नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. या छाननीदरम्यान असे लक्षात आले आहे की काही महिलांनी योजनेच्या निकषांना डावलून लाभ घेतला आहे. अशा महिलांना सरकारकडून मिळालेले पैसे परत करावे लागणार आहेत. यासाठी सरकारने महिलांना आवाहनही केले आहे.
सरकारने आता या छाननी प्रक्रियेला आणखी वेग दिला आहे. अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरोघरी पाठवण्यात येणार आहे. जर सेविकांच्या पडताळणीत असे लक्षात आले की महिला योजनेच्या निकषांना पूर्ण करत नाही, तर त्यांना आतापर्यंत मिळालेले १०,५०० रुपये सरकारला परत करावे लागतील. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहे.
महिला व बाल कल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी आयकर आणि परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे. आयकर विभाग महिलांच्या आर्थिक माहितीची तपासणी करेल, तर परिवहन विभाग महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही, याची माहिती देईल.
या प्रक्रियेदरम्यान, सरकारने अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जर महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल, तर त्यांना योजनेतून वगळण्यात येईल. अशा महिलांना आतापर्यंत मिळालेले १०,५०० रुपये सरकारला परत करावे लागतील.
मात्र, जर चारचाकी वाहन सासरे, दीर किंवा घरातील इतर सदस्यांच्या नावावर असेल आणि लाभार्थी महिला पती आणि मुलासोबत वेगळी राहत असेल, तर तिला योजनेचा लाभ मिळत राहील.
लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना जूनपासून सुरू करण्यात आली होती. जुलैपासून महिलांच्या खात्यात सरकारने १,५०० रुपये जमा करण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत सात हप्त्यांमध्ये १०,५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या १,५०० रुपयांची प्रतीक्षा आहे, जी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
तथापि, जर अर्ज बाद ठरला, तर महिलांना सर्व पैसे परत करावे लागू शकतात. त्यामुळे लाभार्थी महिलांनी या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि अधिक अद्ययावत माहितीसाठी चैनल ला फॉलो करा!
रायपूर:
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात शनिवारी मोठी चकमक झडली आहे. विजापूरच्या तोडका भागात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. अजूनही चकमक सुरूच असल्याचं सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील ही गेल्या काही दिवसातील मोठी कारवाई आहे. या कारवाईत आतापर्यंत 8 नक्षली ठार झाले आहेत. त्यांचा हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
तोडका परिसर हा विजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. जिथे ही चकमक सुरू आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. शिवाय आठ नक्षलवाद्यांचे मृतदेही जवानांनी ताब्यात घेतले आहेत. या हल्लावेळी नक्षलवाद्यांनी अधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने जवानांवर हल्ला केला होती. ही शस्त्रेही आता ताब्यात घेण्यात आली आहेत.
ही चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यातील ही जवानांची नक्षलवाद्यां विरोधातील मोठी कारवाई आहे. छत्तीसगडमध्ये नक्षली कारवायाही वाढल्या होत्या. त्यानंतर जवानांनी त्यांना पायबंद घालण्यात यश मिळवलं होतं. काही नक्षलींनी गेल्या काही दिवसात आत्मसमर्पण ही केलं आहे. ज्यांनी केले नाही त्यांना जवानांनी यमसदनी धाडलं आहे. दरम्यान या कारवाईत आणखी नक्षली ठार झाले असावेत असा अंदाज आहे.
