PostImage

MH 33 NEWS

Yesterday   

PostImage

_दिल्लीत भाजपचे सरकार आल्याने गडचिरोलीत जल्लोष; फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाने …



गडचिरोली – भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्ता स्थापन केल्याने गडचिरोली शहरात उत्साहाचे वातावरण होते. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने इंदिरा गांधी चौकात भाजपच्या वतीने भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून, मिठाई वाटून आणि गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी "भारतीय जनता पक्ष जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या जल्लोषात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, ज्येष्ठ नेते सुधाकरजी येनंदलवार, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ.नितिनजी कोडवते,डाँ.चंदाताई कोडवते,  शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, तसेच विवेक बैस, विनोद देवोजवार, अनिल करपे,विशाल हरडे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, पल्लवी बारापात्रे, अविनाश विश्रोजवार, अर्चना चन्नावार,सिमा कन्नमवार, भुपेश कुळमेथे, मंगेश रणदीवे, गुंडु सरदार, हरीश माकडे, दीपक सातपुते,बारसागडे ताई,आखाडे आणि अन्य कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करत पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला. या सोहळ्यामुळे संपूर्ण गडचिरोली शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Yesterday   

PostImage

दिल्ली विधानसभा निवडणूक: अरविंद केजरीवाल अन् मनिष सिसोदियांना पराभवाचा धक्का


Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (Atishi Marlena) विजयी झाल्या आहेत. 

 

 

 

अरविंद केजरीवालांना मोठा धक्का

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय. 

 

मनीष सिसोदियांचा पराभव

तर, जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाने माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून तरविंदर सिंग मारवाह (Tarvinder Singh Marwah) आणि काँग्रेसकडून फरहाद सुरी निवडणूक रिंगणात उतरले होते. मनीष सिसोदिया हे पहिल्यांदाच जंगपुरा येथून मैदानात उतरले होते. याआधी ते पटपडगंजमधून निवडणूक लढवत होते. यावेळी पक्षाने शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांना पटपडगंजमधून उमेदवारी दिली होती. जंगपुरा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. या जागेवर भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी 1844 मतांनी विजय मिळवला आहे.  

 

 

भाजपची वाटचाल बहुमताच्या दिशेने

दरम्यान, सध्याच्या कलानुसार भाजपने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आये . आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. दिल्लीत भाजप 48, आप 22 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. त्यामुळे दिल्लीत आपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 5, 2025   

PostImage

गडचिरोली - रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज . प्रा. …


आरमोरी: रिपब्लिकन चळवळीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी साबुत ठेवणे काळाची गरज आहे. यापूर्वी रिपाईचा दबदबा होता आताच्या रिपब्लिकन चळवळीच्या अनेक गटातटामुळे रिपाई नष्ठ होणार काय ? अशी भिती वाटू लागली आहे. रिपाईला संपविण्याचे काम भाजप कांग्रेसवाले करीत आहेत. दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत . रिपाई कडून फक्त मताचा जोगवा मागतात व नंतर रिपाईला दुय्यम वागणुक देतात तेव्हा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टीला बळ देऊन रिपाई मजबुत करण्याचा प्रयत्न करूया तेव्हा तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्तांनी एकजुटीने रिपब्लिकन पक्ष बाचविणे काळाची गरज आहे असे आपल्या मार्गदर्शनात प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले . 

 

 

