PostImage

M S Official

Today   

PostImage

Sarkari Yojana 2024: गणपती निमित्त या रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा …


Sarkari Yojana 2024: सणासुदीच्या दिवसात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्यक्रम रेशन कार्डधारकांना 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.  लाखांवर कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल, एक किलो चणाडाळ आदी साहित्य आहे. आता गणपती उत्सवादरम्यान लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण केला जाणार आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: बीज प्रक्रिया संचासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत अनुदान

सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी पुरवठा विभागाद्वारे रेशन दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्य दिले जाते. याशिवाय सणासुदीच्या दिवसामध्ये राज्य शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरण केला जातो. केवळ शंभर रुपयांमध्ये रवा, साखर व चणाडाळ प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर तेल दिले जाते. आता गणपती उत्सव साजरा करता यावा, याकरिता आनंदाचा शिधा अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

 

15 ऑगस्टपासून होणार वितरण

जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थी रेशन कार्डधारक संख्येनुसार जिल्हा पुरवठा विभागाद्वारा मागणी नोंदविण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत 65 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये, जाणून घ्या माहिती

या किटचा गोदामात पुरवठा झाल्यानंतर 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान संबंधित रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येणार आहे.

 

या नागरिकांना मिळणार लाभ

गौरी गणपतीनिमित्त 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील कार्डधारकांना हा लाभ मिळणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे.


अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Pawar Interprises

Today   

PostImage

मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना: रक्षाबंधन पर मिलेगा खास तोहफा


मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना: रक्षाबंधन पर मिलेगा खास तोहफा 

रक्षाबंधन के अवसर पर मध्य प्रदेश की लाखों लाड़ली बहनों के लिए एक खुशखबरी आई है। मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना के अंतर्गत, इस साल 1 अगस्त 2024 को हर लाभार्थी के बैंक खाते में अतिरिक्त 250 रुपए ट्रांसफर किए जाएंगे। यह राशि उनकी नियमित 1250 रुपए प्रति माह की सहायता राशि के अलावा होगी, जो एक विशेष शगुन के रूप में दी जा रही है।

इस योजना की शुरुआत मई 2023 में हुई थी, और अब तक 14 किस्तें जारी की जा चुकी हैं। सरकार ने यह सुनिश्चित किया है कि रक्षाबंधन के अवसर पर 15वीं किस्त समय से पहले उपलब्ध कराई जाए, ताकि बहनों को त्योहार की खुशियों में और भी बढ़ावा मिल सके।

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने हाल ही में "अग्रदूत पोर्टल" का उद्घाटन किया है। इस पोर्टल के माध्यम से सूचनाओं का प्रसार अधिक प्रभावी और त्वरित तरीके से किया जाएगा। इस पोर्टल के जरिए व्हाट्सएप पर मल्टीमीडिया मैसेज भेजे जाएंगे, जिससे लाभार्थियों को योजना की जानकारी सीधे उनके मोबाइल पर मिलेगी।

लाड़ली बहना योजना के तहत, 21 से 60 वर्ष की उम्र की विवाहित महिलाओं को लाभ मिलता है, जिनकी सालाना आय 2.5 लाख रुपए से कम है। यह योजना महिलाओं को सालाना 15,000 रुपए तक की सहायता प्रदान करती है। अगर आप इस योजना के तहत पात्र हैं, तो रक्षाबंधन के इस खास मौके पर आपको अतिरिक्त 250 रुपए का यह उपहार निश्चित रूप से खुशी का कारण बनेगा।


PostImage

MK CREATION

Today   

PostImage

Gadchiroli News: गडचिरोली पोलिस भरती, उद्या या 11 केंद्रांवर होणार …


Gadchiroli News: गडचिरोली : जिल्हा पोलिस दलातर्फे 912 शिपाई पदांसाठी मैदानी परीक्षा पार पडल्यानंतर आता 28 जुलै रोजी सकाळी 8:00 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी 11 केंद्रे निश्चित केली आहेत.

