PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday   

PostImage

तिला अनेकदा चांगली स्थळे आली. परंतु, तिने नकार देऊन सागरची …


नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वर्गमैत्रिणीसह प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियकराने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पीयूषा वेळकर (२६, नवीन कामठी) असे मृत युवतीचे नाव आहे. तर सागर राजू करडे (३०, कन्हान) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूषा ही नवीन कामठीत आईवडील आणि भावासह राहते. तिचे वडील व्यवसाय करतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख वर्गमित्र सागर करडे याच्याशी झाली. दोघांची मैत्री झाली. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असताना सागरने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही होकर दिला. दोघांनीही कुटुंबियांची परवानगी घेऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही कुटुंबियांशी प्रेमविवाहाबाबत विचारणा करण्याचे ठरविले. दोघांचेही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्न केल्यानंतर जगायचे कसे? असा प्रश्न करीत नोकरी लागल्यावर कुटुंबियांशी चर्चा करुन लग्न ठरवू, असे सांगून पीयूषाची समजूत घातली. पीयूषा एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली तर सागर मुंबईला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला लागला.

 

 

 

लग्नाचा तगादा आणि प्रियकराची टाळाटाळ

पीयूषा आणि सागर दोघेही नोकरी करीत असल्यामुळे आता लग्नाला कुणी विरोध करणार नाही, अशी धारणा ठेवून सागरकडे लग्नाचा तगदा लावत होती. मात्र, सागर वेगवेगळी कारणे देऊन लग्नास टाळाटाळ करीत होता. प्रियकराची लग्नास टाळाटाळ बघता पीयूषा नैराश्यात गेली. तिने नोकरी सोडून दिली आणि घरी राहायला लागली. यादरम्यान, तिला अनेकदा चांगली स्थळे आली. परंतु, तिने नकार देऊन सागरची वाट बघण्याचे ठरविले.

 

 

प्रियकराचा नकार अन् प्रेयसीची आत्महत्या

१० डिसेंबरला पीयूषाने सागरला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी सागरने तिला थेट लग्न करण्यास नकार देऊन चांगला मुलगा बघून लग्न करण्याचा सल्ला दिला. कुटुंबियांनी लग्न करण्यास नकार दिल्याचा बहाणा सागरने करीत पुन्हा लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीयूषा आणखी नैराश्यात गेली. ती अबोल झाली. तिने ‌वडिलांकडे सागरबाबत सांगून त्याच्या आईवडिलांना लग्नाबाबत विनंती करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, सागरने लग्न करण्यास नकार देऊन संबंध संपल्याचे सांगितले. त्यामुळे पीयूषाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. सागरने प्रेमात दगा दिल्यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे तिने आईकडे बोलून दाखवले होते. आईने तिला धीर देऊन सांत्वन केले होते. मात्र, पीयूषाने २९ डिसेंबरला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी सागरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday   

PostImage

देसाईगंज: अन् भल्या मोठ्या वाघाने मागेहून हल्ला चढवला


 

देसाईगंज (गडचिरोली):- देसाईगंज नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या जुनी वडसा येथील शेतकऱ्यास ऐन मकरसंक्रांती सणाच्या दिवशी म्हणजेच आज, मंगळवारी १४ जानेवारीला सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान वाघाने हल्ला चढविल्याची घटना जुनी वडसा येथील शेतशिवारात घडली. गणपत केशव नखाते वय ४६ वर्षे, रा. जुनी वडसा, ता. देसाईगंज असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, शेतकरी गणपत नखाते हे आज सकाळच्या सुमारास नेहमी प्रमाणे गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर गेले होते. अशातच शेतावर कामे करीत असतांना गणपत यांचेवर अचानकपणे भल्या मोठ्या वाघाने मागेहून हल्ला चढवला. हल्ला चढवताच त्यांनी आरडा ओरड केली. आरडा ओरड करताच परिसरातील शेतकरी तसेच मकरसंक्रांती सणा निमित्त नदी तीरावर जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धावघेतली

घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाल्याने वाघाने जुनी वडसा शेतशिवारातून कुरुड गाव परिसराकडे धूम ठोकली. घटनास्थळावर काहीकाळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. जखमी शेतकऱ्यास नागरिकांनी तात्काळ देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वाघाने मागेहून हल्ला चढवत गणपत नखाते यांच्या पाठी मागील खालील भागावर पंजा मारून जखमी केले आहे. सदर घटनेची माहिती देसाईगंज वन विभागास देण्यात आली. त्यानुसार वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी धोंडणे, वनक्षेत्र सहाय्यक के. वाय. कऱ्हाडे सह वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचेकडून वाघावर पाळत ठेवण्यात येत आहे.

