गडचिरोली हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून नावारूपास आलेला जिल्हा आहे आणि अशा उद्योग विरहित जिल्ह्यात आता एमआयडीसी निर्माण करून या जिल्ह्यामध्ये उद्योग निर्मितीला सुरुवात झालेली आहे.परंतु एकीकडे उद्योगपती निर्माण होणार आहे तर दुसरीकडे या या भागातील शेतकरी संपूर्णपणे जमीन दस्त होणार आहे,कारण शेतकऱ्यांच्या जमिनी आता उद्योगपत्यांच्या दावणीला बांधले जाणार आहे.
मान्य आहे उद्योग निर्मिती करण्याची म्हटल्या करायची म्हटल्यावर जमीन पाहिजे आहे परंतु उद्योग निर्मितीसाठी शेतकरी नागडा होणार आहे,म्हणजे त्याच्या पोटाची भाकर हिरावली जाणार आहे.उद्योगपती शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेणार आहे त्या बदल्यात त्यांना पैसे देणार आहे परंतु पैसा काही टिकून राहणारी वस्तू नाही.म्हणजे या भागातील शेतकरी हा नागडा होऊन एक दिवस रस्त्यावरती येण्याचा प्रकार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपती खरेदी करणार आहे त्या कुटुंबातील एकाला नोकरी मिळेल या गोष्टी आपण मान्य करू परंतु एका बापाला तीन मुले आहेत तर तिन्ही मुली-मुलांना नोकरी मिळणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि समजा नोकरी मिळाली तर त्याचा पद कोणता मिळेल हे मात्र नक्की सांगता येणार नाही,कारण कौशल्य विकासावर शिक्षण घेणारी विद्यार्थी बोटावर मापन इतपत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नशिबी कंपनी मधल्या टीकास आणि पावडा घेऊन दिवसभर राब राब राबण्याचं काम मिळणार आहे,म्हणजे पोटाची भाकर जाणारच आहे आणि तूट पूजा पगाराची नोकरी देऊन सांत्वन करण्याचा प्रकार आहे.
गडचिरोली हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे.जल,जंगल व जमीन हा या जिल्ह्याचा नारा आहे आणि हा नारा उद्योगपतीच्या दावणीला बांधला जाणार आहे.म्हणजे मुळासकट उकडून फेकल्या जाण्याचा प्रकार आहे.एवढ्या मोठ्या जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे तर इथले उद्योग सुद्धा जंगलाशी निगडित असायला पाहिजे म्हणजे जमीन अबाधित राहिली असती.शेतकरी रस्त्यावर आला नसता,जंगल जसेच्या तसे राहिले असते आणि समोर गडुळ होणारा पाणी सुद्धा शुद्ध राहिला असता.म्हणजे साप मेला असता आणि काठी सही सलामत राहिली असती,परंतु समोर धोका आहे !
युवा संकल्प ने गढ़चिरौली जिला कृषि अधीक्षक से पीएमकिसान ऑनलाइन दस्तावेज़ अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाने की मांग की।
गढ़चिरौली : पी.एम. किसान योजना के तहत कई नागरिकों ने अपना ऑनलाइन पंजीकरण कराया है। चूंकि पार्टू ऑनलाइन डॉक्यूमेंट में पीडीएफ को 200 केबी में अपलोड करना है। इस बिंदु पर दस्तावेज़ स्पष्ट रूप से दिखाई नहीं दे रहा है. इतने सारे नागरिकों के फॉर्म रद्द कर दिए गए हैं. और ऑफिस में उन्हें अक्सर भागदौड़ करनी पड़ती है। दस्तावेज़ अपलोड की अपलोड सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए। 2KB में परिवर्तन रजिस्टर एवं पति-पत्नी का आधार कार्ड एवं 16 वर्ष से कम उम्र के बच्चे का आधार कार्ड अपर्याप्त दस्तावेज हैं। सीमा को 2 एमबी तक बढ़ाया जाना चाहिए, इसके लिए उप निदेशक श्री सतीश पवार साहब से अनुरोध किया गया था, जिसमें राहुल भांडेकर, महेंद्र लठारे, रमेश कोठारे, तेजस कोंडेकर, राहुल वैरागड़े और अन्य उपस्थित थे।
ग्रामीण भागात वेळेवर बस फेऱ्या केव्हा येणार ; बस आगार व्यवस्थापकडे राहुल वैरागडे यांची मागणी.
