PostImage

Vaingangavarta19

Sept. 12, 2024   

PostImage

कोल्हापूर येथे दि. 22 सप्टेंबरला ऐतिहासिक मेळाव्याचे आयोजन


कोल्हापूर येथे दि. 22 सप्टेंबरला ऐतिहासिक मेळाव्याचे आयोजन 

दगडू भास्कर करणार नवीन संघटनेची घोषणा 

 

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १८

 कोल्हापूर :-एकेकाळचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे फायरब्रँड नेते दगडू भास्कर यांच्यावर प्रेम करणाऱ्या समर्थकांचा राजव्यापी ऐतिहासिक मेळावा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे होत असून या मेळाव्यास महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून भास्कर समर्थक उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकाच्याकडून देण्यात आली.
      याच मेळाव्यात ते नवीन संघटनेची घोषणा करणार असून मेळाव्याच्या उदघाट्नप्रसंगी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदात सतेज पाटील व माजी प्राचार्य डॉ. हरिष भालेराव हे उपस्थित राहाणार आहेत तरी दगडू भास्कर यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी नियोजित वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 11, 2024   

PostImage

आष्टी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ पंदीलवार यांच्या परिवाराची महालक्ष्मी …


आष्टी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते 
संजयभाऊ पंदीलवार यांच्या परिवाराची महालक्ष्मी स्थापनेची १७ वर्षा पासून परंपरा कायम


 दरवर्षी प्रमाणे यंदाही होणार भक्तांची दर्शनासाठी गर्दी 


आष्टी:-
आष्टी येथील प्रतिष्ठित शेतकरी, व सामाजिक कार्यकर्ते संजय नानाजी पंदीलवार व माजी जिल्हा परिषद सदस्या रूपालीताई पंदिलवार यांच्या परिवारात १८ वर्षांपासून अखंडपणे दरवर्षी भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी स्थापनेची परंपरा कायम राखली जात आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा पंदीलवार परिवारात महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे.
पंदीलवार परिवारात २००८ पासून भाद्रपद महिन्यात महालक्ष्मीची स्थापना करून पूजाअर्चना केली जात आहे. ही अखंड परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालविला जात आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आष्टी परिसरातील इल्लूर, अनखोडा, कढोली, चपराळा, चौडमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, चंदनखेडी, मार्कंडा (कं) आदी गावातील भाविक मोठ्या संख्येने येऊन मनोकामनेसाठी प्रार्थना करतात. या उत्सवात सर्व जाती, धर्माचे लोक सहभागी होत असल्याने सर्व धर्म समभावाचे वातावरण येथे निर्माण होत असते.
पंदिलवार परिवारांकडून सातत्याने सामाजिक कार्यात योगदान राहत असल्यामुळे त्यांच्याकडील उत्सवात परिसरातील नागरिक सहभागी होत असतात. परिवाराकडून अपघातग्रस्तांना मदत वैद्यकीय उपचारासाठी मदत करणे, नैसर्गीक आपत्ती ग्रस्तांना मदत केली जाते हा वारसा त्यांनी मागील अनेक वर्षांपासून चालविला आहे. यामुळे त्यांच्या घरील महालक्ष्मी उत्सवाला विशेष महत्व प्राप्त होत असते. संजयभाऊ पंदिलवार हे स्वतः या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी परिसरातील जनतेला निमंत्रित करतात व सर्व भाविकांना स्नेहभोज करण्याची विनंती करतात असे संजूभाऊ मनमिळाऊ स्वभावाचे धनी असल्याने परिसरातील जनतेला त्यांचे कौतुक वाटते आहे


PostImage

Vaingangavarta19

Sept. 9, 2024   

PostImage

मी तुझ्यासोबत लग्न करतो असे बोलले व महिन्याभरात चौघांनी केला …


मी तुझ्यासोबत लग्न करतो असे बोलले व महिन्याभरात चौघांनी केला अत्याचार 

मुलगी गर्भवती झाल्याने बिग फुटले 

 

 1 जण अटकेत 3 जण फरार.

 

चिमुर : 
चिमूर तालुक्यातील एका मुलीला मी तुझ्या बरोबर लग्न करतो असे म्हणून  4 व्यक्तीनी
तिचेवर महिनाभर अत्याचार केला मात्र मुलगी गर्भवती झाल्याने बिग फुटले.
 प्राप्त माहितीनुसार दिनांक 01 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या दिवसा दरम्यान सदर युवती घरी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणीला पैशांचे, व लग्नाचे आमिष दाखवून तिचे सोबत जबरदस्तीने वेगवेगळ्या दिवशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे.

