वर्धेतील घटनेने खळबळ; परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप
आर्वी (जि. वर्धा) : येथील विठ्ठल वॉर्डातील एका घरासमोरील फाटकाला बॉम्बसदृश वस्तू अडकविल्याचे दिसून आल्याने पहाटेपासून परिसरात दहशत होती. संबंधित वस्तूच्या वायर कापून पोलिसांनी ती निकामी केली व दुर्घटना टळली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले.
येथील वंदना ज्ञानेश्वर कारमोरे (५७) यांच्या घराबाहेरील फाटकाला बॉम्बसदृश वस्तूची पिशवी अडकविल्याचे दिसले. साफसफाईला उठलेल्या अनुप चोपकर हिला हा प्रकार दिसला
तिने आजी वंदना यांना सांगितले. पिशवीत बॅटरी व टायमर अशी बॉम्बसदृश वस्तू होती. एक आत आणि एक बाहेर अशा दोन चिठ्ठया होत्या. एका चिठ्ठीत 'हात लावू नका, अन्यथा मोठा स्फोट होईल', असे लिहिले होते. पिशवीतील बॉम्बसदृश वस्तूला टायमर होते. त्यावर ७:२९ अशी वेळ होती. त्याला लागूनच बॅटरीही होती. त्यामध्ये विविध रसायनांचे मिश्रण, तसेच आगडबीतील काड्यांवरील गुलाचा वापर केल्याचे दिसून आले.
घरातील मुलाचा साखरपुडा...
ज्ञानेश्वर कारमोरे यांचा मुलगा नवोदय विद्यालय अमरावती येथे प्राध्यापक आहे. त्याचा साखरपुडा एका मुलीशी झाला.त्यामुळे या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे पोलिस सांगतात, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांनी साखरपुडा झालेल्या मुलासह त्याच्या कुटुंबाची चौकशी करून माहिती घेतली आहे.
गाडीच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी
वर्धा, . लोकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये यासाठी जनजागरण करणारे पोलिसच दारू पिऊन तसे करत असतील तर काय म्हणावे? दारूबंदी असलेल्या वर्धेत एका मद्यधुंद महिला पोलिस शिपायाने हैदोस घातला आहे. खासगी कार चालवीत जाणाऱ्या महिला पोलिस शिपायाने एका दुचाकीस्वारास उडविले. त्यात ऋतिक कडू व पवन आदमने हे दोघे जखमी झाले. त्यांना त्याच अवस्थेत सोडून देण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रात्री उशिरा याबाबत रामनगर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी, या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
कडू व आदमने हे आपल्या दुचाकीने आर्वी नाक्याकडे निघाले होते. त्याच वेळी मागून येणाऱ्या कारने त्यांनाधडक दिली. दोघेही जखमी झाले. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तिथे धाव घेतली. तेव्हा स्टेअरिंग सीटवर महिला पोलिस दिसून आली.
सोबतचा पुरुष पोलिसही नशेत
लोकांनी हटकले तेव्हा महिला पोलिस नशेत असल्याचे आढळले. सोबतच कारच्या मागच्या सीटवर एक पोलिस अंमलदार नशेत निपचित पडून होता. दोघांना नागरिकांनी जाब विचारणे सुरू केले तेव्हा या दोघांनी पोलिसी तोऱ्यात रुबाब झाडत व हुज्जत घालत तेथून पळ काढला.
वर्धा : गावकुसात पण विविध आमिष देत मुलींना फसविण्याचा प्रकार जोरात आहे. या घटनेत पण असेच झाले. एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परतत होती. बसला उशीर म्हणून तिने गावातून जाणाऱ्या एका दुचाकीस्वार इसमास लिफ्ट मागितली. आरोपी अक्षयने आपुलकी दाखवीत तिला दुचाकीवर स्वार केले. मात्र नंतर त्याची नियत बदलली.
मासोद गावालगत जंगल वाट आहे. या ठिकाणी गाडी थांबवून जबरीने मुलीला खेचत नेले. काय घडणार याचा अंदाज आलेल्या त्या मुलीने आरोपीच्या हाताचा कडकडून चावा घेतला. मात्र पळ काढताना ती पडली अन् आरोपीने डाव साधण्याचा प्रयत्न केला. तिला विवस्त्र केले. आता सुटका नाही याचे भान येताच तिने ओरड सुरू केली. किंकाळ्या ऐकून बाजूच्या शेतातील शेतकरी सतर्क झाले. हातात बॅटरी घेवून त्यांनी शोधाशोध सुरू केली. गावकरी येत असल्याचे पाहून मग आरोपीने काढता पाय घेत धूम ठोकली. हे गंभीर प्रकरण म्हणून मग पोलिसांकडे जाण्याचा निर्णय झाला. पीडित मुलीने खरांगणा पोलिसात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाला असून पोलीस चौकशी करीत आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलसांत गुन्हा दाखल
पुसद, (ता.प्र.) तालुक्यातील वालतूर रेल्वे येथील तरुणाने गावातीलच 23 वर्षीय तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर वारंवार शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने नकार दिल्याने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात वसंतनगर पोलिस ठाण्यात रविवारी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सूरज दिलीप धुळे (वय 30, रा. वालतूर रेल्वे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सूरजने गावातीलच 23 वर्षीय तरुणीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून काकाच्या घरी कुणी नसताना बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना फोटोही काढले होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकी देत वारंवार बलात्कार करीत होता
बदनामीच्या भीतीने तरुणीदेखील त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. घटनेच्या दिवशीही तरुणाने शरीरसुखाची मागणी केली होती. अशात तरुणीने नकार दिल्याने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या तरुणीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर वसंतनगर पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगरचे ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक आशिष झिमते व पोलिस कॉन्स्टेबल गजानन जाधव करीत आहेत.