चामोर्शी : तालुक्यात गडचिरोली आगारातील बसेस वाघोली, कळमगाव,घारगाव फराळा, वेलतूर तुकूम, बस वेळेत येत नसल्याने. विद्यार्थ्यांचे/विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुस्कान होत असल्याने सदरची बस वेळेत व नियमित लिहावी.याकरिता आग्रा व्यवस्थापक गडचिरोली यांना निवेदनातून म्हटले आहे. महामंडळाच्या बसेस सायंकाळच्या वेळेस उशिरा पोहोचत असतात. मुले विद्यार्थी हे सायकलीने घरी निघून जातात. मुली विद्यार्थिनी ही बसची वाट पाहत असतात. विद्यार्थ्यांची शाळा ही ५:०० सुट्टी होते किंवा शाळेकडून बाहेरगावच्या विद्यार्थिनींना ३० मिनिट पहिले सोडले जाते. तरीपण मुली विद्यार्थिनींना ७:०० वाजेपर्यंत वाट पहावी लागते महामंडळ बसेसच्या वेळापत्रकामध्ये उशीर होत. विद्यार्थिनींना बसेसची वाट पहावी लागते. उचित प्रकार केव्हाही नाकारता येत नाही.
बसेस महामंडळाकडून नियोजित वेळेत सोडावे याकरिता निवेदनातून मागणी करण्यात आली. उपस्थित तेजस कोंडेकर, ओमप्रकाश चौधरी, गंगाधर शेरमाके, राहुल वैरागडे,राहुल भांडेकर, राहुल गुरनुले, महिंद्रा लॉटरी, कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते.
शालेय क्रीडा स्पर्धेत मार्कंडा कंन्सोबा चे माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयी
आष्टी,
चामोर्शी तालुक्यातील आष्टी केंद्रांतर्गत चौडमपल्ली येथे घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत देयदीपम्यान कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले. या केंद्र स्तरीय झालेल्या व्हाॅलीबाॅल सामन्यात विजेतेपदावर नाव कोरून मार्कंडा कंन्सोबा शाळे च्या विध्यार्थ्यानी यशाला गवसणी घातली. चौडमपल्ली येथे दिनांक 10 ते 11 डिसेंबर रोजी केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा येथील माध्यमिक मुले आणि मुली व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजयावर नाव कोरले हा सामना ११ डिसेंबर रोजी झाला चुरशीच्या लढतीत विजय मिळविला
शालेय स्तरावर या क्रीडा स्पर्धांना महत्व असते. विध्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असतात त्यात मार्कंडा कंन्सोबा शाळेने दमदार कामगिरी बजावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा चौडमपल्ली येथे घेण्यात आल्या.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्कंडा कंन्सोबा च्या विजयी चमूने गावात विजयी रॅली काढून आनंद व्यक्त केला व शाळे च्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. चमू शिक्षक कु. नितीन बहिरेवार, मुरमुरवार, यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक बि. टी. घोडाम यांनी अभिनंदन करून मुलांचा उत्साह वाढविला
न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाच्या स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने मृत्यू
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोहवा /2752 उमाजी होळी, नेमणूक - पोलीस मुख्यालय गडचिरोली, हे आज दि 11/12/2024 रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर हजर होते. दुपारी 02:55 वा चे सुमारास होळी हे जिल्हा न्यायालय गडचिरोलीचे आवारात गाडीत बसलेले असताना त्यांचे स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केलेले आहे.
प्रथमदर्शनी होळी यांचेकडून अनावधानाने गोळी झाडली गेल्याचे दिसून येते आहे.
पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल व इतर वरीष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देऊन घटनेची अधिक माहिती घेतली आहे. मयत होळी यांचे कुटुंबीयांना गडचिरोली पोलीस दलाकडून सर्व सहायता देण्यात येत आहे. उद्या दि. 12/12/2024 रोजी उमाजी होळी यांचा अंत्यविधी त्यांचे स्वगाव मोहटोला, बेळगाव ता. जि. गडचिरोली येथे सर्व सन्मानात करण्यात येणार आहे.
पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत .
जिल्हयात 15 दिवस जमावबंदी
गडचिरोली,(जिमाका),दि.11: जिल्ह्यात दिनांक 25 डिसेंबर 2024 या कालावधीत ख्रिसमस नाताळ जिल्हयात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु होणार आहे .याशिवाय काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी संजय दैने यांनी संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 12 डिसेंबर 2024 ते दिनांक 26 डिसेंबर 2024 चे मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु करण्यात आलेले आहे.