21 जून ते 23 जुलै या कालावधीत मैदानी चाचणी पार पडली. 912 पदांसाठी 28 हजार उमेदवारांनी अर्ज गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठी केले होते. मैदानी चाचणीतील एकूण 6 हजार 711 उमेदवार पात्र झाले आहेत.

28 जुलै रोजी सामान्य अध्ययन या विषयाचा पेपर सकाळी 10:30 ते दुपारी 12:00 यादरम्यान, तर दुसरा पेपर गोंडी व माडिया या विषयांवर दुपारी दीड ते 3:00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

 

 या केंद्रांवर होणार परीक्षा

1 महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली
2 फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड, गडचिरोली
3 प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, आरमोरी रोड गडचिरोली
4 आदिवासी इंग्लिश मीडियम स्कूल, सेमाना रोड, गडचिरोली
5 कारमेल हायस्कूल, धानोरा रोड गडचिरोली
6 स्कूल ऑफ स्कॉलर्स, धानोरा रोड, गडचिरोली
7 शिवाजी हायस्कूल तथा विज्ञान महाविद्यालय, गोकुलनगर गडचिरोली
8 शिवाजी इंग्लिश ॲकॅडमी स्कूल, गोकुलनगर गडचिरोली
9 शासकीय कृषी महाविद्यालय, आयटीआय चौक, गडचिरोली
10 शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली
11 शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली

 

गडचिरोली शहरातील अशा एकूण 11 केंद्रांवर पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 8:00 वाजता उपस्थित राहणे आवश्यक राहील.

 

बायोमेट्रिक पध्दतीने होणार नोंदणी

  • सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करून परीक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येईल. उमेदवारांसाठी पेन व पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
  • सोबतच पेपर क्र. 1 व पेपर क्र. २च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाष्ट्याचीसुद्धा सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर केवळ ओळखपत्र व प्रवेशपत्र घेऊन जाता येईल. उमेदवार कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करताना आढळल्यास कारवाईचा इशारा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला आहे.

 

विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था

टीप : सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्था नवेगाव, गडचिरोली यांच्या कडून बाहेरून गडचिरोली मद्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था.

विद्यार्थ्यांनी आज 3 वाजताच्या आत आपले नावे कळवावे.

स्थळ: स्वप्नील मडावी अकॅडमी, इंदिरानगर गडचिरोली, सृष्टी मंगल कार्यालय,पटेल मंगल कार्यालय गडचिरोली.

अधिक माहितीसाठी संपर्क : सौ.जुमनाके मॅडम 9405872397, श्री स्वप्नील मडावी सर 9529933893 , श्री तुषार मडावी - 9422156584


PostImage

Sanket dhoke

Today   

PostImage

Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यात आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट …


Chandrapur News :-  चंद्रपूर जिल्ह्यात आज दि, २७ जुलै शनिवारला मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे,  हवामान खात्याने Chandrapur जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला.

 या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उद्या शनिवारला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अश्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहराला हादरे बसत आहे, काय आहे कारण ?

अधिक वाचा :- Chandrapur News :- अखेर दोघा जणांचा बळी घेणारा तो ‘वाघ' जेरबंद

अधिक वाचा :- Today Horoscope :- २७ जुलै २०२४ ; मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल, प्रवासाची संभवता 

अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…

अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल

अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

   ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Sanket dhoke

Today   

PostImage

Warora News :- वरोरा शहराला हादरे बसत आहे, काय आहे …


Warora News :- वरोरा शहरातील शिवाजी प्रभाग परिसरात जबरदस्त हादरे बसत असून या हाद-यामुळे सध्या कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसली तरी भविष्यात ही शक्यता नाकारता येत नाही. या हाद-यांनी मात्र लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र हे हादरे नेमके कशाचे याबद्दल नागरिकात संभ्रम आहे.