त्यामुळे माहे मार्च 2024 पासुन युवती ची मासिक पाळी बंद होऊन तिचे पोट वाढून लागल्याने दिनांक 06 सष्टेबर ला खाजगी नर्सिंग होम मध्ये तपासणी केली. असता सोनाग्राफी करून अहवालानुसार ती सात महिण्याची गर्भवती असल्याचे  निष्पन्न झाले 

दिनांक, 07 सप्टेंबर ला सदर युवती च्या आईच्या तोडी तक्रार  वरुन चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली
 या घटनेचे आरोपी  प्रविण दाबेकर, विक्की गोरवे, प्रज्वल गोडेकर, संदिप देविदास खोडेकर, या चार व्यक्तीनी सामूहिक लैंगीक शोषण अत्याचार केला असे सांगीतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नात्याला काळीमा फासणारी आहे. लैंगिक शोषण करणारा एक युवतींचा नात्यांनी भाऊ आहे अशी चर्चा परीसरात सुरू आहे.

कलम 376, 376G (2) (F), 34 भादवी सहकलम 4.8, पोक्सो कलम 3(1) (w) (1) (ii), 3(2) (va) अनू, जाती, जमाती अत्या प्र.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदिप देविदास खोडकेर वय, 30 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे.

3 व्यक्ती अजूनही फरार असून शोध सुरु आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Sept. 9, 2024   

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन …


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आष्टी:-
 श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग, प्रमुख अतिथी डॉ.अपर्णा मारगोनवार, डॉ. एम पी सिंग, डॉ. कश्यप, प्रा.सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे  उपस्थित होते. 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग बारावीची विद्यार्थिनी रिया कर्मकारने हिने महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे, 'बेटी बचाओ,बेटी पढाओ चा' नारा आपल्या भाषणातून दिला. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी के सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की रासेयो विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जाऊन समाजातील निरक्षरांना साक्षर करण्याचे कार्य व समाजामध्ये असलेला अज्ञान तथा अंधश्रद्धा दूर करून समाजाला शिक्षित करण्याचे कार्य स्वयंसेवकांनी करावे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार रासेयो प्रमुख प्रा.सुबोध साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक नागापुरे, डॉ. सोनाली ढवस, डॉ.प्रकाश राठोड प्रा.महेशकुमार सीलमवार, प्रा. सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा.जया रोकडे, प्रा. कवींद्र साखरे, विजुभाऊ खोबरागडे,अविनाश जीवतोडे, संदीप मानापुरे,रवींद्र झाडे, रमेश वागदरकर, पोर्णिमा गोहणे आदींनी सहकार्य केले आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 9, 2024   

PostImage

पुरस्कारापेक्षा मला सत्काराच मोठा वाटतो - कविता वाघमारे


पुरस्कारापेक्षा मला सत्काराच मोठा वाटतो  - कविता वाघमारे

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

डोंगरगाव :- पंचायत समिती मंगळवेढा मार्फत मला दिलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराप्रित्यर्थ डोंगरगावच्या गावकऱ्यांनी आज माझा जो सत्कार केला तो मला मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षाही मोठा वाटतो असे
 भावूक उदगार डोंगरगाव शाळेच्या पुरस्कारप्राप्त शिक्षिका कविता वाघमारे यांनी काढले. गावकऱ्यांच्यावतीने आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.मंगळवेढा पंचायत समिती मार्फत दिला जाणारा सन 2024 चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच वाघमारे यांना आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, दैनिक अचूक निदान चे संपादक डी. के. साखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मस्के,  मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी,दत्तात्रय लोहार, विजय भुसे, तुकाराम साखरे, तानाजी साखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे म्हणाल्या की,माझ्या कार्याची दखल घेऊन आपल्याला हा पुरस्कार दिला असून; पुरस्कारामुळे मला एक नविन ऊर्जा प्राप्त झाली असून यापुढे ही मी अधिक जोमाने काम करून  विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा आणि शाळेचा विकास करण्याचा प्रयत्न करेन.वाघमारे ह्या गेली 20 वर्षे अध्यापनाचे काम करीत आहेत.त्यांनी अनेक  विद्यार्थी घडविले असून  सध्या त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर  कार्यरत आहेत.यावेळी विवेक खिलारे, डी. के. साखरे, मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी, सहशिक्षिका अंबिका कर्वे व बाजीराव गवळी सर आदींनी आपल्या मनोगतातून वाघमारे मॅडम यांचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. साखरे यांनी केले तर मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 5, 2024   

PostImage

कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मंगळवेढा -; मंगळवेढा पंचायत समिती मार्फत सन २०२४-२५ मध्ये दिले जाणारे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील शिक्षिका श्रीमती कविता महादेव वाघमारे यांच्या सह २१ जणांना जाहीर झाले असून आज शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोड वरील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे शानदार समारंभात आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी  रूपाली भावसार या भूषविणार असून गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी  बिभिषण रणदिवे, शिक्षणविस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड व शामराव सरगर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 2, 2024   