आरमोरी तालुक्यातील डॉ आंबेडकर भवन येथे पार पडलेल्या रिपाई मेळाव्याचे अध्यक्ष रिपाईचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली रिपाई जिल्हाध्यक्षगोपाल रायपूरे चंद्रपूर , नासीर ज्जुमन शेख , पक्ष प्रवक्ता अशोक शामकुळे , रिपाई महिला आघाडीच्या नेत्या अँड. प्रियंका चव्हाण बल्लारसा,उपाध्यक्ष सोनू साखरे ,महासचिव परशराम बांबोळे , उपाध्यक्ष मारोती भैसारे ' कुरखेडा तालुकाध्यक्ष सुनिल सहारे, मोहनदास मेश्राम ,सचिन किरणापूरे , टि. एम . खोब्रागडे,आरमोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे ' देवेंद्र बोदेले ' शामराव सहारे ,गडचिरोली तालुकाध्यक्ष जिवन मेश्राम ' आदिची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी गोपाल रायपूरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जोमाने रेटून रिपाईची ताकद वाढविण्याचे काम सर्वांनी एकजुटीने केले पाहिजे तेव्हा रिपाईला जुने दिवस दिसतील असे गोपाल रायपूरे यांनी सांगितले. याप्रसंगी ॲड . चव्हाण मॅडम नासिर शेख यांचेही समायोचित भाषणे झालीत.

 

 याप्रसंगी मुरलीधर भानारकर यांनी पक्ष कार्यकर्ता जास्त समाजकारण व बाकी राजकारण करीत गोरगरीबांच्या समस्या जाणुन घेऊन त्याचे प्रश्न सोडविण्यास नेहमीच आम्ही तत्पर असतो.कार्यक्रमाचे संचलन विजय शेंन्डे तर आभार शामराव सहारे यांनी मानले. कार्यक्रमास ' हर्ष साखरे , दिनेश वनकर ' युवराज धंदरे ' किशोर टिचकुले ,' बाळू ढेभुर्ण , राजाराम लोखंडे , जर्नाधन राऊत , सुरेश बोरकर, हेमंत डोंगरे , मनोहर अंबादे ' आबाजी शेन्डे ' टिकाराम ढेभुर्ण . हिरामण इंदुरकर , चोखोबा ढवळे , सतिश ढेभुर्ण ' डाकराम ठेभुर्णे ,निर्मला रामटेके , वर्षा ठवरे ' सुनिता इंदुरकर , भाग्यश्री चौधरी , ताराबाई भानारकर , वंदना चव्हाण ,आदि सहीत आरमोरी तालुका परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थिती होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025   

PostImage

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा - …


प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा - खासदार डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी 

गडचिरोली :: केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्ली येथे सुरु असून, राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेत गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले.
यावेळी खासदार डॉ. किरसान यांनी, वाढत असलेली महागाई, सिमेंट, गिट्टी, रेती, लोहा सारख्या विविध वस्तूचे वाढते दर लक्ष्यात घेऊन, केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या हप्त्यात ग्रामीण भागात किमान 3 लक्ष रुपये पर्यत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली. या सोबतच केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून, अजूनही बऱ्याच गावात नळ पोहचले नाही ज्या गावात नळ पोहचले त्या ठिकाणी पाणी नाही आणि पाणी पोहचले त्या ठिकाणी अशुद्ध पाणी मिळत असून नारिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर योजनेच्या अमलबजावणीत सरकारने जातीने लक्ष घालून प्रत्येक नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल याकरिता प्रयत्न करण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी संसदेत केली. याचबरोबर गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासी बहुल क्षेत्र असून आदिवासी चे जल जंगल आणि जमिनीवरचे हक्क अबाधित राहण्याकरीता पेसा कायदा तयार करण्यात आले, मात्र प्रशासनाकडून यामध्ये ढवळा ढवळ केले जाते हे योग्य नसल्याचे खासदार डॉ. किरसान यांनी भावना व्यक्त केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री …


गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार...