सदर कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही.
नवजात शिशुच्या जौविक पालक व नातेवाईकांनी भेटण्याचे आवाहन
गडचिरोली,(जिमाका),दि.10: दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी अंदाजे वय 01 दिवस, मौजा, खरपुंडी ते आकरटोली कडे जाणारा रस्ता ता. गडचिरोली जिल्हा. गडचिरोली येथे बालक आढळुन आलेला असता मा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली जि. गडचिरोली येथे सदर बालकांची तक्रार नोंद करण्यात आली असून त्या अनुषंगाने दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी सदर बालकाला मा. बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या समक्ष सादर केले असता, मा. बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये सदर बालकाला लोक कल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, व्दारा संचालीत गडचिरोली, पंचवटी वॉर्ड, बजरंग नगर, हनुमाण मंदिराच्या पाठीमागे जि. गडचिरोली या विशेष दत्तक संस्था येथे दाखल करण्यात आलेले आहेत.
करिता सदर बालकांचे जैविक माता-पिता व नातेवाईक यांनी बालकांचा ताबा मिळणेकरिता बातमी प्रकाशीत झाल्यापासुन 15 दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय बॅरेक क्रमांक 01, खोली क्रमांक 26, 27 कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली मोबाईल क्रमांक- 9403704834, दुरध्वनी क्रमांक:-07132-222645 यावर संपर्क साधावा व जर मुदतीत दिलेल्या तारखेस संपर्क साधला नाही तर केंद्रिय दत्तक प्रधिकरण (CARA) नवी दिल्ली यांचे अधिसुचना नुसार दत्तक प्रक्रिये करिता सदर बालकास मा.बाल कल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये दत्तकाकरिता विधी मुक्त करुन सदर बालकांची दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन श्री. अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.
ऑल इंडिया किसान सभेचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश : मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
9 डिसेंबर 2024 रोजी अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन यशस्वीपणे पार पडले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक मा. बरगमकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, हेडरी येथे धान खरेदी केंद्र येत्या दिवसांत मंजूर करून खरेदी सुरू करण्यात येईल, तसेच गर्देवाडा केंद्रातील मागील हंगामातील धान उचल तातडीने करण्यात येईल.
आंदोलनात प्रमुख नेते ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्र राज्यकार्यध्यक्ष म्हणून कॉ.डॉ महेश कोपुलवार, कॉ सुरेश चवळे जिल्हा सचिव, सचिन मोतकुरवार (अहेरी विधानसभा प्रमुख, किसान सभा), कॉ. रमेश कवडो (तालुका अध्यक्ष, किसान सभा), मा सैनुजी गोटा (माजी जिल्हा परिषद सदस्य ), मा कन्ना गोटा गाव पाटील गट्टा, मा दोडगेजी गोटा माजी सरपंच, मा महारु लेकामी उपसरपंच गट्टा, मा महादू कवडो गाव पाटील रेकलमेट्टा, मा रामसू नरोटी पाटील वांगेतूरी, मा दानू हिचामी रेकणार, मा विशाल पुजालवार, राजेश मुजुमदार, रितेश जोई, रामलू गोटा,पत्तू पोटावी,धर्मा तिम्मा पाटील मेड्री तसेच स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर ठोस तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
या आंदोलनाने अहेरी विधानसभेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळवून दिले आहे. विशेषतः, धान खरेदी केंद्रांसाठी हेडरी, गट्टा, गर्देवाडा यांसारख्या ठिकाणी गोडाऊन मंजूर करणे, मागील हंगामातील धान उचल पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणे या मुद्द्यांवर लोकाभिमुख लढा उभारला गेला.
अलीकडच्या काळात अहेरी विधानसभेत शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित असा व्यापक आंदोलन पहिल्यांदाच पाहायला मिळाला. ऑल इंडिया किसान सभेच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सभेने पुन्हा एकदा आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.