हे हादरे रोज हे अडीच ते तीनच्या दरम्यान बसत असतात. आज 23 जुलै रोज मंगळवारला स्नेहांकित नगर, ओमनगर, आंबेकर ले आऊट Warora या भागात तीन वाजून दहा मिनिटांनी बसलेला हादरा हा तर जास्त तीव्रतेचा होता. या हाद-यामुळे दरवाजे, खिडक्या व घरही हलायला लागते.

 या हादऱ्यांमुळे घराला भेगा पडण्याची तसेच जीवहानी होण्याची शक्यता आहे. मात्र हे हादरे भूकंपाचे की अन्य कोणत्या कारणाचे हे नागरिकांना कळू शकत नाही.
Warora येथून सात किलोमीटर अंतरावर एकोणा येथे दगडी कोळश्याची खुली खाण आहे.

 या WCL खाणीत ब्लास्टिंग केले जाते. या ब्लास्टिंग मुळे हे हादरे बसत असावे असे म्हटले जाते.परंतु वेकोली पदाधिकाऱ्यांनी आमच्या ब्लास्टिंगमुळे Warora शहरापर्यंत हादरे बसू शकत नाही असा दावा केला आहे.

मग या हाद-यांनी नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार हा प्रश्न निर्माण होत आहे.
हे हादरे नेमके कशाचे हे तपासणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार हे ठरवता येऊ शकणार नाही.

 म्हणून ब्लास्टिंगमुळे हे हादरे बसत असेल तर वेकोली प्रशासनाला शासकीय यंत्रणेने समज देणे गरजेचे आहे.
या हाद-यांमुळे भविष्यात घरांचे नुकसान होणे व एखाद्या वेळेस जीवहानी होणे असे धोके संभवू शकतात. यामुळे यावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.या हाद-यामुळे मात्र नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हे मात्र निश्चित.

 

अधिक वाचा :- Chandrapur News :- अखेर दोघा जणांचा बळी घेणारा तो ‘वाघ' जेरबंद

अधिक वाचा :- Today Horoscope :- २७ जुलै २०२४ ; मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल, प्रवासाची संभवता 

अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…

अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल

अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

   ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

P10NEWS

Today   

PostImage

भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या …


भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या निरपराध इसमाची पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन माओवादयांनी हत्या केली.
         गडचिरोली/(26): गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे व त्याची पत्नी रासो ऊर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे सन 2007 पासुन भामरागड दलममध्ये सदस्य म्हणुन काम करीत होते. माओवादयांच्या तकलादु आणि खोटया क्रांतीची या दोघांना कल्पना आल्याने दोघांनी एकत्रीतपणे 07 जुलै 2017 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. आणि हिंसेचा मार्ग सोडुन स्वत:च्या प्रगतीचा मार्ग स्विकारला होता. हे दाम्पत्य माओवादयांचा हिंसेचा खोटा आणि विनाशकारी मार्ग सोडुन शांततेचा मार्ग स्विकारत शेती करून आयुष्य जगत होते. 
         काल दि. 25 जुलै 2024 रोजी ते दिनांक 26 जुलै 2024 चे मध्यरात्री  माओवादयांनी जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे याची आरेवाडा ते हिद्दुर रोडवरील PHC जवळ पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन हत्या केली. सदर हत्येप्रकरणी पोस्टे भामरागड येथे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील कायदेशीर कार्यवाही चालु आहे.तसेच भामरागड परिसरात माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे


PostImage

Sanket dhoke

Today   

PostImage

Chandrapur News :- अखेर दोघा जणांचा बळी घेणारा तो ‘वाघ' …


Chandrapur News :- तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील नवानगर येथील जनाबाई जनार्धन बागडे वय वर्ष ५१ या महिलेसह तर नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी येथील शेतकरी दोडकू शेंदरे या दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला Tiger वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केले आहे.

 त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. जेरबंद करण्यात आलेला वाघ हा टी-११५ या वाघिणीचा २० महिन्यांचा नर बछडा असल्याचे समोर आले आहे.

तळाेधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये टी-११५ या वाघिणीचा हा २० महिन्यांच्या बछड्याने चांगलीच धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेतला होता. नागभीड तालुक्यात २३ जुलै रोजी मिंडाळा कोसंबी गवळी रस्त्यालगतच्या दोडकू शेंदरे या शेतकऱ्यांचा आणि  नवानगर येथे जनाबाई जनार्धन बागडे या महिलेचा बळी घेतला होता. 

या वाघामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. सदरच्या वाघाला Tiger जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने नवानगर परिसरातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये पिंजरे लावण्यात आले होते.

वनविभागाचे पथक वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. ताडोबाचे Tadoba वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर ए.सी.मराठे यांनी वाघाला Tiger बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केलेले आहे.

 यावेळी डॉ. खोब्रागडे यांनी वाघाची Tiger  वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वाघाला जेरबंद करून प्राणी बचाव केंद्रामध्ये नेण्यात आलेले आहे. धुमाकूळ घालून २ जणांच्या बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागिरकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. 

वाघाला जेरबंद करण्याची कारवाई डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर ए. सी. मराठे, राकेश आहुजा (बायोलॉजिस्ट), दिपेश. डि. टेंभुर्णे, योगेश. डि. लाकडे, गुरुनानक. वि. ढोरे, वसीम. ऐन. शेख, विकाश. एस. ताजने, प्रफुल. एन. वाटगुरे, ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर यांच्यासह जलद कृती दलाच्या पथकाने केली आहे.

Tadoba चे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी जिल्ह्यामध्ये झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉ. खोब्रागडे यांनी आतापर्यंत ७० वाघांना Tiger यशस्वीरित्या जेरबंद केलेले आहे. विशेष वाघाला जेरबंद करतांना त्यांना हाताचा एक बोटसुध्दा गमवावा लागला आहे.

 

अधिक वाचा :-Today Horoscope :- २७ जुलै २०२४ ; मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल, प्रवासाची संभवता 

अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…

अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल

अधिक वाचा  :- Today Horoscope :- २५ जुलै २०२४ ; सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल

अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

   ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Sanket dhoke

Today   

PostImage

Today Horoscope :- २७ जुलै २०२४ ; मित्र व प्रिय …


Today Horoscope :- २७ जुलै २०२४ ; मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल, प्रवासाची संभवता 

मेष :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र बाराव्या स्थानात आहे. आज एकाग्रतेच्या अभावामुळे मन अस्वस्थ होईल. मानसिक तणाव जाणवेल. आर्थिक गुंतवणूक हुशारीने करावी कारण चुकीच्या गुंतवणुकीमुळे फारसा नफा मिळणार नाही. पुढे वाचा...

वृषभ :-  27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून लाभात चंद्र स्थित आहे. आज तुम्हाला घर आणि मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. जुन्या पण बालपणीच्या मित्रांचा सहवास मनाला आनंद देईल. पुढे वाचा...

मिथुन :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र दहाव्या स्थानावर आहे. व्यवसायासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायिकांना व्यवसायात वाढीबरोबरच यश मिळेल आणि उत्पन्न देखील मिळेल. पुढे वाचा...

कर्क :- शनिवार, 27 जुलै, 2024: चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र भाग्यस्थानात आहे. आजची सुरुवात मानसिक तणाव आणि अस्वस्थतेने होईल. पुढे वाचा...

सिंह :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र आठव्या घरात आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नैतिक विचारांवर नियंत्रण ठेवणे आणि बेकायदेशीर कामांपासून दूर राहणे उचित ठरेल. पुढे वाचा...

कन्या :- 27 जुलै 2024, शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र सातव्या स्थानावर आहे. आजची सकाळ मित्रांसोबत फिरण्यात, खाणे-पिणे आणि मनोरंजनात आनंदाने व्यतीत होईल. पुढे वाचा...

तुला :- आज, शनिवार, जुलै 27, 2024, चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र सहाव्या स्थानावर आहे. आज तुम्ही तुमच्या मजबूत मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. पुढे वाचा...