गडचिरोली, ०४ फेब्रुवारी, २०२५::-

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, या जिल्ह्याबाबत वेगळ्या दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

यासोबतच यंत्रणेने रोजगाराला चालना देणाऱ्या व शाश्वत विकास साध्य करणाऱ्या योजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 चा प्रारुप आराखडा अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यादूरदृष्यप्रणालीद्वारे आज घेण्यात आले.या बैठकीत वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल तसेच गडचिरोली येथून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, आ. डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 अंतर्गतगाभा क्षेत्रासाठी 212 कोटी, बिगर गाभा क्षेत्रासाठी 106 कोटी, आकांक्षित जिल्ह्यासाठी 25 टक्के अतिरिक्त निधील रुपये 83.69 कोटी आणि नाविन्यपूर्ण व इतर योजनांसाठी मिळून एकूण 418.45 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला आहे.तथापि, कार्यान्वयन यंत्रणेकडून 823 कोटी रुपयांची निधी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बैठकीत 404.56 कोटींची वाढीव मागणीसादर करण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गडचिरोली हा विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दिष्टावर भर देत विविध योजनांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले. प्रादेशिक विकास आराखड्याखेरीज मिळणाऱ्या निधीचा प्रभावी वापर, पर्यटन आणि रोजगार निर्मितीस चालना देणाऱ्या योजनांवर भर, तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन लोकसहभागातून विकास आराखडा राबवावा, असेही ते म्हणाले. 2024-25 मध्ये मंजूर झालेला निधी अद्याप का खर्चझाला नाही, काय अडचण आहे,याबाबत विचारणा करून त्यांनी सदर निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उभारणी, शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रणाली बसविणे आणि योजनेंतर्गत खरेदी साहित्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे यासारख्या सूचनाही त्यांनी केल्या.

भौगोलिक आव्हाने आणि विकास निधीची गरज - सहपालकमंत्री जयस्वाल.राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी जिल्ह्याचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र तसेच या जिल्ह्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल लक्षात घेता रस्ते, आरोग्य, शिक्षण व पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्याची मागणी केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि ग्रामीण दुर्गम भागातील रस्त्यांची अत्यंत खराब परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष निधी देण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कोणत्या विभागाला किती निधीची मागणी आहे आणि त्यातून कोणती विकासकामे केली जाणार आहेत याची सविस्तर माहिती सादर केली.

बैठकीत मंत्रालयातील वरिष्ठ सचिव आणि जिल्हा कार्यकारी यंत्रणांचेअधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025   

PostImage

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र विरोधी, फक्त बिहार निवडणूक समोर ठेवला


केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र विरोधी, फक्त बिहार निवडणूक समोर ठेवला 

नागपूर:-

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा असून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याचे आज स्पष्ट दिसले. हे बजेट भारताचे नसून येत्या काळात निवडणूक असणाऱ्या बिहार राज्याचे आहे.

आजच्या अर्थसंकलपात बिहार राज्यासाठी विविध घोषणांचा वर्षाव करण्यात आला. तिथून सरकारला टेकू मिळत असल्याने आणि येणाऱ्या काळात निवडणूक असल्याने बिहारला झुकते माप मिळाले. पण यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्र हे राज्य केंद्र सरकारला सगळ्यात जास्त कर देत असताना महाराष्ट्रावर वारंवार अन्याय करण्यात येत आहे.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. पण यातून शेतकरी, तरुण ,महिला, सामान्य नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यासाठी शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पण असा कोणताही दिलासा आज मिळाला नाही. शेतकऱ्यांना लागणारी खते, बी बियाणे, पीकविमा याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट आहे. 
तसेच आज देशात रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न असताना रोजगारासाठी, तरुणांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकारने मांडले नाही.

महाराष्ट्रात मेट्रो , रेल्वे साठी निधी दिला असे सत्ताधारी सांगत असतील तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस तरतूद या अर्थसंकलपात करण्यात आलेली नाही. मध्यमवर्गीय टॅक्स मुळे त्रासले होते, केंद्र सरकारची लोकप्रियता घसरत चालली आहे त्यासाठी टॅक्स मध्ये सूट देण्यात आली. त्यामुळे हे बनवा बनवी बजेट असल्याची भावना आज जनतेत आहे. 