- ऑल इंडिया किसान सभा
(अहेरी विधानसभा क्षेत्र )
Gadchiroli News: आरमोरी तालुक्यातील कुरंडीमाल ग्रामपंचायतीचा शिपाई अमृत सुखदेव सराटे (30, रा. कुरंडीमाल) हा 16 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह 3 डिसेंबरला गावालगतच्या जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला. त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अमृत सराटे हा 16 नोव्हेंबरला सकाळी शौचास जातो म्हणून घरून निघून बाहेर पडला होता, परंतु बराच वेळ होऊनसुद्धा तो घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण त्याचा शोध लागला नाही. अखेर कुटुंबातील व्यक्तींनी आरमोरी पोलिस ठाणे गाठून बेपत्ताची तक्रार नोंदविली.
दरम्यान, 3 रोजी गावातील एक व्यक्ती सरपण आणण्यासाठी जंगलात गेला असता त्यास कोजबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली होती.
आरमोरी पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून जागेवरच उत्तरीय तपासणी केली.
त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आरमोरी ठाण्यात 'आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. व्हिसेरा राखून ठेवला असून अधिक तपास सुरू असल्याचे पो. नि. कैलास गवते यांनी सांगितले.
गडचिरोली:-
३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो.
जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना 'सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे' ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग व्यक्ति आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकरिता विविध प्रकारचे पुनर्वसनात्मक शिक्षण व प्रशिक्षनात्मक कार्यक्रम जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद द्वारा वर्षभर आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'जागतिक दिव्यांग दिनाचे' आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित सदस्य रामदास मसराम हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकीत्सक माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक सतिश साळूंखे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजीत राउत उपस्थित होते.
या 'जागतिक दिव्यांग दिनाचे' औचित्य साधुन जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचेद्वारा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना यु. डी. आय. डी. कार्ड, रेल्वे सवलत प्रमाणपत्र, विविध साहित्य व उपकरणे तसेच ५ टक्के दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सामूहिक तथा वैयक्तिक विविध कल्याणकरी योजनेचे लाभ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, गडचिरोली यांचेद्वारा दिव्यांग युवकांकरीता निःशुल्क आयोजित करण्यात येत असलेल्या 'कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमा'चे उद्घाटन श्री रामदास मसराम व श्री. आर. आर. पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रशिक्षण निवड प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.
यावेळी दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात विशेष कार्य करणा-या व्यक्तींचा सत्कार सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गडचिरोली:-जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, उपचार करिता “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून सदर डीईआयसी मध्ये जन्मता असणारे आजार, शारीरिक व बौद्धिक विकासात्मक वाढीतील दोष, जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार, बालपणातील आजार, व इतर आढळलेल्या बालकांच्या आरोग्य तपासण्या व उपचार केले जातात.
बालकांच्या शस्त्रक्रियेच्या निदान व नियोजनकरिता जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ सतीशकुमार साळुंखे, डॉ. बागराज धुर्वे, सामान्य रुग्णालय गडचिरोली, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत आखाडे जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर, बाल आरोग्य विभाग गडचिरोली तर्फे बालकांमधील जन्मता असणारे दोष बाबत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर व बालकांमधील शस्त्रक्रिया या विषयावर सीएमई-प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी डीईआयसी, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले. जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, अति जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बालरोग तज्ञ डॉ. तारकेश्वर उईके व डॉ. प्रशांत पेंदाम, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बाल तपासणी शिबीर व प्रशिक्षण पार पडले. संदर्भित विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी सीएमई-प्रशिक्षणाकरिता नागपूर येथील प्रसिद्ध डॉ.राउत वरिष्ठ बालरोग शल्य चिकित्सक तज्ञ व चमू लता मंगेशकर रुग्णालय नागपूर येथील तज्ञ उपस्थित झाले.
शिबिरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील शालेय तपासणी दरम्यान आढळून आलेले तसेच इतर ठिकाणाहून संशयित संपूर्ण संदर्भित बालके/विध्यार्थी यांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी उपस्थित विषेशज्ञ यांच्याकडून निदान निश्चिती करण्यात आली. यामध्ये एकूण ४८ विद्यार्थी/बालके यांनी लाभ घेतला. यामध्ये हर्निया, हायपोस्पाडीस, हायड्रोनेफ्रोसीस, अनडीशेंडेड टेस्टीस, फायमोसीस, व इतर पात्र बालकांची शस्त्रक्रियेसाठी तृतीय स्तरावर संदर्भ सेवे करिता नियोजन करण्यात येणार आहे. सदर सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. राज्य सामंजस्य करार असलेल्या रुग्णालयाशी समन्वय साधून वेळोवेळी उच्च स्तरीय शल्यचिकित्सक विशेषज्ञ सल्ला सेवा, गरजेनुसार उच्च स्तरीय विशेष चाचण्या व इतर प्रक्रिया चे सनियंत्रण करून डीईआयसी मार्फत शस्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भित करण्यात येणार आहे.