उत्तर प्रदेश: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. अमृत स्नानाच्या मौनी अमावस्येच्या आधी ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या घटनेमध्ये 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री 2 वाजता गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरेकेडींग तुटले आणि चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले. तसेच 30 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भगवंतराव हायस्कूल इंदाराम येथे डॉ.लुबना हकीम यांनी केले ध्वजारोहण
अहेरी:-
आज 76 व्या गणराज्य दिनाच्या शुभ पर्वावर इदाराम येथील भगवंतराव हायस्कुल येथे डॉ लुबना हकीम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ ककडालवार मुख्याध्यापक मामीडलवार आरोग्य उपकेंद्र इंदाराम सीएचओ सुरभी शिल्पकर, एएनएम सी.सी. मडावी आणि अंगणवाडी सेविका,व सह ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
सर्व शिक्षक-शिक्षिकांनी, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी यथासांग एकत्र येऊन हा दिवस साजरा केला. डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांची आणि भारतीय संविधानाची महत्ता सांगितली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता, सामाजिक जबाबदारी आणि देशाभिमान यांचे महत्त्व पटवून दिले. या खास प्रसंगी शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले, ज्यामुळे सर्व उपस्थितांना मनोरंजन आणि प्रेरणा मिळाली
सुरक्षाबलों ने हाल ही में छत्तीसगढ़ के बीजापुर में तेलंगाना सीमा पर नक्सलियों के खिलाफ बड़ी कार्रवाई को अंजाम दिया था। इस दौरान 16 जनवरी को हुई मुठभेड़ में 12 हार्डकोर माओवादियों को ढेर कर दिया था। जिसमें से 5 महिला और 7 पुरुष नक्सली थे। यह मुठभेड़ करीब 13 घंटों तक चली थी और इस ऑपरेशन को 3 हजार से ज्यादा जवानों ने अंजाम दिया था। अब नक्सलियों ने इस मुठभेड़ को लेकर एक नया खुलासा किया है।
दरअसल पुलिस ने इस मुठभेड़ में 12 नक्सलियों के मारे जाने का दावा किया था। लेकिन हाल ही में माओवादियों ने एक प्रेस नोट जारी कर इसमें 18 नक्सलियों के मारे जाने की बात कही है। नक्सलियों की ओर से जारी प्रेस नोट में कहा गया है कि इस मुठभेड़ में मोस्ट वांटेड नक्सली दामोदर उर्फ चोखा राव भी मारा गया है, जो कि कमांडर स्टेट कमेटी मेम्बर और तेलंगाना स्टेट कमेटी का चीफ था। साथ ही उस पर 50 लाख रुपए का इनाम भी घोषित था। इसके अलावा PPCM हुंगी, देवे, जोगा और नरसिंह राव भी मारे गए हैं।
बता दें कि इस मुठभेड़ में जवानों ने 12 नक्सलियों के शव बरामद किए थे, लेकिन नक्सलियों ने 18 माओवादियों के मारे जाने की जानकारी प्रेस नोट में दी है। मुठभेड़ के बाद सुरक्षाबलों ने मौके से आधुनिक हथियार, राकेट लॉन्चर, वायरलेस सेट और विस्फोट भी बरामद किए थे, जिनका उपयोग नक्सली हमेशा बड़े हमलों की तैयारी के लिए करते थे।
बस्तर के आईजी पी. सुन्दरराज ने बताया था कि यह मुठभेड़ पामेड़, बासागुड़ा और उसूर क्षेत्र के जंगलों में हुई थी। यह इलाका माओवादी गतिविधियों का गढ़ माना जाता है। सुरक्षाबलों को मुखबिर से सूचना मिली कि जंगल में नक्सलियों की मौजूदगी है। इसके बाद तीन जिलों सुकमा, बीजापुर और दंतेवाड़ा के हजारों जवानों ने इलाके को चारों ओर से घेर लिया था। ऑपरेशन में डीआरजी सुकमा, डीआरजी बीजापुर, डीआरजी दंतेवाड़ा और एसटीएफ कोबरा की 204, 205, 206, 208, 210 और CRPF की 229 बटालियन शामिल थीं।
शव और भारी मात्रा में हथियार हुए थे बरामद
मुठभेड़ के बाद मारे गए नक्सलियों के शवों को जिला मुख्यालय लाया गया था, इन नक्सलियों में PLGA बटालियन नंबर 1 और सेंट्रल रीजनल कमेटी (CRC) के सदस्य शामिल थे। सुरक्षाबलों ने नक्सलियों के शवों के पास से अत्याधुनिक हथियार और हथियार बनाने के उपकरण भी जब्त किए। जवानों को सूचना मिली थी कि मारुड़बाका और पुजारीकांकेर के जंगलों में भारी संख्या में हथियारबंद नक्सली छिपे हैं। सुरक्षाबलों ने इलाके की घेराबंदी कर ज्वाइंट ऑपरेशन को अंजाम दिया।
छत्तीसगडमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ही माहिती पोलिसांनी दिली. या जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जंगलात सुरक्षा दलाने केलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईदरम्यान ही घटना घडली. जानेवारी महिन्यात सुरक्षा दलांबरोबरच्या विविध चकमकीत आतापर्यंत २६ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