मेक इन इंडियाची नुसती घोषणा झाली पण त्यातून हाती काही लागले नाही त्यामुळे नॅशनल मॅन्यूफॅक्चरींग हे नवीन मिशन आणले आहे,म्हणजे नवीन बाटलीत जुनेच औषध पुन्हा देण्यात येत आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 31, 2025   

PostImage

मालेवाडा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन आमदार रामदास …


 

दिनांक,३०/०१/२०२५

📍तालुका,कुरखेडा

 

एजाज पठाण प्रतिनिधि 

कुरखेडा तालुक्यातील मौजा कसारी येथे ॲड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय, मालेवाडा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) महाविद्यालय स्तरीय सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले*. या शिबिराच्या उद्घाटन *आमदार रामदास मसराम सर* यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या शिबिरात महाविद्यालयातील NSS स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध उपक्रम राबवले. यामध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, ग्रामसाफाई आणि जनजागृती* कार्यक्रमांचा समावेश होणार आहे .

 

उद्घाटन प्रसंगी आमदार रामदास मसराम सर* यांनी युवकांनी समाजासाठी योगदान देण्याच्या संधीचा उपयोग करावा असे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी शिक्षणासोबत सामाजिक कार्याचा अनुभव जीवन घडवण्यास मदत करतो, असेही सांगितले.

 

या कार्यक्रमाला संस्थे चे अध्यक्ष रेखाताई बनपुरकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. कांबळी सर, विशेष अतिथी प्रा. डॉ. खालसा सर व महाविद्यालयाचे प्राध्यापक, NSS कार्यक्रम अधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025   

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार)विविध पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी …


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार)विविध पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला पक्ष प्रवेश

 

 माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

गड़चिरोली:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये अमोल कुळमेथे यांच्या नेतृत्वात शरदचंद्र पवार पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार, 27 जानेवारीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालय गड़चिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश करतांना अमोल कुळमेथे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कार्यप्रणाली आणि गडचिरोली जिल्ह्यात आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांनी अनेक विकासकार्य केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांच्यामध्ये समाजातील मागास घटकांपर्यत पोहचून विकास घडवून आणण्याची क्षमता असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे नक्कीच जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू, असे मत अमोल कुळमेथे यांनी व्यक्त केले. पक्ष प्रवेश करतांना माझी नगरसेवक खूमेश कुळमेथे, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रसाद पवार, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमाताई येवले, महिला शहराध्यक्ष प्रीती कोवे, युवक शहराध्यक्ष अजय कुकडकर, जेष्ठ नेत्या उमा बन्सोड, चामोर्शी निरीक्षक आरती कोल्हे, महिला शहर उपाध्यक्ष नईमा हुसैन, महिला शहर सरचिटणीस मीना मावळनकर, आशा मुळेवार,  सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक संघरक्षित फुलझेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम कुळमेथे, सेवानिवृत्त वनपाल बळवंत येवले, माजी जिल्हा परिषद कर्मचारी प्रदीप वडेट्टीवार, खुशाल तरोने, संजय भोयर, साहित्यिक व आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुसराम, अजय कोवे, धनु गेडाम, रुपेश गेडाम, रुपेश सलामे, रेणू कुळमेथे, अंजू कुळमेथे, किरण मंगरे, कविता चिचघरे, तेजस लाकडे, सुरेश चिकराम, स्वप्निल येडलावार, रोशनी पुडो, विक्की केळझरकर, मयूर सूर्यवंशी, डिंपल सहारे, आबिद शेख, मोना बोरकर, सोनू कुळमेथे, सोनाली राईंचवार, अस्मिता खोब्रागडे, महेश निमगडे आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश महासचिव युनूस शेख, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर


गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

 

 

