत निवृत्त शिक्षकांना रुजू न होऊ देण्यासाठी गावागावात जाऊन ग्रामसभा व ग्रामपंचायतला ठराव घेण्यासाठी युवक आवाहन करणार असून विशेष मागास जिल्हा म्हणून भरती प्रक्रियेत ctet व tet परीक्षेची अट शिथिल करून जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य द्यावे, बाहेरचे उमेदवार घेऊ नये याकरिता लक्षवेधी लढा उभा करण्यात येईल असे ठरविण्यात आले.
जर जिल्ह्यातील बेरोजगारांचा विचार न करता बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना घेण्यात आले आणि सेवानिवृत्त शिक्षक भरती रद्द करण्यात नाही आली तर, आगामी निवडणुकीत बेरोजगार युवक प्रस्थापित भाजपा आणि काँग्रेस ला मतदान करणार नाही व वेळ आल्यास निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवकांना 5 सप्टेंबर च्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्यातील विविध तालुक्यातील बेरोजगार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भाग असलेल्या महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील जाजावंडी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक मांत्तय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यात बेंडके सरांचा समावेश आहे.. कायम नक्षल्यांच्या वावर असलेल्या या गावातील शाळेत खुप कमी पटसंख्या होती.. मात्र बेंडके सरांनी या गावातील व लगतच्या गावातील पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली व शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली.. दिवसभर जंगलात हुंदडायची सवय असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून शाळेत नियमित येण्याची सवय रुजविली.. व विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण केली... आज त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.. त्याबद्दल त्यांचें अभिनंदन
चिमूर -
नेहरू विद्यालय व कनीष्ठ महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात २७ ऑगस्ट मंगळवार ला प्रश्न विद्यार्थ्यांची उत्तरे आमदारांची एक आगळा वेगळा कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयील विद्यार्थ्यांशी आमदारांचा जनसंवाद पार पडला. यात महाविद्यालयातील पासष्ठ विद्यार्थ्यांनी आमदार बंटी भांगडीया यांना प्रश्न विचारले.
विद्यार्थ्यांनी चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांना शिक्षण, आरोग्य, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील जनतेशी निगडित न कंटाळता तब्बल चार तास विद्यार्थ्यांनी बसून प्रश्न विचारले असता हसत खेळत आमदारांनी विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे दिली. एका विद्यार्थीनीने चिमूर क्रांती भुमी विषयी आपले स्वप्न काय आहे असा प्रश्न विचारला असता आमदार बंटी भांगडिया यांनी उत्तर देत सांगितले की प्रथम चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे, कांपा चिमूर वरोरा रेल्वे मार्ग,चिमूर ला जलमार्ग हब हेच स्वप्न असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष घालून मोठे व्हावे अश्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर प्राचार्य निशिकांत मेहरकुरे उपस्थित होते. संचालन लोंढे तर आभार वाघधरे यांनी व्यक्त केले. दरम्यान भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,जेष्ठ नेते घनश्याम डुकरे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय नवघडे, किशोर मुंगले, जयंत गौरकर,श्रेयस लाखे, अमित जुमडे, गोलू मालोदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली होती.
Gadchiroli News: समीर मनोज बनपुरकर, पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, आरमोरी येथील दहावीचा विद्यार्थी, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या प्रेरणा उत्सवात जिल्ह्यातील सर्वोत्तम ठरला आहे. जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे आयोजित या स्पर्धेत समीरने पहिला क्रमांक मिळवून, आपल्या कौशल्याचा ठसा उमठवला आहे. या यशामुळे त्याला दिल्ली आणि वडनगर येथे विशेष प्रशिक्षणाची संधी प्राप्त झाली.
समीरला १५ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले. या ऐतिहासिक कार्यक्रमात, त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सहभाग घेतला. यानंतर, १६ ऑगस्ट २०२४ रोजी समीरला प्रेरणा उपक्रमाच्या अंतर्गत नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, ज्यातून त्याला विविध विषयांवर चर्चा करण्याची आणि प्रेरणा मिळवण्याची अनमोल संधी प्राप्त झाली.