 

ऐन मकरसंक्राती सणाच्या दिवशीच वाघाने हल्ला चढवून शेतकऱ्यास जखमी केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वाघाचा बंदोबस्त करून जखमी शेतकऱ्यास वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी केली जात


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने …


फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

 


अहेरी:-
 'फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी वय २२ रा. मालेगाव जि. नाशिक असे आरोपीचे नाव आहे. अहेरीच्या एका १४ वर्षीय मुलीची त्याच्याशी फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटींग व्हायची. त्यानंतर फोनवरुन बोलणे सुरु झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने ११ जानेवारीला नाशिकहून अहेरी गाठले. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. यावेळी त्याने मुलीच्या घरी मुक्काम करुन अत्याचार केला.
दरम्यान, सकाळी काही लोकांना पीडित मुलीच्या घरी अनोळखी तरुण असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी मुलीच्या घरातून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवून कलम ६४० (१),६५ (१) भारतीय न्याय संहिता, सह कलम ४,६ लैंगिक अपराधा पासून बालसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या घटनेमुळे अहेरीतील पालकांना धक्का बसला आहे. आरोपी मोहम्मद सौद अन्सारीला १३ जानेवारी रोजी अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातही 'ऑनलाईन'चा विळखा

एरवी समाज माध्यमावर झालेल्या ओळखीतून अत्याचार झाल्याचा घटना शहरी भागात दिसून येतात. मात्र, याचे लोन गडचिरोलीतील ग्रामीण भागातही पसरल्याचे चित्र आहे. अहेरीतील घटनेने पालकांना धक्का बसला आहे. यापूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहे. मधल्या काळात वृद्धांचीही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. परंतु आता यामाध्यमातून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात येत आहेत
यातील केवळ काहीच प्रकरणाचा उलगडा होतो तर अनेक प्रकरणात सामाजिक प्रतिष्ठेमुळे पालक तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन पाल्यांना मोबाईल देत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून केल्या गेले आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday   

PostImage

उद्घाटन करून येताना अपघाती मृत्यू


 

 एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन करून एकरा गावाहून परतताना दुचाकीला अपघात झाला. यात एटापल्लीचे माजी उपसरपंच अभय उर्फ पापा वसंतराव पुण्यमूर्तीवार (५४) यांचा मृत्यू झाला. ही घटना १२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता एकरा गावाजवळ घडली.

 

एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर एकरा गावात होत आहे. याचेउद्घाटन १२ रोजी करण्यात आले. अभय उर्फ पापा पुण्यमूर्तीवार यांना निमंत्रण होते. उद्घाटन कार्यक्रम आटोपून ते दुचाकीवरून एटापल्लीला परतत होते.

 

अपघातानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला हलविले, पण पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात.

 

वडिलांनंतर मुलाचाही महिनाभरात मृत्यू •

 

अभय उर्फ पापा पुण्यमूर्तीवार यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांचे महिनाभरापूर्वीच वृध्दापकाळाने निधन झाले होते. पाठोपाठ मुलाचाही अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुसरा आघात झाला. त्यांच्यावर १३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मोठी कन्या त्रतू हिने अग्निडाग दिला.

 

 


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

दुचाकीची कट मारुन, दोन तरुणांवर धारदार शस्त्राने केला हल्ला, दोन्ही …


दुचाकीची कट मारुन, दोन तरुणांवर धारदार शस्त्राने केला हल्ला, दोन्ही तरुण गंभीर 

चंद्रपूर :

दुचाकीची कट लागल्याच्या वादातून ३ जानेवारी रोजी तन्मय जावेद शेख याची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याची शाई वाळत नाही तेच काल १२ जानेवारी ला कट लागल्याच्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात दोन जण जखमी झाल्याची घटना चंद्रपुरात घडली.