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

वासुदेव शेडमाके जिल्हाप्रमुख , रामकृष्ण मडावी जिल्हा समन्वयक, विजय पवार सहसंपर्कप्रमुख , राजू अंबानी जिल्हा संघटक, अरविंद कात्रटवार उपजिल्हाप्रमुख , घनशाम कोलते (तालुकाप्रमुख - गडचिरोली ), कुणाल कोवे (तालुकाप्रमुख - गडचिरोली ग्रामीण), अब्दुल शेख (शहरप्रमुख - गडचिरोली शहर), कृष्णा वाघाडे (उपशहरप्रमुख - गडचिरोली शहर), ज्ञानेश्वर वाघमारे (तालुका संघटक-गडचिरोली तालुका), गजानन नैताम (तालुका समन्वयक - गडचिरोली तालुका), मनोज पोरटे (तालुकाप्रमुख - चामोर्शी शहर), दीपक दुधबावरे (तालुकाप्रमुख - चामोर्शी ग्रामीण), बंडू नैताम (शहरप्रमुख- चामोर्शी शहर), अंकिम साबनवार (तालुका संघटक- चामोर्शी तालुका), सुभाष करणे (तालुका समन्वयक- चामोर्शी तालुका), दिलीप सुरपाम (उपजिल्हाप्रमुख - अहेरी विधानसभा), प्रफुल्ल येरने (तालुकाप्रमुख- अहेरी विधानसभा), टिल्लू मुखर्जी (तालुकाप्रमुख मुलचेरा तालुका), अक्षय पुंगाटी (तालुकाप्रमुख-इटापल्ली तालुका), राजेंद्र लानजेकर (सल्लागार-गडचिरोली जिल्हा). आदि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025   

PostImage

पालकमंत्री दोन तरीही जिल्हा नियोजन ची बैठक ऑनलाईन का? काँग्रेस …


पालकमंत्री दोन तरीही जिल्हा नियोजन ची बैठक ऑनलाईन का? काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सवाल

 

 

गडचिरोली :: कधी नव्हे तर जिल्ह्याच्या इतिहासात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवून नवा इतिहास रचला, मात्र या सोबतच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांच्या भुवया उंचावल्या, जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून घेतील येथील नागरिकांशी संवाद साधतील अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांना मदत म्हूणन जिल्ह्याला सह पालकमंत्री सुद्धा देण्यात आले, मात्र विधानसभा निवडणूकी नंत्तर गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक 31 जानेवारी रोजी, सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरेन्स च्या माध्यमातुन पार पडणार असून, जिल्ह्याला ऐक नव्हे तर दोन - दोन पालकमंत्री असताना देखील नियोजन समितीची बैठक ऑनलाईन का असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमटी चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे.  इतकेच नाही तर बैठक ऑनलाईन असतांना देखील मुख्यमंत्री फडणवीस हे बैठीकस राहु शकत नाही हे देखील मोठी शोकांतिका असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठीच गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले का?  कीं फक्त आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा करून, देण्यासाठी पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवले असाही प्रश्न महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील असंख्य नागरिक विविध समस्यांना घेऊन मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे, अनेक शेतकऱ्याचे धानाचे चुकारे अजून मिळाले नाही, घरकुल धारकांच्या अनेक समस्या आहेत, जिल्ह्यातील रानटी जनावरांचे बंदोबस्त संदर्भातील समस्या आहेत, जिल्ह्यातील रस्ते, दवाखाने सारख्या विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी झालेली असताना देखील निधी उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे अनेक कंत्राट दारावर उपास मारीची वेळ आलेली आहे असे अनेक समस्या असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यासाठी वेळ देत नसतील तर जिल्ह्यातील नागरिकांना पाकमंत्री हटाओ गडचिरोली जिल्हा बचाओ अशी मोहीम राबविण्याची वेळ येईल का असेही मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025   

PostImage

शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सह संपर्क प्रमुख …


शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सह संपर्क प्रमुख विजय शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली बस तिकीट दरवाढीचा निषेध व चक्का जाम

 