PostImage

दुसऱ्याच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने एका महिलेचा जागीच करुन अंत्य


दुसऱ्याच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने एका महिलेचा जागीच करुन अंत्य 

 

 

सिंदेवाही : 
पर्जण्यवृषृटी खूप झाल्याने एका घराची भींत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे सदर घटना सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे घडली आहे 
मृतक रसिका देवराम मसराम वय,52 वर्ष ही सकाळी झोपून उठल्यावर अंगनाची सफाई करीत असतांना अचानक घरा शेजारील धुरपता वासुदेव मडावी यांच्या घराची भिंत  रसीका यांच्या अंगावर कोसळ्याने रसीका मसराम यांचा जागीच मृत्यू झाला.

यावर्षी रत्नापूर व परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे घराच्या भिंत कोसळण्याचे प्रमाणही जास्तच आहे परंतु दुसऱ्याची भिंत कोसळ्याने आजस्थीतीत अंगणातील रशीका मसराम यांचा दुदैवी मृत्यू आज दि.1 सटेबर 2024 सकाळी 6.00 वा.चे दरम्यान झाला.
मोलमजुरी करुण आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रशीका मसराम यांचा हा मृत्यु वेदनादायी आहे. या अचानक घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस,तलाठी,पोलीस पाटील यांनी उपस्थीत राहुन पंचनामा केला. 
त्यांचे मृत्यु पश्चात दोन मुली,एक मुलगा,नातवंड  असा बराच मोठा परिवार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 27, 2024   

PostImage

अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्डयात टाकून हवेत फिरणाऱ्यांना जमिनीवर आणा.-राजे …


अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्डयात टाकून हवेत फिरणाऱ्यांना जमिनीवर आणा.-राजे अम्ब्रीशराव आत्राम

भामरागड येते पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न, दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.

भामरागड:-मुलचेरा येतुन माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या झंझावाती दौऱ्याची सुरुवात केली होती, त्यानंतर भामरागड येथे काल भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग राजेंनी फुंकले, ह्यावेळी तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रातुन आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य ह्यांची मोठी गर्दी झाली होती त्यांनी राजेचे जोरदार स्वागत केले.

यावेळी राजेंनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना गेल्या ५ वर्षात संपूर्ण विधानसभा क्षेत्रात विकासाचे एक मोठे काम झाले नाही, आजही मी केलेले विकासकामेच प्रगतीपथावर आहेत उलट संपूर्ण विधानसभा क्षेत्र सद्या खड्डयात गेला आहे, रस्ते, आरोग्य, वीज ह्या प्रत्येक क्षेत्रात जनता कमालीची हैराण झाली असतांना आपले मंत्री साहेब सद्या कंपनीचा आशीर्वादाने हेलिकॉप्टर दौरे करीत हवेत फिरत आहेत, जनतेच्या समस्यांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही अशांना हवेतून जमिनीवर आणण्याची वेळ आत्ता आली आहे, त्यासाठी त्यांची खरी जागा आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवा, त्यासाठी आजपासूनच प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागून मोठ्या मताधिक्याने मला निवडुन येण्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन ह्यावेळी राजेंनी केले
      
यावेळी जेष्ठ नेते प्रकाश सावकार गुडेल्लीवार, सुनीलभाऊ बिस्वास, रवीभाऊ नेलकुद्री, चिन्नना चाकूरकर,जाधव हलधर, राजू येग्लोपवर अर्जुन आलाम भाजप तालुका अध्यक्ष,तापस हलदार,झाकीर हुसेन, रामा बोगामी,रमाबाई कोमटी,शारदा कोरेत सरपंच,सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 27, 2024   

PostImage

तुला खर्रा चारतो पण, माझी कामेच्छा पूर्ण कर, यातून अल्पवयीन …


तुला खर्रा चारतो पण, माझी कामेच्छा पूर्ण कर, यातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती व फुटले बिंग 

 दुर्गापूर :-
तुला मी नेहमी खर्रा चारतो पण माझी कामेच्छा तु पुर्ण कर असे म्हणून एका पानटपरी वाल्या इसमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला व त्यामधून ती गर्भवती राहीली आणि घटनेला वाचा फुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे 
 पिडित अल्पवयीन मुलिच्या हालचालीवरून आईला संशय आला ही अशी का वागते म्हणून  तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस यांना याबाबत माहिती दिली, दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली. पानठेल्यावर खऱ्याच्या उधारीच्या मोबदल्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी एक्ट अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 दुर्गापूर येथे बबन रोहणकर याचा पानठेला आहे. पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्चाची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. बबनने मुलीला खर्चाची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकी दिली. मुलीकडे खऱ्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून तिला शारीरिक सुखाची मागणी करून
मागील तीन ते चार महिन्यांपासून लैंगिक शोषण केले. ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला याबाबत दुर्गापूर ठाण्यात शनिवारला मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली आहे व अधीक तपास सुरू केला आहे