या कारवाईत जिल्हा राखीव दलाचे तीन जिल्ह्यांतील जवान, सीआरपीएफच्या कोब्रा विंगच्या पाच बटालियन तसेच २२९व्या बटालियनचे जवान सहभागी झाले होते. पोलिसांनी सांगितले की, चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती हाती आली आहे. त्या भागात नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी भागात सुरू असलेली मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. चकमकीमध्ये सुरक्षा दलाची कोणतीही हानी झालेली नाही. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (वृत्तसंस्था)
गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी २१० नक्षलवादी टिपले
गेल्या १२ जानेवारी रोजी बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. त्यात दोन महिलांचा समावेश होता. गेल्यावर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी चकमकींत २१० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
दोन जवान जखमी
बस्तरचे आयजी सुंदरराज पी. यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. विजापूर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोब्राच्या वेगवेगळ्या बटालियन आणि सुमारे १२०० ते १५०० सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. काही बडे नक्षलवादी नेते जंगलात आहेत. विजापूरमध्येच आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत.
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम 16 जानेवारीला गडचिरोलीत
विविध शासकीय योजनांचा घेणारआढावा
गडचिरोली दि.14 : राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. धर्मपाल मेश्राम 16 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि चर्चा होणार असून अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ते विविध संघटनांसोबत चर्चा व त्यांचेकडून निवेदने स्विकारणार आहेत. श्री. धर्मपाल मेश्राम यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी ११.३० ते दुपारी १.०० पर्यंत अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेसोबत आढावा व चर्चा. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या योजनांचा आढावा. दुपारी १.०० ते २.०० गोंडवाणा विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिव व प्रबंधकांसोबत शैक्षणिक विषयांवरील चर्चा. दुपारी २.०० ते ३.०० राखीव. दुपारी ३.०० ते ४.३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत विविध योजनांबाबत चर्चा. दुपारी ४.३० ते ५.०० अनुसूचित जाती-जमातीच्या संघटनांसोबत चर्चा व निवेदने स्वीकारणे. रात्री गडचिरोली येथे मुक्काम.
१७ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता गोंदियाकडे प्रयाण.
000
दिनांक 9/01/2025
ताज मलबार रिसॉर्ट कोचीन (केरळ) येथे ऊर्जा संबंधी संसदीय स्थायी समितीची बैठक पार पाडली. सदर बैठकीत भारत पेट्रोलियम, गेल, इंडियन ऑइल, एन एच पी सी, एन टी पी सी, एस जे व्ही एन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपण्यांचा आढावा घेण्यात आला. एन एच पी सी ही कंपनी हायड्रो पॉवरशी संबंधित असल्याने गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात अनेक नद्या असून पाण्याची मुबलकता आहे पण वाहत्या पाण्याचा कोणताही उपयोग या क्षेत्रात होत नाही. करिता या लोकसभा क्षेत्रात हायड्रो पॉवर प्रोजेक्ट निर्माण करण्याची शिफारस कमिटी सदस्य खासदार डॉ. किरसान यांनी केली आहे.
NDTV आणि बस्तर जंक्शन पत्रकार म्हणून कार्यरत असलेले छत्तीसगडमधील मुकेश चंद्रकार यांच्या हत्याप्रकरणी आज दिनांक 9/01/2025 ला इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे मूक मोर्चा काढण्यात आला. या वेळीस मुकेश चंद्रकार यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहून गडचिरोली पत्रकार बंधूंनी मूक मोर्चा काढून जिल्हा कलेक्टर यांना निवेदन सादर केले. त्या निवेदनात मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
मुकेश चंद्रकांर यांच्या या घटनेमुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूं मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या टोकाच्या दिशेला असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी तसेच रेतीमाफीया यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे आणि या सर्व गोष्टींना पत्रकारांना सामोरे जावे लागते म्हणून कलेक्टर साहेबांना निवेदन देते वेळेस ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी कलेक्टर साहेबांना अवगत केले.