गडचिरोली:-

  आज दिनांक 29/01/2025 ला शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वाखाली विजय  श्रुंगारपवार सह संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्ह्या यांच्या उपस्थितीत स्थानिक बस स्थानक गडचिरोली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. नुकताच राज्य शासनाने बस तिकिट दरवाढीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. लाडकी बहिण योजना अंमलात आणल्या पासून राज्यात जिवनावशक वस्तूंची कमालीची दरवाढ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सपाटाच लावला असुन याचाच एक भाग बस तिकीट दर वाढ निर्णय घेतला असून या निर्णया विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी नंदुभाऊ कुमरे, सुनील पोरेड्डिवार, राजेंद्र लांजेकर, किरण शेडमाके, पवन गेडाम, संदिप वाघरे, गोविंदा बाबनवाडे, प्रशिक झाडे, हिंमत भुरसे, रामगिरवार , विजय पत्तीवार.आणि बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 29, 2025   

PostImage

समाजकल्याण वसतिगृह प्रवेशप्रक्रियेत भ्रष्टाचार, प्रवेशासाठी प्रवेशार्थ्यांकडून लाच | गृहपाल गावडेस …


 

गडचिरोली:नवेगाव वसतिगृहात आजाद समाज पार्टीची धडक दिली असता पिण्याच्या पाण्याची tank मध्ये दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणात शेवाळ आढळून आले. कित्येक दिवसापासून टॅंक साफ करण्यात आली नव्हती तसेच वॉटर फिल्टर बंद अवस्थेत असल्याने तेच पाणी मुलांना प्यावे लागते.

 

 जिल्ह्यातील अनेक वसतिगृह प्रक्रियेत कर्मचारी भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून आल्याने आजाद समाज पार्टीच्या वतीने गडचिरोली येथील नवेगाव स्थित समाजकल्याण मुलांचे वसतिगृहात स्टिंग ऑपेरेशन करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यात आले, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी मुलांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करणे आवश्यक असताना ती जाहीर न करता विद्यार्थ्यांनी विचारले असता विद्यार्थ्यांना तुमचा नंबर लागला नाही अस सांगून नंबर लावायचं असल्यास पैशाची मागणी करण्यात आली, असा दावा आजाद समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व विनोद मडावी यांनी केला. 

हा प्रकार मुलांच्या शिक्षण हक्काशी खेळ करणारा अत्यंत निंदनीय आहे. मागासवर्गीय मुलामुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलीना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. परंतु या ठिकाणी योजना राबविणारेच रक्षक हे भक्षक बनल्याचा आरोप आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला असून संबंधित गृहपाल महेश गाडवे व सहभागी कर्मचारी यांना बडतर्फ करण्याची मागणी आजाद समाज पार्टी ने सहाय्यक आयुक्ताकडे केली.

 

वसतिगृह प्रवेशाकरिता दुसरा पर्याय नसल्या कारणाने पर्यायाने अनेक मुलांनी कॅश स्वरुपात व ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासाठी वॉर्डन महेश गावडे यांच्या अकॉउंट ला पैसे टाकले असल्याची पुराव्यानिशी माहिती आमच्याकडे असून अनेक विद्यार्थी भीती पोटी ही गोष्ट बाहेर सांगायला घाबरत आहेत. विद्यार्थ्यांनी जर आवाज उठविला तर प्रवेश रद्द करू अशी धमकी त्यांना दिली असल्याने विद्यार्थी गप्प आहेत. या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याचे Bank statement, व phone pay details चेक करण्यात यावे. असेही निवेदनात मागणी केल्या गेली.

 

गोर गरीब, शेतकरी कामगारांचे मुले शिकली पाहिजेत, पैशा अभावी शिक्षण थांबू नये या उद्देशाने शासन अशी योजना राबवित असतो पण आपले कर्मचारी पगारी असून प्रवेशासाठी गोर गरीब मुलांकडून पैसे वसूल करून मुलांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. 

 

यामध्ये कुठल्याही प्रकारची गय न करता तात्काळ अशा प्रकारच्या भ्रष्टाचार करणाऱ्या महेश गाढवे व त्यांच्यासोबत सहभागी कर्मचाऱ्यांना नौकरीतून बडतर्फ करण्यात यावे अशी सक्त मागणी आजाद समाज पार्टी च्या वतीने करण्यात आली.. तात्काळ कारवाई न झाल्यास या विरोधात समाजकल्याण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे.