PostImage

Vaingangavarta19

Aug. 25, 2024   

PostImage

प्रेमविवाह केलेल्या दांम्पत्यांनी विहीरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा


प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यांनी विहीरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा 


 गोंडपिपरी तालुक्यातील घटना

 गोंडपिपरी :-
प्रेमविवाह करुन भावी जीवनाच्या सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दाम्पत्यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे 
घरगुती कारणातून वाद
झाल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिला वाचवायला तिच्या मागोमाग पतीनेसुद्धा विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांचाही विहिरीत बुडून अंत झाला.

ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा गावात शनिवारला रात्रो ९.३० वाजताचा सुमारास घडली. पती-पत्नीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावातच शोककडा पसरली आहे.

प्रकाश शरबत ठेंगणे वय (३०), उषा प्रकाश ठेंगणे वय  (२७) अशी मृत दांपत्याचे नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांतने मागील तीन महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील इल्लूर येथील उषा हिचासोबत आंतरजातीय प्रेमाविवाह केला होता. सुखी संसार सुरु असतानाच शनिवारी रात्री दोघात कडाक्याचे  भांडण झाले 

रागाच्या भरात उषाने घराशेजारील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी प्रकाशने सुद्धा लगेच विहिरीत उडी घेतली. दरम्यान शेजारच्या मुलाने हे दृश्य बघून इतरांना या संदर्भातील माहिती दिली.

नागरिकांनी गोंडपिपरी पोलिसांना माहिती देताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळ गाठून विहिरीत शोध मोहीम राबवली असता, दोघांचेही मृतदेह आढळून आले. वृत्तलिहीपर्यंत नेमके आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 24, 2024   

PostImage

परिस्थिततीला न जुमानता आपले यश संपादन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे …


परिस्थिततीला न जुमानता आपले यश संपादन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे 

ॲड. विश्वजीत कोवासे 


आष्टी:  परिस्थितीला न जुमानता आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्रयत्नशील राहिल्यास यश संपादन करता येते असे प्रतिपादन ॲड.विश्वजीत कोवासे यांनी मार्कंडा (कं)येथील सत्कार समारंभा प्रंसंगी व्यक्त केले 
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंनसोबा येथी तीन तरुण व एक तरुणी घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस दलात भरती झाले.त्या निमित्ताने गावकऱ्यांनी त्यांचा व विषेश कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला 

अजय बेलकिवार,प्रफुल्ल बेलकीवार, दिपक कांबळे, वर्षा सातर, या तरुणाची गडचिरोली पोलिस दलात निवड झाली. यांचे वडील मोलमजुरी करुन घरचा गाडा हाकलत असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे सर्व विध्यार्थी घरच्या परिस्थितीला न डगमगता शिक्षण घेत असतानाच पोलिस दलात निवडीसाठी गावातील वाचनालयात  सराव करत होते.
गावातील विध्यार्थी पवन मस्के यांनी वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विध्यार्थी कसे घडले पाहिजे या हेतूने लोकवर्गणीतून वाचनालय सुरू केले व ग्रामपंचायत प्रशासनाकडून काही सुविधा मिळवून घेतली व हे वाचनालय सुरळीत सुरू राहील आणि गावातील विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या काही वाचनालयाच्या अडचणी लक्षात आणून दिले असता सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार व माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी पंचवीस हजार रुपयांचे पुस्तके घेऊन दिले. व त्यावेळी आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांनी सुद्धा या वाचनालयासाठी बरेच काही सहकार्य केले या सर्वांच्या सहकार्याने वाचनालयाचा लाभ मार्कंडा कंन्सोबा येथील तरुणांना झाला. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड‌. विश्वजीत कोवासे व माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांच्या उपस्थितीत मार्कंडा कंन्सोबा येथे पोलिस भरतीत निवड झालेल्यांचा व विविध विभागातील तीन वर्षे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून विशाल काळे, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी,भारती राऊत, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक मार्कंडा कंन्सोबा, लांडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव अभयारण्य चपराळा, रोखडे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा कंन्सोबा, शिंपले, वनविकास वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा कंन्सोबा,व पोलीस भरतीत निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परिसरातील व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच वनश्री चापले, नाना पसफूलवार, संजय पंदिलवार, सुरेश फरकडे, नानाजी बिटपल्लीवार, देशमुख, दामोदर पोटवार, आत्माराम मस्के, विजय बहिरेवार, दिलीप तिवाडे, आत्माराम मडावी, साईनाथ कुळमेथे, भाऊजी सिडाम, सत्यवान भडके,शंकर मारशेट्टीवार,बिजन मंडल, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अशोक खंडारे,भास्कर फरकडे, विलास हुलके,अजय पोटवार, राजाराम गुंडावार उपस्थित होते.
ॲड विश्वजीत कोवासे, नाना पसफूलवार, संजय पंदिलवार व इतरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या