जटपुरा गेटकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकी चालकाने कट मारले. यावरून वाद झाल्यानंतर कट मारणाऱ्यानी दोन जणांवर धारदार शस्त्राने वार करून दोघांना जखमी केले. ही घटना गिरनार चौकात १२ जानेवारी ला रात्री १०.३० वाजता घडली. शहर पोलिसांनी हल्लेखोर आकाश येलेवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर साहिल चंद शेख (३३) रा. इंदिरा नगर पंचशील चौक चंद्रपूर हा त्याचा मित्र राहुल गजानन वानखेडे (३०) रा. बालाजी वॉर्ड याच्यासोबत त्यांच्या दुचाकीने गांधी चौकाकडे जात असताना आकाश सुधाकर येलेवार, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर हे गांधी चौकाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीने कट मारले. साहिलने त्याला अडवल्यावर त्याने शिवीगाळ केली. यावरून त्यांच्यात वाद झाला असता आकाशने साहिलच्या पोटावर व डाव्या खांद्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. राहुल त्याला वाचवण्यासाठी पुढे आला असता त्याच्या पोटावरही वार करण्यात आल्याने दोघेही जखमी झाले. तेथे जमलेल्या जमावाने हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. जखमीचा तक्रारी वरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे शहर पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध कलम ११८ (१), २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक गुरनुले तपास करत आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 13, 2025   

PostImage

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी


 

चंद्रपूर, ब्युरो. नागभीड वनपरिक्षेत्रातील रण (परसोडी) परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना पारडी (थावरे) गावातील कोसंबी बीट येथील मिंडाळा सर्कलमध्ये शुक्रवारी (दि.10) दुपारच्या सुमारास घडली. गुरुदेव पुरुषोत्तम सराय (42) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

 

शुक्रवारी दुपारच्या सुमारास गुरूदेव सराय हे शेतात काम करीत असताना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ ब्रह्मपुरी येथील

 

खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 13, 2025   

PostImage

दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला


 

गडचिरोली : तालुक्यातील गोगाव व गुरवळा येथे दोन वेगवेगळे अपघात घडले. या अपघातांमध्ये दोघे जागीच ठार झाले, तर एकटा जखमी झाला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम अतिशय गतीने सुरू आहे. रेल्वेमार्गासाठी लागणारे साहित्य गोगाव येथे ठेवले जातात. त्यानंतर ते आवश्यकतेप्रमाणे नेले जाते. शुक्रवारी रात्री ८ वाजता कठाणी नदीकडे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने लोखंडी सळाखी नेल्या जात होत्या.

 

दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अगदी रस्त्याच्या बाजूला उलटला. यात ट्रॅक्टरचालक

तारीकुल अशरफपुल हक (१९, रा. पश्चिम बंगाल) हा जागीच ठार झाला, तर ट्रॅक्टरवर बसलेला कबीर उल इसाइत अली (२३, रा. पश्चिम बंगाल) हा जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 

दुसरा अपघात गडचिरोलीपासून चार किमी अंतरावर गुरवळा मार्गावर शुक्रवारी सकाळी १० वाजता घडला.

 

अपघातात झाली वाढ

 

२०२४ डिसेंबरअखेर तसेच २०२५ च्या जानेवारी महिन्यात गडचिरोली शहर परिसरात अपघाताची मालिका सुरू आहे. डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले. तर काही जणांचा बळी गेला. नियम मोडल्याने अपघात होतात.

 

गुरवळा येथील विनोद मुखरू तुनकलवार (४०) हे दुचाकीने गडचिरोली येथे येत होते. दरम्यान विरुद्ध दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने विनोद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत विनोद हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 13, 2025   

PostImage

अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म


 

कोरची : तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे, अत्याचारग्रस्त अल्पवयीन पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर सदर घटना उघडकीस आली आहे. यानंतर पीडितेनी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनंतर आरोपी फरार झाला आहे. विशेष म्हणजे, पंधरवड्यात कोरची तालुक्यातील ही दूसरी घटना असून तालुक्यातील एकाच गावातील दोन पीडित आहेत.