यावेळी आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, विधानसभा प्रभारी धनराज दामले, मिडिया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते 

--------------------

पुढील 3 महिन्यात जिल्ह्यातील सर्व हॉस्टेल च्या स्वच्छतेचे काम व पाणी टॅंक तथा पेंटिंग होणार असून भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करू असे आश्वासन दिले.

-------------------

 

राज बन्सोड 

जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी 

गडचिरोली 

8806757873


PostImage

MH 33 NEWS

Jan. 27, 2025   

PostImage

खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न


 

गडचिरोली - 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे गडचिरोली येथील खासदार जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न, खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव जी कोवासे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, काँग्रेस जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, शँकरराव सालोटकर, शालीग्रामजी विधाते, काशिनाथ भडके, अब्दुलभाई पंजवानी, घनश्याम वाढई, सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, संजय चने, हरबाजी मोरे, दत्तात्र्यय खरवडे, माधव गावड, रुपेश टिकले, उत्तम ठाकरे, राकेश रत्नावार, मिलिंद बारसागडे, मिथुन बाबनवाडे, संजय मेश्राम, महादेव भोयर, माजिद सय्यद, जावेद खान, राजाभाऊ कुकडकर, बाबुराव गडसूलवार, आय. बी शेख, प्रफुल आंबोरकर, दीपक रामने, उत्तम गेडाम, लालाजी सातपुते, चारू पोहने, निकेश कामीडवार, राजेंद्र आखाडे, रवी मेश्राम, कमलेश खोब्रागडे, तौफिक शेख,चंद्रशेखर धकाते, कृष्णराव नारदेलवार, रुपचंद उंदीरवाडे, श्रेयस बेहरे, कल्पना नंदेश्वर, सुनिता रायपुरे, अपर्णा खेवले, पौर्णिमा ताई भडके, रिता गोवर्धन, कविता उराडे सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025   

PostImage

इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे राष्ट्रीय मतदारदिनी निदर्शने व पत्रकार …


इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे राष्ट्रीय मतदारदिनी निदर्शने व पत्रकार परिषद

 

 

गडचिरोली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीविरोधात तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, इंदिरा गांधी चौक येथे २५ जानेवारी २०२५, निदर्शन आंदोलन करून पत्रकार परिषद घेण्यात आली.
या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांसह व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळावी, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी खासदार डॉ. नामदेवजी किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर,  तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमाद भगत, प्रशांत कोराम, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर,   नेताजी गावतुरे, काशिनाथ भडके, हरबाजी मोरे, दिवाकर निसार,  संजय चन्ने, घनश्याम वाढई, दत्तात्र्य खरवडे, अजय भांडेकर,रवी मेश्राम, सुभाष धाईत, उत्तम ठाकरे, बंडोपंत चिटमलवार, रुपेश टिकले, दीपक रामने, सुरेश भांडेकर, अनिल भांडेकर, विनोद लेनगुरे, भैयाजी मुद्दमवार, आशा मेश्राम, प्रति बारसागडे, कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, गणेश कोवे, जावेद खान, स्वप्नील बेहरे सह सर्व सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025   

PostImage

स्मार्ट मीटरच्या नावावर वीज ग्राहकांना सरकारकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न - …


स्मार्ट मीटरच्या नावावर वीज ग्राहकांना सरकारकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न - आ. विजय वडेट्टीवार