PostImage

Vaingangavarta19

Aug. 22, 2024   

PostImage

अनुसूचित जाती व जमाती यांनी पुकारलेल्या बंदला आष्टीत पुर्ण प्रतिसाद


अनुसूचित जाती व जमाती यांनी पुकारलेल्या बंदला आष्टीत पुर्ण प्रतिसाद 


आष्टी:-
सर्वोच्च न्यायलयाच निर्णय दिनांक 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण व क्रिमिलियर अटी मान्यता दिली. ही असंविधानिक बाब आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण व क्रिमिलियर अट येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतीय संविधानाच्या कलम 341 व कलम 342 ला बाधा येत आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरणामुळे जाती जातीत भांडण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजात तणाव निर्माण होऊ शकतो. भविष्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवर अन्याय होऊ शकतो.  
सर्वोच्च न्यायालयाचा 1ऑगस्ट 2024 चा निर्णय रद्द करण्यासाठी घटना दुरुस्ती करावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे वर्गीकरण व क्रिमिलियरच अट रद्द करावे.या करिता आज आष्टी येथे दिनांक २१ ला कडकडीत बंद पाळण्यात आला हे बंद करण्याकरिता धम्मदीप बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष अमीत नगराळे व क्रांतिवीर बाबुराव शेडमाके समीती आष्टी येथील पारंपरिक इलाका समीती सल्लागार संतोष सोयाम यांच्या माध्यमातून आज आष्टी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला यावेळी सहकार्य गौतमा फुलझेले, निकिता निमसरकार, सुमित्रा देठे, वयजंता बारसागडे, अशोक खंडारे,सुरज सोयाम, नितीन शेडमाके,रवी कन्नाके, नितीन मडावी, देवा वनकर, सुरज देवगडे, उत्तम चंद बारसागडे,राधे थेरकर,प्रतिक निमसरकार, सुधीर उंदिरवाडे, आनंद कांबळे, प्रतिक निमसरकार, थोरात अवथरे, सुनील खैरे, राहुल फुलझेले, अंगीरश कुकुडकर यांच्यासह अनुसूचित जाती व जमातीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Aug. 17, 2024   

PostImage

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस भरतीमध्ये स्थान मिळविलेल्या युवक- युवतींचा अनखोडा …


स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने  पोलीस भरतीमध्ये स्थान मिळविलेल्या युवक- युवतींचा अनखोडा वासियांनी केला सत्कार


  
 
   अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी - 
               गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलिस शिपाई  भरतीत आष्टी - अनखोडा परिसरातील  निवड झालेल्या युवक युवतींचा सत्कार  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट गुरुवारला अनखोडा वासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक विशाल काळे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच वसंत चौधरी,पोलीस पाटील अशोक चहारे,अरुण चहारे, मोरेश्वर चरडे, महेश चहारे,शरद कोहपरे,रोहीत कोडापे,आदी मान्यवर उपस्थित होते 
 यावेळी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खाकीची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या सोळा युवक - युवतींचा गुण गौरव शाल व पुस्तके देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात आष्टी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व शांत संयमी व मृदू स्वभावाचे अधिकारी म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेल्या ठाणेदार विशाल काळे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
 यावेळी प्रमूख मार्गदर्शक म्हणून मत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी संयम ठेवून अपयशानी खचून न जाता जिद्दीने मेहनत घेतली तर यश संपादन करणे कठीण नाही. ग्रामीण भागातील युवकांनी मेहनतीच्या जोरावर अनेक यशोशिखर गाठले असून त्यांची प्रेरणा घेवून सेवेत रुजू झालेल्यानी आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडावे असे सांगितले. यावेळी पोलीस भरतीत निवड झालेल्या वयाती आत्राम चंदनखेडी, दुषाली अलगमकर उमरी, रीना घ्यार कढोली, नागेश वाट, समीर निमरड, अमरदिप निमसरकार, सचिन निमरड, पंकज डोंगरे, सोहन तिमाडे, चेतन बट्टे, अनखोडा, धर्मा शेडमाके, विद्याताई देठे, रभूश लांबाडे, गायत्री झाडे, आचल ताकलपल्लीवार, तन्वी गंधारे या यशवंताचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अनखोडा येथील बहुसंख्य नागरिक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मारोती चहारे तर आभार  राजेश घ्यार यांनी मानले.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 17, 2024   