हे देखील वाचा : Kids Tips: सावधान ! मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची गती होत आहे कमी
समीरच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, आणि शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्याच्या या यशामुळे आरमोरी तालुका आणि गडचिरोली जिल्हा गौरवशाली बनला आहे. समीरने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.
समीरचा हा प्रवास एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जो फक्त त्याच्यासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी गौरवशाली ठरला आहे.
हे देखील वाचा : ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये फसवणुकीचा धोका: हे App तुमचे बँक अकाउंट करणार खाली, जाणून घ्या माहिती
गडचिरोली/ 14:- गडचिरोली जिल्ह्यातील पेसा संवर्गातील जिल्हा परिषदांच्या गडचिरोली शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी शासन परिपत्रक 15/ 07/2024 नुसार या कार्यालयास अर्ज सादर केलेल्या पात्र सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देऊन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे उपस्थितीत समुपदेशाने पदस्थापना देण्याचे निश्चित केलेले आहे. तरी आपले पंचायत समितीस अर्ज सादर केलेल्या सोबतच्या यादीतील सेवानिवृत्त शिक्षकांना दिनांक 16/08/2024 रोजी सकाळी 10:00 वाजता विर बाबुराव शेडमाके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली येथे न चुकता संपूर्ण मुळ दस्तावेजासहित उपस्थित राहण्यास आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे. तसेच तालुक्या अंतर्गत पेसा क्षेत्रातील शाळांतील माहे जून 2024 अखेर रिक्त पदांचे माहितीसह आपण स्वतः न चुकता उपस्थित राहावे. प्रतिनिधी पाठवु नये.
जर मनुष्याचा खऱ्या अर्थाने बौद्धिक विकास झाला तरच त्याचा सर्वांगीण विकास होवू शकतो. समाजात काही असेही काळजीवाहू साहित्यिक आहेत की ते त्यांच्या साहित्य कृतींतून समाजाचे कल्याण करू पाहतात. एक जागरूक नागरिक या नात्याने आपला आजूबाजूचा परिसर व तेथील लोकं यांचे ते बारकाईने निरीक्षण करीत असतात. ते निरीक्षण करतांना समाजातील काही अनिष्ट चालीरीती, परंपरा, प्रथा, अंधश्रद्धा यात गुरफटलेल्या जनतेला उपदेश करून त्यांचे खरे हित कशात आहे हे सांगण्यासाठी वेळोवेळी त्यांना सचेत करून त्यांना चांगल्या मार्गाकडे नेण्याचे कार्य काही 'डोळस' साहित्यिक करीत असतात. साहित्यिकाला समाजाचे भान असणे आवश्यक आहे. समाजातील वास्तविक परिस्थिती दर्शविणारे आणि अन्यायाला वाचा फोडणारे साहित्यच उत्तम दर्जाचे साहित्य ठरू शकते.
गडचिरोली येथील निवृत्त शिक्षक श्री. उपेंद्र रोहनकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते आहेत. नुकताच त्यांचा "डोळस व्हायचं" हा कवितासंग्रह "झाडीबोली साहित्य मंडळाच्या" साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. समाजाचे अवलोकन करतांना समाजातील अनेक घटनांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. समाजात दिसून येत असलेली अंधश्रद्धा ही कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. त्याने समाजाची प्रगती साधली जाऊ शकत नाही. आजची तरुण पिढी दारू, खर्रा, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अंमली पदार्थ याच्या जीवघेण्या भोवऱ्यात गटांगळ्या खात आहे. त्यांना वेळीच मार्गदर्शन मिळाले तरच ते यातून बचाव करू शकतील अन्यथा पुढची पिढी आजच नष्ट होऊन जाईल. अनेक परंपरांच्या विळख्यात सापडलेल्या भगिनींना त्यातून बाहेर काढायचे असेल तर त्यांना विज्ञानाचा मार्ग दाखवून डोळस बनवावे लागेल. बुवाबाजी व कर्मकांडापासून त्यांना परावृत्त करावे लागेल. या दृष्टीकोनातून साकारलेल्या कवी उपेंद्र रोहनकर यांच्या कविता खरोखरच नवी परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या आहेत. व्यभिचार, बलात्कार, ग्रामीण समस्या, शिक्षण, शेती, इ. समस्यांवर देखील त्यांनी कवितांतून प्रकाश टाकला आहे. महिलांचे अज्ञान दूर करण्यासाठी साकारलेल्या कविता या विशेष उल्लेखनीय म्हणाव्या लागतील.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.नरेंद्र दाभोलकर अशा कितीतरी महान समाजसुधारकांनी समाजाला 'डोळस' बनविण्यासाठी प्रयत्न केले परंतु आताच्या आधुनिक युगातही समाजाची पाहिजे तशी वैज्ञानिक व वैचारिक प्रगती झाली नाही ही येथील शोकांतिका आहे. भारतीय समाज जागृत झाला नाही तर तो कायमच अंधाऱ्या गुहेत भटकत राहील.