वृश्चिक :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र पाचव्या स्थानावर आहे. आज आपली भावनिक संवेदनशीलता वाढेल. मानसिक संतुलन साधावे लागेल. पुढे वाचा...

धनु :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र चौथ्या स्थानावर आहे. कौटुंबिक शांतता राखण्यासाठी आज अनावश्यक वाद टाळणे योग्य राहील. पुढे वाचा...

मकर :- 27 जुलै 2024 शनिवार चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र तिसऱ्या स्थानावर आहे. आज महत्त्वाचे निर्णय घेताना सशक्त आणि स्थिर विचारसरणीला प्राधान्य द्यावे लागेल. मित्र आणि प्रियजनांच्या भेटीने तुम्ही आनंदी व्हाल. सहलीची योजना करा. अधिक वाचा...

कुंभ :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र दुसऱ्या स्थानावर आहे. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल कारण आज वाद आणि कटुता होण्याची शक्यता आहे. पुढे वाचा...

मीन :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र पहिल्या स्थानावर आहे. आज तुमच्या घरात काही शुभ कार्य घडतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…

अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल

अधिक वाचा  :- Today Horoscope :- २५ जुलै २०२४ ; सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल

अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

   ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Avinash Kumare

Today   

PostImage

गडचिरोली होमगार्ड भरती 2024 141 रिक्त पदांकरिता भरती सुरू आजच …


गडचिरोली होमगार्ड भरती 2024 
141 रिक्त पदांकरिता भरती सुरू
आजच ऑनलाईन अर्ज करा.

Home Gaurd Maharashtra Bharti महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात 10 वी पास होमगार्ड पदांसाठी मेगा भरती त्यापैकी गडचिरोली होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

  

मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे ही एक मेगा भरती आहे. आणि याच्यामध्ये 9700 एवढ्या जागा रिक्त आहेत.
 
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.  

●   काल २५ जुलै २०२४ पासून या भरतीची सुरुवात झालेली आहे तरी होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.  

● या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच जिल्यात नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही
 ययाबाबत अर्ज प्रक्रिया २५ जुलै पासून सुरू झालेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचं आहे.   

राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी  9700 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 141 रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 

● होमगार्ड भत्त्याचा तपशील: 

 होमगार्ड नियमित देखभालीच्या अधीन नाहीत.  मात्र, निवडणुका आणि सण-उत्सवादरम्यान अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांची नियुक्ती केली जाते
 700 प्रतिदिन आणि भेट भत्ता रु.  सेटलमेंट कालावधी दरम्यान दररोज 100. 

 प्रशिक्षण कालावधी दरम्यान, 35 रुपये वैयक्तिक भत्ता आणि 100 रुपये निर्वाह भत्ता देखील दिला जातो. 

 90 रुपये साप्ताहिक ड्रिल भत्ता दिला जातो आणि होमगार्डमधील तीन वर्षांच्या सेवेच्या समाप्तीनंतर, पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलातही पाच टक्के आरक्षणाची परवानगी आहे. 

होमगार्ड पात्रतेच निकष "●

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा 
शारीरिक पात्रता: ; वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची  पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर 
आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर
छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर  फुगवणे आवश्यक आहे.  

 आवश्यक कागदपत्रे:  

  • रहिवासी पुरावा, आधार कार्ड
  •  मतदान ओळखपत्र 
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र 
  • जन्म दिनांक पुरावा करीत
  • एस एस सी  बोर्ड प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • तांत्रिक धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • खाजगी नोकरी करीत असल्यास
  • त्या मालकाचा ना हरकत प्रमाणपत्र 
  • तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र प्रमाणपत्र  

● अधिकृत वेबसाइट 

https://maharashtracdhg.gov.in/

गडचिरोली होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असेल.

पदाचे नाव – होमगार्ड 

• पदसंख्या – 141 जागा 

• शैक्षणिक पात्रता – 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.) 

• नोकरी ठिकाण –  गडचिरोली 

• वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे  

• अर्ज पद्धती – ऑनलाईन 

• अर्ज सुरू होण्याची तारीख –  25 जुलै 2024 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024 

• अधिकृत वेबसाईट –

https://maharashtracdhg.gov.in/

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. 
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा.