तसेच पत्रकार संघटनेतर्फे त्यांना निवेदन केले की पत्रकारांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी असे पत्रकार बंधू कडून बोलण्यात आले. या मूक मोर्चा साठी बहुसंख्य स्त्री-पुरुष पत्रकार उपस्थित होते.
छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमदच्या जंगलात शनिवारी रात्री उशिरापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३ जानेवारीला नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त पथके अबुझमद भागासाठी रवाना झाली होती. 4 जानेवारीच्या संध्याकाळी अबुझमदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी मधूनमधून गोळीबार सुरू आहे.
बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, जंगलात शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत 4 गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्याकडून एके ४७ आणि एसएलआर सारखी स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दंतेवाडा डीआरजी जवान हेड कॉन्स्टेबल सन्नू करम हे शहीद झाले. सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि बस्तर जिल्ह्यातील 1 हजार DRG आणि STF जवानांनी शनिवारी नक्षलवाद्यांच्या मुख्य भागाला वेढा घातला होता. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. जवान अजूनही घटनास्थळी हजर आहेत.
गेल्या दीड वर्षात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कालावधीत 300 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत, सुमारे 1000 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून 837 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल, असा दावा केला होता. छत्तीसगड पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि शौर्याचे कौतुक केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, 'मी छत्तीसगडच्या जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे आणि आम्ही सर्वजण 2026 पर्यंत राज्यातून नक्षलवाद संपवण्यासाठी कटिबद्ध आहोत. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की छत्तीसगड पोलीस हे देशातील सर्वात धाडसी पोलीस दलांपैकी एक आहे. छत्तीसगडने स्थापनेच्या 25 व्या वर्षात प्रवेश केल्यामुळे, राज्य पोलिसांना राष्ट्रपतींच्या रंगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सैनिकांचे परिश्रम, समर्पण, शौर्य आणि लोकांवरील त्यांच्या प्रेमाचा हा दाखला आहे.
UP News Hindi: उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ में नए साल के पहले दिन हुए सामूहिक हत्याकांड ने सभी को हिला कर रख दिया है। शहर के एक होटल में एक ही परिवार की मां और चार बहनों की हत्या का मामला सामने आया है। इस खौफनाक घटना का आरोप परिवार के बेटे अरशद पर लगा है, जिसे पुलिस ने हिरासत में ले लिया है।
घटना लखनऊ के एक होटल शरणजीत में हुई, जहां आगरा से आया यह परिवार रुका हुआ था। कुल सात सदस्य होटल के कमरे नंबर 109 में ठहरे थे। इनमें से मां अस्मा (45) और उनकी चार बेटियों—आलिया (9), अल्शिया (19), अक्सा (16), और रहमीन (18)—का खून कर दिया गया।
पुलिस सूत्रों के मुताबिक, सभी मृतकों के गले और कलाई पर धारदार हथियार से किए गए वार के निशान मिले हैं। शुरुआती जांच में यह सामने आया है कि मृतकों को पहले नशीला पदार्थ दिया गया, जिससे वे बेहोश हो गए। इसके बाद उनके हाथ की नसें काट दी गईं, जिससे उनकी मौत हुई।
अरशद (24) को पुलिस ने हिरासत में लिया है। पूछताछ के दौरान वह केवल इतना कह रहा है कि, "यह हमारा पारिवारिक मसला है।" पुलिस इस बयान का मतलब समझने की कोशिश कर रही है। इस मामले में पिता बदर पर भी शक की सुई घूम रही है, लेकिन वह फिलहाल फरार है।