यापूर्वी जन्मजात आजाराच्या निदान निश्चिती करिता तपासणीसाठी गडचिरोलीच्या रुग्णाला नागपूर, मुंबई, पुणे येथे जावे लागत असे. परंतु बरेचसे पालक मोठ्या शहरापावेतो जाण्यास तयार नसतात. त्यामुळे बऱ्याच बालकांना निदान व उपचारासाठी मुकावे लागत होते. बालकांमध्ये जन्मता असणारा आजार आहे किंवा नाही हे ओळखून पालकांना लक्षात यायला खुप उशिर लागतो. जितके लवकर निदान तितका लवकर उपचार, परंतु डीईआईसीमुळे या निदान निश्चितीसाठी आता जिल्हातील रुग्णाला व त्याच्या पालकांना परजिल्ह्यात जावे लागणार नाही. लहान मुलांमधील जन्मता असणारे व इतर आजारासाठी डीईआयसी एक पर्वणीच ठरली आहे.
गडचिरोली,(जिमाका):-जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, थेरेपी, उपचार, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, गरजेनुसार उच्च स्तरीय चाचणी/तपासणी व शस्त्रक्रिया करिता तृतीय स्तरीय संदर्भ सेवा इत्यादींकरिता राज्यशासनाच्या मार्गदर्शकानुसार “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून बालआरोग्य विभाग “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित आहे.
सदर डीईआयसीयेथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच इतर तालुक्याच्या ठिकाणाहून प्राथमिक तपासणी दरम्यान आढळून आलेले बालके/विद्यार्थी ज्यांना पुढील तपासणी, निदान निश्चिती, त्याचप्रमाणे उच्च स्तरीय बाल विशेषज्ञ सल्ला/सेवा, उच्चस्तरीयउपचार, अश्या द्वितीय स्तरीय सेवांची गरज असते अश्या बालकांची डीईआयसी (द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष) येथे नोंदणी केली जाते. डोळ्याचे आजार असलेल्या बालकांच्या डोळ्याचे निदान निश्चिती साठी बाल नेत्र विशेषज्ञ सल्ला आवश्यक असणाऱ्या बालकांकरिता दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये साराक्षी नेत्रालय नागपूर येथील उच्च स्तरीय बाल नेत्र विशेषज्ञ चमू उपस्थित झाली. शिबिर मध्ये जिल्ह्यातील एकूण ९४ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यांचा पालकांना डोळ्यांच्या आजाराबाबत, शस्त्रक्रियेबाबत समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज आहे या बालकांच्या विशेष चाचण्या करून शस्त्रक्रियेकरिता पात्र बालकांना तृतीय स्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन होणार असून काही नवजात बालकांना शिघ्र हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर या चिमुकल्यांना शस्त्रक्रियेकरिता उच्चस्तरावर संदर्भित करण्याचे नियोजन झालेले आहे.
या सर्व सेवा निशुल्क आणि मोफत तसेच बाहेरील तज्ञ जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने बालकांचे पालक समाधानी आहेत.
लहान बालकांच्या डोळ्यासंदर्भात, दृष्टीसंदर्भात वेळीच आणि लवकर हस्तक्षेप करणे गरजेच आहे. तसे न केल्यास मूल्यांच्या वाढीच्या टप्प्यावर परिणाम होण्याचे संकेत असते. व भविष्यात मोठ्या संकटांना समोर जाव लागू शकतो.
सदर ‘विशेषज्ञ बाल डोळे तपासणी शिबीर’ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके, डॉ.धुर्वे सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.आखाडे जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या नियोजनाखाली पार पडले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता डीईआयसीतील अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ.माधुरी किलनाके यांनी कळविले आहे.
गडचीरोली : मजुरीचे वाढलेले दर, मजुरांचा तुटवडा तसेच खते, औषधांच्या बेसुमार दरवाढीने शेती कसणे तोट्यात जात आहे. शेती कसण्यावर खर्च करताना शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच बाजारात नवीन धानाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठीआर्थिक लूट होत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पीक धान लागवडीखालील आहे. सध्या धानाची कापणी अंतिम टप्प्यात आहे, तर मळणीलाला सुरुवात झालेली आहे.