 मुख्यमंत्र्यांचे सभागृहातील आश्वासनावरून घुमजाव

 स्मार्ट मीटर न लावण्याचे जिल्हा वासियांना काँग्रेसचे आवाहन

गडचिरोली:-

निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने ,फसव्या योजना व भूलथापांची वचने देऊन महायुती सरकार सत्तेवर आली. सत्ता प्राप्त होताच सरकारने व्यवसायदारांचे हित जोपासण्यासाठी राज्यातील वीज वापर करणाऱ्या जनतेच्या मानगुटीवर आर्थिक भुर्दंड लादणारे व दीड पट अधिक गतीने चालणारे स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने लावणे सुरू केले असून जनतेने सरकारच्या या अन्यायकारक धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करीत असून प्रीपेड स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करा. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. असा सज्जड इशारा राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने केवळ सत्ता प्राप्तीसाठी प्रलोभने देऊन जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजवर केले आहे. देशासह राज्यात महागाई, बेरोजगारी यामुळें सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच विवीध जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून सर्व सामान्यांना जिवन जगणे अवघड झाले आहे. अशातच गेल्या वर्षभरापूर्वी विज वितरण कंपनी कडून विज ग्राहकांचे विद्युत मीटर बदलाविण्यात आले होते. मात्र वर्ष लोटताच आता सरकारने स्मार्ट मीटर च्या नावाखाली वेठीस धरण्याचा सपाटा सुरू केला आहे. या संदर्भात विरोधी बाकावरून स्मार्ट मीटर ला कडाडून विरोध करीत आम्ही जनहिता करिता आवाज उचलला असताना मुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यावरून आता तुछच्या केले असून जनतेला दिलेले स्मार्ट फिटर न लावण्याचे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. तर स्मार्ट मीटर हे दीड पट अधिक गतीने चालणारे मीटर असुन हे प्रीपेड असल्याने यात अगोदर रिचार्ज कारणे अनिवार्य आहे. आहे मोबाईल प्रमाणेच रिचार्ज संपला की विज पुरवठा आपोआप बंद होईल. म्हणजेच जनतेला रात्रौ बेरात्री लहान मूल,अभ्यासक मुले तसेच इतर सर्व कार्यासाठी चक्क अंधारात रात्र काढावी लागणार आहे.
 देशांतील व राज्यातील महायुती सरकार हे गोरगरिबांसाठी नसून केवळ व्यापारी हीत जोपासणारे सरकार असुन स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) योजने अंतर्गत जनतेची अर्थिक लूट करु पहाणाऱ्या या लुटारू सरकारच्या अन्यायकारक धोरणाला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने प्रखरपणे विरोध करणे गरजेचे असुन जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर आहे. आपण सर्व विज ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शवावा. तसेच विज वितरण कंपनी कडून कुठल्याही ग्राहकाकडे  बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न होत असल्यास आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखिल काँग्रेस नेते, राज्याचे माजी विरोधी विरोधी पक्षनेते,तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Jan. 23, 2025   

PostImage

काटली येथील बेजबाबदार ग्रामसेवकास निलंबित करा- आजाद समाज पार्टीचीं मागणी


 

गडचिरोली : तालुक्यातील मौजा काटली येथील ग्रामसेवक यांची प्रशासकीय कारकीर्द अत्यंत बेजबाबदार असून ते आपल्या पदाच्या कार्यात हयगय करत असतात. अनेकदा ते आपल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाही. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे ते देत असतात. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत मध्ये हिशोबाची सहामाही ग्रामसभेला ते उपस्थित राहत नव्हते तसेच मासिक सभेला सुद्धा उपस्थित नव्हते. सदर बाब गंभीर असून जनतेसह हि प्रशासनाची सुद्धा दिशाभूल आहे असा आरोप करत ग्रामसेवकास चौकशी करून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली.

 

अनेकदा कार्यालयीन वेळेत ते नशेत असल्याचे सुद्धा असतात. त्याच प्रमाणे आमच्या कार्यकत्यांनी काही महत्वाची माहिती मागितली असता त्यांनी माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन सुद्धा केले. असे ही निवेदनात म्हटलं आहे.

 

  सदर प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून सदर ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे असे निवेदन जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, काटली ग्रामपंचायत सदस्य देवा भोयर, रेवनात मेश्राम यांनी केली.

 

👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽

*राज बन्सोड*

जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी गडचिरोली