प्रारंभिक जांच में पारिवारिक विवाद को इस हत्याकांड की वजह बताया जा रहा है। पुलिस को शक है कि पारिवारिक कलह के कारण बेटे ने यह घातक कदम उठाया। अधिकारियों ने कहा कि पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद घटना के पीछे की असली वजह साफ हो पाएगी।
Gujarat News: गुजरात के बनासकांठा जिले में एक हैरान कर देने वाला मामला सामने आया है। एक होटल व्यवसायी ने अपनी मौत का नाटक कर 1.5 करोड़ रुपये की बीमा राशि हासिल करने की साजिश रची। हालांकि, पुलिस ने इस साजिश का पर्दाफाश कर दिया। मुख्य आरोपी दलपत सिंह परमार के तीन सहयोगियों को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि परमार की तलाश जारी है।
चौंकाने वाला खुलासा
पुलिस के अनुसार, वडगाम गांव में शुक्रवार को एक जली हुई कार के अवशेष मिले। कार के अंदर एक जले हुए मानव शव के अवशेष पाए गए। जब वाहन के पंजीकरण नंबर की जांच की गई, तो वह दलपत सिंह परमार का निकला। उसके परिवार ने शव की पहचान परमार के रूप में की, लेकिन पुलिस को कुछ संदेह हुआ। शव के नमूने फोरेंसिक जांच के लिए भेजे गए, जहां यह पुष्टि हुई कि नमूने परिवार के सदस्यों से मेल नहीं खाते।
जांच के दौरान पता चला कि परमार ने होटल निर्माण के लिए बड़ा कर्ज लिया था और उसे चुकाने में असमर्थ था। इस परेशानी से बचने के लिए उसने अपनी मौत का नाटक रचने का प्लान बनाया। योजना के अनुसार, परमार की मौत का दिखावा किया जाना था ताकि उसके परिवार को बीमा के 1.5 करोड़ रुपये मिल सकें। तब तक वह छिपा रहता।
बनासकांठा के पुलिस अधीक्षक अक्षयराज मकवाना ने बताया कि परमार ने चार महीने पहले मरे हुए एक युवक का शव चुराया और उसे कार में जलाया। गुजरात में कुछ हिंदू संप्रदाय अपने मृतकों को जलाने के बजाय दफनाते हैं। परमार ने ऐसे ही एक शव को चुराया और अपनी साजिश को अंजाम दिया।
पुलिस की गहराई से की गई जांच ने इस साजिश का भंडाफोड़ कर दिया। अब आरोपी के खिलाफ कानूनी कार्रवाई की जा रही है। इस घटना ने न केवल स्थानीय लोगों को, बल्कि पूरे राज्य को चौंका दिया है।
Gadchiroli News: गडचिरोली तालुक्यातील दिभना येथे 24 नोव्हेंबर रोजी एका तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. विवेक पुंडलिक भरडकर (वय 35) या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाइलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याच्या व त्रासाच्या कारणावरून आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचे सांगितले.
विवेक हा गोगाव (ता. गडचिरोली) येथील रहिवासी होता आणि गवंडी काम करायचा. 2013 साली त्याचा विवाह चंद्रपूर जिल्ह्यातील निमगाव येथील अल्का हिच्यासोबत झाला. लग्नानंतर काही काळ त्यांचे आयुष्य सुखकर गेले, मात्र नंतर कौटुंबिक कारणांवरून वाद होऊ लागले. यामुळे काही काळ अल्का माहेरी राहू लागली. नातेवाईकांनी समजावल्यानंतर ती पुन्हा सासरी परतली, पण समस्या संपल्या नाहीत.
16 नोव्हेंबर 2024 रोजी पती-पत्नीत जोरदार वाद झाला. त्यानंतर विवेक कामानिमित्त बाम्हणी येथे गेला, मात्र तो परतलाच नाही. 24 नोव्हेंबरला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. आत्महत्येपूर्वी विवेकने आपल्या मोबाइलमध्ये एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये त्याने पत्नी सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याचा व तिच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.
या व्हिडिओच्या आधारे विवेकचे वडील पुंडलिक भरडकर यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 25 डिसेंबरला भारतीय न्यायसंहितेच्या कलम 108 अंतर्गत विवेकच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक दीपक मोहिते करत आहेत.
ही घटना समाजातील कौटुंबिक संघर्षांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव करून देते. विवेकच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या प्रकरणाने सर्वांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.