२,३०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव किती?
• मागील वर्षीच्या हंगामात साधारण धानाला २ हजार १८३ रुपये तर 'अ' दर्जाच्या धानाला २ हजार २०३ रुपये प्रतिक्विंटल दर होता. यावर्षीच्या खरीप हंगामातील साधारण धानाला २ हजार ३०० रुपये तर 'अ' दर्जाच्या धानाला २ हजार ३२० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.
नव्या धानाला यंदाही 'साडेसाती'
मागील वर्षी 'अ' दर्जाच्या नव्या धानालाही ३ हजार रुपयांच्या आसपास भाव मिळाला होता. यंदा या प्रतीच्या धानाला २ हजार ४०० ते २ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. साधारण धानाची खरेदी तर १ हजार ८०० ते २ हजार रुपये दरात केली जात आहे. अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
मजुरांची टंचाई शेतकरी हतबल
जिल्ह्यात सध्या शेतीकामासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे. मजुरांचा शोध घेताना शेतकरी हतबल होत आहे. परिणामी अनेकजण हार्वेस्टरचा वापर करत असल्याचे दिसून येते.
पोर्ला, टेंभा येथे हमीभावापेक्षा कमी दरात धानाची खरेदी
पोर्ला, टेंभा व अमिर्झा येथे हमीभावापेक्षा कमी दरात धानाची खरेदी केली जात आहे. पोर्ला येथील एक व्यापारी १ हजार ८०० रुपये दर प्रतिक्चिटल याप्रमाणे धान खरेदी करीत आहे. याशिवाय हमालीच्या नावावर शेतकऱ्यांकडून दोन किलो अतिरिक्त धान्य व झुकते माप घेतले जात आहे. अशा व्यापाऱ्यांवर पुरवठा विभाग व वजनमापे निरीक्षक केव्हा कारवाई करणार का?
दिनांक: २६ नोव्हेंबर
गडचिरोलीपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वसा पोर्ला या वनपरिक्षेत्रात मागील दोन दिवसांपासून हत्तींचा कळप वावरत असल्याचे समजले. या घटनेमुळे गावकरी भयभीत झाले असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत गावकऱ्यांनी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांना ही माहिती कळवली.
माहिती मिळताच माजी खासदार अशोकजी नेते यांनी तातडीने वसा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. नेते यांनी गावकऱ्यांना धीर देत न घाबरता एकजुटीने राहण्याचे आवाहन केले.
हत्तींचा बंदोबस्तासाठी विशेष टीम दाखल
हत्तींचा वावर नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितरीत्या परिसराबाहेर नेण्यासाठी पश्चिम बंगालमधून श्याम तुंडू यांच्या नेतृत्वाखाली ११ जणांची विशेष टीम बोलवण्यात आली आहे. हत्तींच्या वावरामुळे गावकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग सक्रिय झाला आहे. माजी खासदार अशोकजी नेते यांनी हत्तींचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी प्रमुख उपस्थिती:
या पाहणीवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजप नेते लोमेशजी कोलते, वडसा उपवनसंरक्षक बी. आर. वरुण, पोर्ला वन क्षेत्र सहाय्यक जी. एस. गेडाम, पोर्ला वनसंरक्षक व्ही. टी. शिवनकर, किटाळी वनसंरक्षक एन. व्ही. भोयर, साखरा वनसंरक्षक धर्मपाल मेश्राम यांसह मोठ्या संख्येने वनमजूर, गावकरी आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हती संबंधीत गावकऱ्यांसाठी आवाहन:
वनविभागाच्या या कारवाईमुळे गावकऱ्यांनी दिलासा मिळाला असून, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हत्तींचा वावर रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून लवकरच परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास माजी खासदार अशोकजी नेते यांनी व्यक्त केला.
गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात 76.97 टक्के, गडचिरोली 74.92 टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात 73.89 टक्के मतदान झाले.