PostImage

पायदळी येत एका इसमाने वैनगंगेच्या नदीपात्रात उडी घेऊन केली आत्महत्या


पायदळी येत एका इसमाने वैनगंगेच्या नदीपात्रात उडी घेऊन केली आत्महत्या

आरमोरी : 
 येथील एका इसमाने पायदळी नदीपात्र गाठत नदीपात्रातील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे 
आरमोरी येथील विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी सुरेश
फाल्गुन दोनाडकर  वय (५०) या इसमाने आरमोरी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास घडली. त्याचा आज १६ ऑगस्ट रोजीही थांगपत्ता लागला नव्हता.
प्राप्त माहितीनुसार सुरेश दोनाडकर याची पत्नी व मुलगी हे बाहेरगावी गेले होते. तो घरी एकटाच असताना दुपारी दीड वाजताच्या सुमारास घरून बाहेर पडला ला व पायीच वैनगंगा नदी गाठून वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी वैनगंगेच्या नदीपात्रात स्थानिक पोहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून शोधमोहीम राबविली. तसेच नाव चालविणाऱ्या नाविकांना हाताशी घेऊन तब्बल १० किलोमीटर पर्यंत जाऊन शोध घेतला. परंतु अद्याप पर्यंत त्याचे प्रेत मिळाले नाही. मागील चार दिवसांपासून आरमोरी पोलिसांनी शोध मोहीम राबवली असून अजूनही सदर इसमाचे प्रेत हातात आले नाही.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 17, 2024   

PostImage

शेतातील कामे आटोपून शेतातीलच विहिरीत हातपाय धुवायला गेलेल्या मुलाचा विहिरीत …


शेतातील कामे आटोपून शेतातीलच विहिरीत हातपाय धुवायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

एटापल्लीः 
आईवडिलांसोबत शेतातील कामासाठी मुलगा सोबत गेला कामे आटोपून हातपाय धुण्यासाठी शेतशिवारात असलेल्या विहिरीवर हात पाय धुऊन घेण्यासाठी गेला व पाय घसरून पडल्याने विहीरीत बुडून मृत्युमुखी पडला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी डुम्मे गावात घडली.

निखिल सदाशिव दुर्वा (१७) असे मृत मुलाचे नाव आहे. तो दहावा वर्ग उत्तीर्ण झालेला होता  डुम्मे गावात आईवडील व भावासमवेत तो राहायचा. १५ ऑगस्टला स्वतःच्या शेतात धान
रोवणीचे काम सुरू होते. त्यासाठी तो गेला होता. दुपारी २ वाजता जेवणाची वेळ झाली. हातपाय धुण्यासाठी निखिल हा विहिरीवर गेला, यावेळी पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. बराचवेळ होऊनही निखिल न आल्याने आई विहिरीजवळ गेली असता तिला त्याची चप्पल दिसली.
तेव्हा मुलगा विहीरीत पडला असल्याचे चित्र दिसून आले लागलीच पोलीस स्टेशन ला माहिती दिली आहे


PostImage

Vaingangavarta19

Aug. 6, 2024   

PostImage

जम्मू काश्मीर च्या बार्डरवर तैनात असलेल्या जवानांवर प्रियकराच्या मदतीने पत्नीने …


जम्मू काश्मीर च्या बार्डरवर तैनात असलेल्या जवानांवर प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला विषप्रयोग 


 पंधरा दिवसांनी झाला नवऱ्याचा मृत्यू


कोल्हापूर:-  देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या जम्मू काश्मीर येथील बार्डवर तैनात असलेल्या जवानांवर त्यांच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या विषप्रयोग केला त्या जवानाचा पंधरा दिवसांनी मृत्यू झाला आहे 
जम्मू काश्मीर राज्यामध्ये कर्तव्य बजावणारे जवान गावी सुट्टीवर आल्यानंतर वारंवार पत्नीसोबत भांडण करून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या मदतीने त्याचे हातपाय बांधून डोळ्याला पट्टी बांधून जवानांच्या पत्नीने जवानाला वीष पाजल्याचा धका दायक प्रकार कोल्हापूर शहरात घडला आहे. हा जवान गेल्या पंधरा दिवसापासून मृत्यूशी देत होता अखेर त्याची मृत्यूची झुंज ही अपयशी ठरली असून शनिवार दिवशी त्याची प्राणज्योत मालवली अमर भीमगोंडा देसाई असे जवानांचे नाव आहे. सोमवार रोजी त्याचे मुळगाव असलेल्या नूल गाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्याच्या पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली आणि पत्नी व तिच्या प्रियकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा दिवसापासूनची जवानाची मृत्यूची झुंज ही अपयशी ठरली असून सैन्य दलातील जवान अमर देसाई हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर होते.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 6, 2024   