Kanpur Latest News: हर शादीशुदा जोड़े के लिए शादी और हनीमून के पल बेहद खास होते हैं। यही पल कानपुर के आकाश सिंह और लखनऊ की सोनाली के जीवन में भी खुशियां लेकर आए। 9 दिसंबर को धूमधाम से शादी के बंधन में बंधने के बाद दोनों ने गोवा में अपना हनीमून मनाया। लेकिन हनीमून से लौटने के बाद जो हुआ, उसने सभी को हैरान और गमगीन कर दिया।
गोवा से लौटने के बाद आकाश अपनी पत्नी सोनाली को उसके मायके छोड़कर खुद अपने घर कानपुर लौट आया। लेकिन अगले ही दिन, शनिवार को, आकाश की रहस्यमय परिस्थितियों में मौत हो गई। उनकी मौत की खबर सुनकर सोनाली तड़प उठी और रोते हुए बोली, "मेहंदी के रंग उतरने से पहले ही मेरा सुहाग उजड़ गया।"
आकाश, जो एक प्राइवेट कंपनी में काम करता था, शादी के बाद खुशहाल जीवन की शुरुआत कर रहा था। लेकिन शनिवार को जब उनके दोस्त ने उनके कमरे में आकर देखा, तो आकाश बेड पर अचेत अवस्था में पड़े थे। तुरंत उन्हें कांशीराम अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया।
चकेरी थाने की पुलिस और फोरेंसिक टीम ने मौके पर पहुंचकर जांच शुरू की। शुरुआती जांच में हार्ट अटैक या किसी अन्य बीमारी से मौत का अनुमान लगाया गया, लेकिन कुछ भी संदिग्ध नहीं मिला।
आकाश की अचानक मौत से उनके परिवार और सोनाली के ससुराल में कोहराम मच गया। उनके बड़े भाई अतुल, जो ऑस्ट्रेलिया में नौकरी करते हैं, को इस दुखद खबर की सूचना दी गई। माता-पिता के निधन के बाद आकाश और अतुल ही परिवार के सदस्य थे।
DCP ईस्ट श्रवण कुमार सिंह ने कहा कि प्रारंभिक जांच में किसी संदिग्ध परिस्थिति का संकेत नहीं मिला है। पोस्टमॉर्टम रिपोर्ट का इंतजार किया जा रहा है, जिससे मौत की असल वजह का पता चल सके।
Pune Accident News: राज्यात अपघातांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही, आणि यामध्ये आता पुण्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने अनेकांचे संसार उघड्यावर टाकले आहेत. वाघोली येथील केसनंद फाट्यावर मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने नियंत्रण गमावून फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं. या दुर्दैवी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष), वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष), आणि रीनेश नितेश पवार (वय 3 वर्ष) अशी मृतांची नावं असून, जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सर्व जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघातावेळी या सर्व जखमी कामगारांची झोपेची वेळ होती. ते अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते आणि वाघोली येथील एका फूटपाथवर झोपले होते. अचानक भरधाव डंपरने नियंत्रण सुटलं आणि तो सरळ फूटपाथवर चढला. हा क्षण इतका भयानक होता की, या डोळ्यादेखत तिघांचा जीव गेला आणि इतर गंभीर जखमी झाले.
Weather Update Today: राज्यात आगामी काही दिवसांत वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात शनिवारी पहाटे दाट धुक्याची झालर पसरली होती, परंतु आता हवामान खात्याने राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार आहे. यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार असून, इशान्येकडील राज्यांत तसेच विदर्भात पावसाचा धोका अधिक आहे.
पावसाची शक्यता: 24 आणि 25 डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आर्दतेच्या वाढीमुळे ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ होण्याचीही शक्यता आहे. 25 ते 29 डिसेंबर दरम्यान राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहून किरकोळ पावसाची शक्यता आहे. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता अधिक आहे, ज्यामुळे नाताळात थंडी ऐवजी पावसाचा अनुभव घेता येईल.
थंडीची लाट ओसरत आहे: 30 डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे, असं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं आहे.
भारतीय हवामान: भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवस थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे. राजस्थान आणि पंजाबमध्ये दोन दिवस थंडीच्या लाटेचा प्रभाव राहील. यासाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम भारतात थंडीचा प्रभाव कमी होईल, पण 23 डिसेंबरपासून पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र धुक्याचा प्रभाव दिसून येईल. यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.