आरमोरी मतदारसंघात 1 लाख 31 हजार 60 पुरुष मतदार, 1 लाख 31 हजार 710 महिला आणि 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 62 हजार 771 मतदार होते त्यापैकी एक लाख 2 हजार 720 पुरुष, 99 हजार 546 महिला व 1 तृतीयपंथी असे एकूण दोन लाख 2 हजार 267 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लक्ष 54 हजार 610 पुरुष मतदार , 1 लाख 52 हजार 610 महिला व 3 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 7 हजार 223 मतदार होते. यातील 1 लाख 16 हजार 704 पुरुष मतदार, 1 लाख 13 हजार 469 स्त्री मतदार तर 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 30 हजार 174 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लक्ष 26 हजार 481 पुरुष मतदार , 1 लाख 24 हजार 974 महिला व 6 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 51 हजार 461 मतदार होते. यातील 95 हजार 511 पुरुष मतदार, 90 हजार 281 महिला मतदार तर 3 तृतीयपंथी असे एकूण 1 लाख 85 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात एकूण 4 लाख 12 हजार 151 पुरुष मतदार, 4 लाख 9 हजार 294 महिला आणि 10 तृतीयपंथी असे एकूण 8 लाख 21 हजार 455 मतदार होते. त्यापैकी 3 लाख 14 हजार 935 पुरुष, 3 लाख 3 हजार 296 महिला व 5 तृतीयपंथी असे एकूण 6 लाख 18 हजार 236 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली :-६८-गडचिरोली(अ.ज.) मतदारसंघात प्रत्येकी एक असे आदर्श मतदान केंद्र,दिव्यांग मतदान केंद्र , सखी(महिला) मतदान केंद्र व युथ मतदान केंद्र यावेळी स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेश द्वारापासून ते मतदान कक्षापर्यंत आकर्षक व उत्कृष्ट सजावट केली होती. या सजावटीमुळे मतदार भारावले. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांने आनंदाने व उत्साहाने मतदान केले.
गडचिरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेतील खोली क्रमांक १ मध्ये आदर्श मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक १२२) स्थापना केले होते. यामध्ये एकूण ८२६ मतदारांपैकी ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालय मध्ये खोली क्रमांक १ मध्ये दिव्यांग मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित दिव्यांग मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक ९२)स्थापना केले होते.यामध्ये एकूण ७२८ मतदारांपैकी ४८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली येथील पंचायत समिती कार्यालयातील बचत भवन मध्ये महिला मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित सखी(पिंक बूथ) मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक ८८)स्थापना केले होते.यामध्ये एकूण ५७० मतदारांपैकी ३२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील खोली क्रमांक ४ मध्ये युवा मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित युथ मतदान केंद्र(मतदान केंद्र क्रमांक २२३) स्थापना करण्यात आली होती. यामध्ये एकूण १ हजार १५९ मतदारांपैकी ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सावली
सावली शहरातील प्रभाग क्रमांक 02 व प्रभाग क्रमांक 04 येथील युवा होतकरू युवकांनी भारतीय जनता पार्टीच्या धोरनांवर विश्वास ठेवत आज दिनांक 16 नोव्हेंबर 2024 ला ब्रह्मपुरी-सावली-सिंदेवाही विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार कृष्णलाल सहारे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. त्यात प्रफुल्ल गोंगले
नितेश बोरकर,साहिल रामटेके,रोहित कोसनकर,अमन खोब्रागडे,सुमित शंभरकर यांनी महायुतीचे उमेदवार कृष्णालाल सहारे यांच्या हस्ते भाजपाचा दुप्पटा टाकून प्रवेश देण्यात आला. युवकांनी केलेल्या प्रवेशाचे सर्वानी स्वागत करून आनंद व्यक्त केले.यावेळी सावली तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेविका नीलम सुरमवार, सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,जेष्ठ नेते नंदकिशोर संतोषवार, मनोज अमरोजवार सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली :- दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आदिवासी परधान समाज मंदीर गडचिरोली येथे आदिवासिंच्या जल, जंगल, जमीन यासाठी इंग्रजांविरुद्ध प्रखर संघर्ष करणाऱ्या भगवान बीरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून
प्रियदर्शन मडावी, जिल्हाअध्यक्ष आदिवासी टाइगर सेना, अध्यक्षस्थानी आदीवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी , प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. किर्तिकुमार उईके ,महेश गेडाम,मुल, ज्येष्ठ नागरिक मानसिंग सुरपाम, सुरज शेडमाके , गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह, विनोद सुरपाम, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुळमेथे, महेंद्र मसराम हे होते.