PostImage

स्वतःच्या पत्नीचा खून करून त्यानेही केली आत्महत्या


स्वतःच्या पत्नीचा खून करून त्यानेही केली आत्महत्या

 

मुंबईः स्वतःच्या पत्नीचा खून करून त्यानेही आत्महत्या केली असल्याने गोरेगाव येथे खळबळ उडाली आहे 
 गोरेगाव पश्चिम भागातील टोपीवाला सोसायटीमध्ये सकाळी पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह सापडले होते. किशोर पेडणेकर यांनी पत्नी डॉ. राजश्री पेडणेकर यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यानेही इंमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्या- हत्या प्रकरणा मागील नेमका हेतू काय होता, हे जाणून घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.  धक्कादायक म्हणजे आपल्या मृत्यूची माहिती समजल्यावर मुलाला मोठा धक्का बसेल, त्यामुळे त्याची गडबड उडू नये, याची खबरदारी किशोर पेडणेकर पहिलेच  करून ठेवल्याचे समोर आले.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 4, 2024   

PostImage

आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या तरुणीने नदी पात्रात उडी घेऊन केली …


आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या तरुणीने नदी पात्रात उडी घेऊन केली आत्महत्या 


भावाने केली पोलिसात तक्रार,  प्रशासनाची युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू

 मारेगाव:-
येथील एका तरुणीचे आई - वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे की काय परंतू तिने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे मारेगाव येथील प्रभाग क्र. पाच घरकुल कॉलनी मध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय युवतीने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला, या प्रकाराने मारेगाव तालुका हादरला आहे.

माधुरी अरुण खैरे, असे वर्धा नदीत उडी घेतलेल्या युवतीचे नाव आहे. तीचे डी-फार्म पर्यंत शिक्षण झाले असून वडील अरुण खैरे यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले तर जि. प. शाळेच्या शिक्षिका उषाताई खैरे ह्या मागील मार्च महिन्यात  कचरा जाळतांना पन्नास टक्के भाजल्या होत्या दिड महिन्याच्या दीर्घ उपचारानंतर त्यांचेही निधन झाले होते.

दि . २ ऑगष्ठ शुक्रवारला सकाळी १० वाजताचे सुमारास वणी कॉलेज ला जात असल्याची आपल्या भावाला सूचना करीत ही युवती वणीहून ऑटोरिक्षात बसून वरोरा मार्गे निघाली दुपारी १२.३० वाजताचे सुमारास पाटाळा वर्धा नदी जवळ माधुरी हिने थांबा घेतला. काही वेळात माजरी येथील एक दाम्पत्य 'त्या' ठिकाणी थांबले असता त्यांना मोबाईल, पर्स व चप्पल निदर्शनास आली. यावेळी माधुरी हिच्या मोबाईलवर कॉल आला असतांना घटनास्थळवरील हकीकत नातेवाईकांना विषद केली. आणि नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेत सि सि टी व्ही फुटेज तपासाअंती माधुरी ही वर्धा नदीत उडी घेत असल्याचे स्पष्ट झाले. भाऊ यश याने वणी पोलीस प्रशासनात तक्रार दाखल केली आहे. आई-वडील नसतांना आता बहिणीच्या टोकाच्या निर्णयाने एकुलता एक मुलगा एकाकी पडला आहे. सदर घटनेचे गांभीर्याने घेत प्रशासन तिचा शोध घेत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 3, 2024   

PostImage

ठाकरी ग्रामस्थांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रत जायचे तरी कसे?


ठाकरी ग्रामस्थांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रत जायचे तरी कसे?

ग्रामपंचायत ठाकरीने  केले ग्रामस्थांचे बेहाल

सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी एकदा तरी भेट दिली काय आरोग्य उपकेंद्रत 