 

प्रवीण महेश मडावी (२०) रा. कोटरा, तालुका कोरची असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीशी ओळख करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली. तिला ग्रामीण रुग्णालय चिचगड भरती करण्यात आले. येथे तिने एका निरागस बाळाला जन्म दिला आहे असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मुलगी गोंदियाजिल्ह्यातील चिचगड रुग्णालयात प्रसूत झाल्यामुळे चिचगड पोलिस ठाण्यात कलम ३७६ (१) सहकलम ४, ६ पोस्को अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सध्या पसार आहे. कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार हे पुढील तपास करीत आहेत.

 

गोंदिया येथे उपचार सुरू

 

अत्याचार झाला त्यावेळी मुलगी १७ वर्षांची होती. आता मात्र, १८ वर्ष पूर्ण झाले आहेत. अत्याचाराच्या वेळी वय कमी असल्याने पोलिसांनी पोक्सो दाखल केला आहे.

 

 

 

 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 13, 2025   

PostImage

13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक झाली जवाहर …


 13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक झाली जवाहर नवोदय विद्यालय शिक्षकाची 


• यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है. यह नॅशनल सिक्रेट है असे म्हणत लाखो रूपाचा गंडा घातला आहे.

गोंदिया, दि. 13 जानेवारी: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका शिक्षकाची बनावट पोलीस अधिकाऱ्याकडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे घडला असून या प्रकारामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सविस्तर प्रकरण काय आहे ते समोर पाहूया.

नवेगावबांध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादि भोजलाल रामलाल लिल्हारे वय 51 वर्ष शिक्षक, रा. लवेरी तालुका- किरणापूर जिल्हा- बालाघाट ह. मु. जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध, तालुका अर्जुनी मोर. जिल्हा गोंदिया असे असून यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे, प्रकाश अग्रवाल असे आरोपीचे नाव असून यांचे मोबाईल क्रमांक - 82578 85667 असे असून त्यांनी दिनांक 26/12/24 रोजी पासून फसवणूक केल्या प्रकरणी नवेगावबांध पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये तक्रार दिनांक 10/1/2025 रोजी दाखल करण्यात आली आहे.

आरोपी प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 8210107669 वर फोन करून व्हाट्सअप कॉल वरून फिर्यादीस मैं पी.ओ. प्रकाश अग्रवाल बॅच नंबर- 3378 क्राईम ब्रांच मुंबई से बात कर रहा हूं। आपके नाम पर मुंबई ठाणे मे ईलिगल एडोटाइजमेंट अँड हरासमेंट का केस दर्ज है! और आपके नाम से कॅनरा बँक मे खाता खोला गया है.

और नरेश गोयल ने 2 करोड रुपये अकाउंट से फ्रॉड किया है! जिसके आप 148 वे सस्पेक्ट हो. जिसका 20% कमिशन आपको दिया है. इसलिये आप अपने सभी खातो की जानकारी दो उनकी जाच होगी, और ये पैसा आपका सायबर सेफ कस्टडी खाता मे ट्रान्सफर करना होगा! ट्रान्सफर नही किये, तो आपको मुंबई क्राईम ब्रांच मे आना होगा. या तो फिर आपको अरेस्ट करके लायेंगे, तो आपकी क्या इज्जत रह जायेगी, सही पाया गया तो आपके पैसे वापस हो जायेंगे. यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है. यह नॅशनल सिक्रेट है.

तुम अभी के अभी एन. आय. खाते मे पाच लाख रुपये ट्रान्सफर करो असे आरोपीने मी लोकसेवक आहे असे बतावणी करून बनावट अरेस्ट वॉरंट मोबाईल व्हाट्सअप वर दाखवून बोलल्याने फिर्यादीने दिनांक : 28/12/2024 ला 5 लाख रुपये दिनांक : 27/12/24 ला 4 लाख 68 हजार रुपये व 99 हजार रुपये दिनांक 28/12/24 ला तसेच 2 लाख 77 हजार रुपये असे एकूण 13 लाख 44 हजार रुपये आरोपीने सांगितलेल्या बँक खाते क्रमांक वर पाठविले असल्याची माहिती दिली आहे.