सर्वप्रथम आदिवासी जननायक क्रांतीसुर्य, धरतीआबा, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी समाज मंडळाचे युवा सदस्य अजय सुरपाम, आदिवासी एकता युवा समितीचे उपाध्यक्ष सुधीर मसराम,युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सलामे, विजय सुरपाम, नंदकिशोर कुंभारे,गणेश मेश्राम, टाइगर ग्रूप सदस्य आकाश कुळमेथे, अनिकेत बांबोळे, मुकुंदराव उंदीरवाडे, राज डोंगरे, राकेश कुळमेथे, विक्की मसराम,योगेश कोडापे,नितीन शेडमाके,अंकित कुळमेथे, सुरज गेडाम, साहिल शेडमाके,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल गोवर्धन,ताजिसा कोडापे, महिला सदस्य शालू सुरपाम, शोभा शेडमाके, गंगा सलामे, सुनिता मसराम, प्रफुला जुनघरे,वनिता कोडापे, निरुता कोडापे, सोनाली सुरपाम, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुधीर मसराम यांनी केले तर आभार रुपेश सलामे यांनी मानले.
भामरागड: येथील ग्रामीण रुग्णालयात तीन प्रशिक्षणार्थी परिचारिकांची सहकारी कर्मचाऱ्यांकडूनच छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार १३ नोव्हेंबरला उजेडात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नव्याने भरती झालेल्या परिचारिकांना प्रशिक्षणार्थी म्हणून विविध आरोग्य केंद्रांत पाठविण्यात आले आहे. त्यानुसार भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठविलेल्या तीन परिचारिकांसोबत हा किळसवाणा प्रकार घडल्याने संतापाची लाट पसरली आहे. या परिचारिकांनी ग्रामीण रुग्णालयातील महिला तक्रार निवारण समितीसह वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेत तिघांनाही ग्रामीण रुग्णालयातून कार्यमुक्त करून जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेकडे पाठवले आहे. या तिघांवर काय कारवाई होते, याकडे आरोग्य वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
भामरागड येथील घटनेची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात कार्यालयीन तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करून अहवाल मागवला आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.
-डॉ. माधुरी किलनाके,
जिल्हा शल्यचिकित्सक
यांच्याविरुद्ध आहे तक्रार प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एका परिचारिकेच्या तक्रारीनुसार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी तिला खांद्यावरहात ठेवून कानात मला तू आवडते,असे म्हटला.
कनिष्ठ लिपिक खोकल्याचे औषध मागण्याच्या बहाण्याने परिचारिकेला बोलावून घेतले. त्यानंतर जवळ खुर्चीत बसवून आक्षेपार्ह संभाषण केले. १० नोव्हेंबर २०२४ला ही घटना घडली.
वैज्ञानिक सहाय्यक
प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीस फोन करून १३ नोव्हेंबर २०२४ रोजी तू साडीवर खूप छान दिसते, असे म्हटला.
गडचिरोली -
महाराष्ट्राची उपराजधानी व संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा घेण्यात येते. व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी 'साहित्य विहार उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने' पुरस्कृत करण्यात येते. व विजेत्या २५ साहित्यिकांना नामवंत साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "महापूजा " या नाटकास नाट्यलेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे साहित्य विहार संस्थेचे सचिव सौ. मंदा खंडारे व अध्यक्षा सौ. आशाताई पांडे यांनी पत्राद्वारे कळविले असून ३० नोव्हेंबरला दु. २ ते ५ या वेळात बाबुराव धनवटे सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटल, शंकर नगर, नागपूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रतिथयश शिक्षणतज्ञ डॉ. विनायक देशपांडे आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे हस्ते तसेच ज्ञानयोगी सन्मानाचे मानकरी डॉ. म. रा.जोशी व साहित्य विहार च्या अध्यक्ष ज्येष्ठ बहुभाषिक साहित्यिक आशा पांडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, सन्मानपत्र व ग्रंथभेट असे आहे.
'महापूजा' हे सन २००२ ते २०१० या कालावधीत संपूर्ण झाडीपट्टीतील गाजलेले महानाट्य असून ५१ कलावंत आणि १५ तंत्रज्ञांनी या नाटकात काम केले आहे . झाडीपट्टीत या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत .
विशेष म्हणजे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" व "धरती आबा क्रांतीसुर्य - बिरसा मुंडा" या दोन नाटकांना विविध स्तरांवर नाट्यलेखनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'महापूजा' या महानाट्यास मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक), व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.