आष्टी ता. ३ : चामोर्शी तालुक्यातील ठाकरी येथील आरोग्य उपकेंद्र येथे रुग्णांना जाण्यासाठी मार्ग खडतर व चिखलमय झालेला असून या बाबी करीता ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे 
ठाकरी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील पेनय्या वर्धलवार यांच्या घरापासून ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रापर्यंत तांडा वस्ती योजनेअंतर्गत रस्त्याचे काम ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली खोदकाम करून सुरुवात केली. हे काम एक महिन्यापासून रेंगाळत असल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दोन्ही बाजूने रस्ताच बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच याची गंभीर दखल ग्रामपंचायत प्रशासनाने न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ठाकरी येथील ग्रामस्थांसाठी रहदारिच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्त्याचे काम रखडल्यामुळे शाळेत, अंगणवाडीतील जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व येथील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाकरी ग्रामपंचायत प्रशासनाने सदर रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला. पावसाळ्यात हे काम पूर्ण होणार नाही हे माहीत असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने एवढी घाई करुन कामाला का सुरुवात केली? असा प्रश्न ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. रस्त्याच्या बाजूने नाली खोदकाम करून रस्त्यावर केवळ दोन तीन ब्रास खडी आणि दोन तीन ब्रास वाळू टाकून ठेवण्यात आली आहे. नाली खोदकाम करून ठेवले असल्याने नालीची माती रोडवर पसरल्याने मोठ्या प्रमाणात या रोडवर चिखल पसरलेला  आहे या चिखलातून वाट काढण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते आहे. गेल्या १ महिन्यापासून रस्त्याचे काम ठप्प आहे.पावसाळ्याला सुरुवात होत असताना रस्त्याचे काम सुरू केले आहे आणि पावसाळा सुरू असल्याने काम अपूर्ण राहिल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. सदर काम ठप्प का झाले असे ग्रामसेवकास ग्रामस्थांनी विचारले असता ग्रामसेवक पावसाळा आहे या रस्ता बांधकाकरीता निधी नाही तुमच्या हिशोबाने काम होईल का असे उत्तर ग्रामसेवक देत असल्याचे ग्रामस्थ सांगतात या कामाकरीता निधी नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाने कामाला सुरुवात कशी काय सुरुवात केली घरचे पैसे लावुन काम करणार होते का? नाहीतर ग्रामपंचायत प्रशासनाकडून आम्हाला जाणूनबुजून त्रास देण्याकरिता कामाला सुरुवात करुन काम ठप्प केले? आम्ही काम आणले आणि कामाला सुरुवात केलेत पण पावसाळा सुरू असल्याने काम थांबले आहे हे दाखवण्यासाठी का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत सरपंच, उपसरपंच राहत गावात  स्थानिक राहत नसल्याने त्यांना या अडचणी काय समजणार आहेत काय?

 सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी एकदा या रस्त्याने आवागमन करून पहा तुम्हालाही समजेल चिखलातून वाट काढण्याकरिता काय त्रास होतो अशी येथील ग्रामस्थांची ओरड सुरू आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रत रुग्ण जाणार तरी कसे असाही प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

Aug. 2, 2024   

PostImage

गढुळ पाणी तुम्हीही प्या,पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले …


गढुळ पाणी तुम्हीही प्या,पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले गढुळ पाणी

 

चंद्रपूर:- आम्ही पंधरा गावातील लोक जेव्हा गढूळ पाणी पीतो तेव्हा तुम्हीही प्यायला पाहिजे म्हणून पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकारी यांच्या अंगावर गढूळ पाणी फेकण्यात आले 
सदर आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे 
 पोंभूर्णा तालूक्यातील पंधरा गावांसाठी असलेली वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना वीजबिल भरणा न केल्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंद आहे १५ गावांना होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने पोंभूर्णा तालुक्यातील पंधरा गावांना दुषीत पाणी प्यावे लागते, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विविध आजारांचा नागरिक सामना करावा लागतो आहे. अशास्थितीत वारंवार सूचना करूनही संबंधीत विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अखेर पंधरा गावातील प्रमुख नागरिकांनी युवा नेता शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना आपबिती सांगितली पंधरा गावातील नागरिकांना होणारा त्रास बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिन्हे यांनी आंदोलन पुकारले काल दि.१ जुलै गुरूवारला पोंभूर्णा पंचायत समिती समोर "घागर फोड आंदोलन" चे आयोजन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनकडून दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला कार्यालयातच घागर फोडून पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या अंगावर गढुळ पाणी पाणी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिन्हे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे, शहर प्रमुख गणेश वासलवार, वेळवा सरपंच जितेंद्र मानकर, घनोटी सरपंच पवन गेडाम, आष्टा सरपंच किरण डाखरे, थेरगाव उपसरपंच वेदनाथ तोरे, रवींद्र ठेंगणे, महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे, नगरसेविका रामेश्वरी वासलवार, महेश श्रीगिरीवार, बालाजी मेश्राम, सुनीता वाकुडकर, सुरेखा कुडमेथे, मंगलदास लाकडे, गोकुळ
तोडासे, किशोर वाकूडकर तसेच पोंभूर्णा तालुक्यातील अनेक शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, सदस्य व त्या समस्या ग्रस्त पंधरा गावातील नागरिकांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.