तर मोबाईल क्रमांक 8257885567 चा धारक इसम नामे प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीस अरेस्ट करण्याची धमकी देऊन फिर्यादीची एकूण 13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक केली आहे, असा फिर्यादीच्या तोंडी तक्रार वरून आरोपीचे कृत्य वरील कलमान्वये होत असल्याने आरोपी विरुद्ध अप क्रमांक : 03/2025 कलम 336 (2), 319 (2), 318 (4), 340 (1), 340 (2), 204, 351 (2) भा. न्या. स. 2023 सह कलम-66 (D) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून नवेगावबांध पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 11, 2025   

PostImage

मोहटोलात गावठी दारूअड्डा उद्ध्वस्त


 

आरमोरी : तालुक्यातील मोहटोला येथेगावठी दारुअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ९ जानेवारीला केली.

 

राजेंद्र संपत कुमरे (३६, रा. मोहटोला ता. आरमोरी) याने शेतात मोहफुलांची दारू बनविण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या पाच ड्रममध्ये सडवा टाकला होता. याबाबत आरमोरी पोलिसांना माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकला. एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राजेंद्र कुमरे यास ताब्यात घेतले.

 

अंमलदार जयपाल बांबोळे यांच्या फिर्यादीवरून आरमोरी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास हवालदार राकेश टेकाम करत आहेत. या कारवाईने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 10, 2025   

PostImage

पाणिपुरीच्या हातठेल्याला अर्टीकाची जब्बर धडक एक ठार तर ६ जन …


पाणिपुरीच्या  हातठेल्याला  अर्टीकाची  जब्बर धडक एक ठार  तर ६ जन गंभीर जखमी

 

यवतमाळ :- पांढरकवड्या वरुन शिबला रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या अर्टिका गाडीने समोरुन येणाऱ्या पाणीपुरी च्या हातठेल्या ला जोरदार धडक दिल्याने हातठेला चालक जागेवरच ठार झाला. हि भंयकर घटना चालबर्डी गावाजवळील लहान पुलाजवळ दिनांक ०८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता च्या दरम्यान घडली आहे. मृतक रामजनक बाबूराम बघेल वय ४१ रा. रामनगर पांढरकवडा असे अपघातात ठार झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. रामजनक बघेल हा हात ठेल्यावर गावोगावी जावून पाणीपुरी विक्री चा व्यवसाय करीत होता व आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह चालवित होता. अपघाताच्या दिवशी रामजनक हा चालबर्डी या गावी दुपारी ०२ वाजता पाणीपुरी विकण्याकरीता गेला होता.


पाणीपुरीचा व्यवसाय करुन रात्री ८.४५ वाजता दरम्यान चालबर्डी येथून आपल्या घराकडे परत येत असताना चालबर्डी जवळील लहान पुलाजवळ समोरून येणाऱ्या अर्टीका वाहन क्रं. एम एच ३४ बीबी ०९९८ च्या चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजी पणाने चालवून समोरुन येणाऱ्या हातठेल्याला जोरदार धडक दिली या मध्ये हात ठेला चालक रामजनक याच्या जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या डोक्यातून खुप रक्त वाहले त्याचा डावा पाय शरीरापासून वेगळा झाला होता.