अतिशय चिंतन मनन करून लिहिलेल्या कविता कवीचे संवेदनशील अंतर्मन दाखवते. समाजाबद्दलची कळकळ व तळमळ अनेक कवितांतून प्रकर्षाने जाणवते. "डोळस व्हायचं" हा कविता संग्रह खरोखरच प्रशंसनीय असून वाचणारा प्रत्येक व्यक्ती हा 'डोळस' झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते.
सौ. सुनिता तागवान
कवयित्री, लेखिका, समीक्षिका, सामाजिक कार्यकर्ती
संस्थापिका, रचना प्रकाशन संस्था
आरमोरी जिल्हा गडचिरोली.
Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी फाऊन्डेशनने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला, फाऊन्डेशनच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येते. या उपक्रमामुळे मुलांना आवश्यक शिक्षणसाहित्य मिळते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाची गती वाढते आणि पालकांवरील आर्थिक भार कमी होतो.
2024-2025 या शैक्षणिक सत्रात, फाऊन्डेशनने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील टेका, कोहका, कोकोबंडा, आणि जवेली बुजूर्ग या आदिवासी खेड्यांमधील जिल्हा परिषद शाळांमधील 119 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्कुल बॅग, नोटबुक्स, पाटी, पेन्सील, पेन, स्केल, शार्पनर, खोडरबर अशा आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
फाऊन्डेशनचा हा उपक्रम वस्तू व सेवाकर (GST) कार्यालय, पुणे येथे कार्यरत असिस्टंट कमिशनर्स, तसेच श्रीमती नयना मांडके, कर सल्लागार, दादर मुंबई यांच्या आर्थिक मदतीने राबवला गेला. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची साधने उपलब्ध झाली, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात मोठी प्रगती झाली आहे.
या शैक्षणिक सत्रात फाऊन्डेशनने 9 शाळांमधील एकूण 309 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील शिक्षणाबद्दलची आवड वाढली आहे आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
फाऊन्डेशनच्या या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्वल होण्याची आशा आहे. यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या सर्व सन्मानीय व्यक्तींचे फाऊन्डेशनच्या वतीने आभार मानले आहेत. समाजातील अशा उपक्रमांमुळे शिक्षणाची नवी दिशा मिळत असून, यामुळे विद्यार्थ्यांना अधिक उज्ज्वल भविष्याची संधी मिळत आहे.
Chandrapur News: चंद्रपूर: निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्र, गडचिरोलीची विद्यार्थिनी कु. कल्याणी राष्ट्रपती सोनुले, मु.ताडाळा , तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर, यांनी पोलीस शिपाई भरतीत महिला उमेदवारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे, निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्राचे नाव आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
हे देखील वाचा : Success Story : Uday Krishna Reddy की UPSC 2023 में सफलता की दिल छूने वाली कहानी
कु.कल्याणी राष्ट्रपती सोनुले यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि शिक्षणाच्या पाठिंब्यावर हा मान प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल निर्मल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक व मार्गदर्शक श्री.सूरज गोर्लावार सर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.