त्यामुळे रामजनकचा जागेवरच मृत्यू झाला. तर अर्टिका मधील सहा जण जखमी झाले व अर्टीका गाडी दुरपर्यंत घासत जावून रोडच्या बाजूला असलेल्या शेतात जावून पडली. गाडीतील जखमी रघुनाथ कोवे वय ५३ वर्ष, सुरेंद्र नैताम वय ३९ वर्ष, युवराज पेंदोर वय ३० वर्ष, अंकूश कोवे वय ४ वर्ष जयप्रकाश पेंदोर वय ९ वर्ष सर्व रा. महाडोंळी व अर्टिका वाहन चालक नागेश्वर वसंता कोवे २७ रा.साखरा ता. घांटजी आहे. पांढरकवडा येथील पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटना स्थळी पोलीस निरीक्षक दिनेश झाबरे , पोलीस आशिष गजभिये, लक्ष्मी मलकुलवार , सचिन काकडे, सुनिल कुंटावार, जुनुनकर साहेब, राजु बेलयवार, यांनी पंचनामा करून जखमीना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर जखमी असलेल्या ६ पेशंटला वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ ला लगेच रेफर करण्यात आले या अपघाताची तक्रार विवेक माधवसिंग बघेल ३६ रा. रामनगर यांनी पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीसांनी अर्टिका चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लक्ष्मी मलकुलवार  करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 10, 2025   

PostImage

तळिरामाने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून केले गंभीर जखमी


तळिरामाने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून केले गंभीर जखमी 

कोरची : 
एका तळिरामाने शुल्लकच्या वादातून आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे 
कोरची तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील दोडके येथे पतीने घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. 

संतारोबाई कोरेटी (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. आशू कोरेटी (५०, रा. दोडके) हा  दि ६ रोजी सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. यावेळी घरगुती कारणावरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आशू
कोरेटी याने रागाच्या भरात कुन्हाडीने पत्नीवर हल्ला चढविला. यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी संतारोबाई यांना त्यांच्या भावाने कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पोलीसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 10, 2025   

PostImage

मुख्याध्यापक तथा शिक्षक अक्षरशः दारुच्या अड्ड्यावर दारु पित आढळले


 

एटापल्ली: तालुक्यातीलएका केंद्रस्तरीय शाळेत आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान दारुच्या अड्ड्यावर मुख्याध्यापकासह शिक्षक अक्षरशः दारुमध्ये तर्रर्र झाल्याचे आढळून आल्याने शिक्षण विभागासह तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. या संदर्भात फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

 

 

शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाभरात केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतीक महोत्सवाची धुम सुरु आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार शिक्षकही या क्रीडा स्पर्धेसह सांस्कृतीक कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांची तयारी करीत आहेत. अशातच

 

तालुक्यातील एका केंद्र शाळेत तालुका क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्या असतांना विविध शाळेतील काही मुख्याध्यापक तथा शिक्षक अक्षरशः दारुच्या अड्ड्यावर दारु पित असतांना आढळून आले. यासंदर्भातचे समाजमाध्यमावर फोटो व्हायरलझाल्याने एकच खळबळ निर्माण झाली.

 

 

एकीकडे विद्यार्थ्यांना आदर्शवत नागरीक घडविण्याचे ज्ञान देणारे शिक्षक वृंदच दारुच्या नशेत तर्रर्र असल्याने या शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना काय शिकवण मिळणार असा, प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. दारुच्या अड्यावर शिक्षक दारु

 

पित असतांनाचे छायाचित्र समाजमाध्यमातून सर्वत्र प्रसारित झाले आहे. दरम्यान शिक्षण विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेया शिक्षकांवर शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी कोणती कार्यवाही करतात, याकडे सर्वसामान्य नागरिकांसह पालकांचे लक्ष लागले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 9, 2025   

PostImage

जंगलात केली चितळाची शिकार, सरपंच फरार तर तिन इसम जेरबंद


जंगलात केली चितळाची शिकार, सरपंच फरार तर तिन इसम जेरबंद 


प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता 19 गडचिरोली
सिरोंचा:-
जंगलात रात्री चितळाची शिकार करुन विल्हेवाट लावण्यासाठी लगबग सुरू असताना अचानक वनविभागाने पथकाने धाड घातली असता सरपंच फरार झाला तर मोठ्या शिताफीने तिन इसमास अटक करण्यात आली आहे 
सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाच्या जंगलात जिवंत विद्युत तार सोडून चितळाची शिकार केल्याची घटना ८ जानेवारी रात्रीच्या सुमारास घडली. वनविभागाने यातील आरोपींचा शोध घेतला असता या घटनेत वडधमच्या सरपंच व अन्य दोघांचा समावेश आहे. तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सरपंच फरार आहे.समय्या किष्टय्या सिंगनेनी (सरपंच पोचमपल्ली), सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी, राजेश्वर सवेश्वर आकुला (सर्व रा. वडधम) अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेश्वर, सवेश्वर व राकेश यांना अटक करण्यात आली आहे. तर सरपंच समय्या हा फरार आहे. ८ जानेवारी रोजी

वनविभागाचे पथक गस्तीवर असताना वडधम गावात विद्युत लाइन ट्रीप झाल्याचे लक्षात आले तेव्हा अनुचित घटनेचा संशय आला. वर्धम गावात चौकशी केली असता जंगलात वन्यप्राण्यांची विद्युत तारेचा स्पर्श लावून शिकार केल्याची माहिती मिळाली. वनकर्मचारी शिकार झालेल्या ठिकाणाचा शोध घेत

असताना राजेश्वर सवेश्वर आकुला हा दिसून आला. त्याचवेळी राजेश्वरच्या भ्रमणध्वणीवर शिकारसंदर्भात फोन आला. तेव्हा त्याला अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले की गोदावरी नदीपात्रापासून अंदाजे ३०० मीटर अंतरावरील जंगलात शिकार झाली. त्याला सोबत घेऊन शिकारीचा शोध घेत असताना वाटेत चितळाचे शिर मिळून आले. समोर काही इसम दिसून आले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. प्रकरणाची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. सुरपाम करीत आहेत. ही कारवाई वनपाल डी. बी. आत्राम, वनरक्षक आर. वाय. तलांडी, डी. यु. गिते, एस.एस. चौधरी, व्ही. ए. काटींगल, आर. के. आत्राम यांनी केली.नदीपात्र ओलांडून आरोपींना केली अटक

वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत गोदावरी नदीपात्र ओलांडून सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी यांना ताब्यात घेतले. समय्या किष्टय्या सिंगनेनी फरार होण्यात यशस्वी झाला. त्याचा इतरत्र शोध घेतला असता मिळून आला नाही.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 9, 2025   

PostImage

ग्रामस्थांनी उधळला अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव


ग्रामस्थांनी उधळला अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव 

पांढरकवडा (यवतमाळ): एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव असफल केला   याबाबत पोलिसांनी तीनः जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.आरोपींमध्ये एका मुलीसह एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. आदिलाबाद येथील रणदिवसनगर मधील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा, अजय गंगाधर आडे (३०), वीणा मारोती किनाके (२३, रा. पाटणबोरी) अशी आरोपींची नावे आहेत. ७ डिसेंबरला सायंकाळच्या दरम्यान पाटणबोरी येथील एका शाळेतील दहाव्या वर्गातील १६ वर्षीय मुलीस तिच्या ओळखीच्या गावातीलच वीणा मारोती किनाके (२३) हिने शाळेतून घरी नेले व त्यानंतर ती तिला इतर दोन आरोपीसोबत अदिलाबाद येथे घेऊन जात होती. यावेळी त्या अल्पवयीन मुलीच्या मामाच्या मित्रास ती मुलगी दिसून आल्याने त्याने मुलीच्या मामाला याची माहिती दिली. तेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या मामासह गावातील इतर नागरिक पाटणबोरी येथील अदिलाबाद मार्गावर आले. त्यांनी तिनही आरोपींना मुलीस कुठे नेत आहे याची विचारणा केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. नागरिकांनी त्या सर्वांना पाटणबोरी आऊटपोस्टमध्ये नेले. पोलिसांनी विचारपूस केली असता, या मुलीस फूस लावून अदिलाबाद येथे नेत असल्याचे स्पष्ट झाले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 9, 2025   

PostImage

घरगुती वाद विकोपाला, पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला


 

 

कोरची : तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील दोडके येथे पतीने घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. महिलेवर उपचार सुरू आहेत.

 

संतारोबाई कोरेटी (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. आशू कोरेटी (५०, रा. दोडके) हा ६ रोजी सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. यावेळी घरगुती कारणावरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आशू

कोरेटी याने रागाच्या भरात कुन्हाडीने पत्नीवर हल्ला चढविला. यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी संतारोबाई यांना त्यांच्या भावाने कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.