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc

 

 

 

 

 

  

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

Armori news : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार


 गडचिरोली, ब्यूरो. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण आरमोरी येथे समोर आले आहे. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला. तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी फरार आहे. शुभम बबन सोरते (वय 27, रा. आरमोरी-बर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक) माध्यमातून लगतच्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.

यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची 2023 मध्ये सोशल

मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. 2023 पासून ते मे 2024 पर्यंत सुरू असलेल्या प्रेमादरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणाभाकासुद्धा खाल्ल्या. मे 2024 नंतर सदर तरुणी ही 21 वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला. मात्र, शुभमने लग्नाला नकार दिला. सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा लावली.

 

 

मात्र, शुभमचा लग्नाला विरोध कायम होता. पीडित तरुणीने 24 जुलैला आरमोरी पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी शुभम सोरते याच्या विरोधात भादंवी कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून, आरमोरी पोलिसांद्वारे त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार विनोद रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता मसराम करीत आहेत.


PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद 2 दिवसांत 2 …


 

'महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद
 2 दिवसांत 2 लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिली भेट
 गरजू विद्यार्थ्यांनी विविध योजनांची जाणून घेतली माहिती

 गडचिरोली,दि.(26): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. महाज्योती द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उतुंग यश प्राप्त केले आहे.
राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. महाज्योतीच्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने 24 जुलै रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले यास्कॅनर कोडवर असलेल्या संकेतस्थळावर https://mahajyoti.org.in/schemes/ 2 लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी भेट घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. महाज्योतीद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामुळे महाज्योतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती ही एक क्लिक वर प्राप्त व्हावी याकरिता स्कॅनर कोड तयार करण्यात आले असून दोन दिवसांत 2 लाखांचा टप्पा संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी गाठला आहे. यामुळे महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आज उत्सूकतेने संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असल्याचा विश्वास श्री. राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत तयार केलेल्या स्कॅनर कोड द्वारे संकेतस्थळाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
                                                                     


PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा …


 

गडचिरोली पंचायत प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन लाडक्या बहिणीच्या मदतीला
 

   गडचिरोली/ (27):- गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली  विभाग अंतर्गत "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने" यशस्वी आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन केली लाडक्या बहिणीच्या मदतीला
6 बिट आणि दोन सुपरवासझर सांभाडतात काम
 अतिश्रम काम करताना दिसत आहेत. अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲप द्वारे अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ब-याच ठिकाणी नेटवर्कची समस्या येत आहे. यामुळे पंचायत समिती गडचिरोली  
सौ एस व्ही गाडगे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली  पंचायत समिती गडचिरोली श्रीमती आशा वरंघटे विस्तार अधिकारी , श्री मस्के शिपाई इत्यादी कर्मचाऱ्यांवर भार पडत आहे.
[7/26, 2:56 PM] Mandeep Goradwar: गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये ऑनलाईन 9867 व ऑफलाईन 23228  यशस्वीपणे अर्ज भरून लाडक्या बहिणीला केली मदत.


PostImage

Asmita Ramteke

Yesterday   

PostImage

Kamthi News: प्रेमसंबंधातून तरुणीवर लैंगिक अत्याचार


Kamthi News: कामठी: प्रेमसंबंधातून तरुणीसोबत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ब्रेकअपनंतर तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने प्रकरण पोलिसांत पोहोचले आणि पोलिसांनी आरोपीस अटक केली. हा प्रकार कामठी शहरात नुकताच घडला.

शुभम अनिल नितनवरे (22, रा. विदूतबाबानगर, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम व कामठी शहरांतील विदूतबाबा नगरात राहणारी 22 वर्षीय तरुणी पुणे शहरातील खासगी कंपनीत नोकरीला होते. तिथेच त्यांची आपसांत ओळख व पुढे घट्ट मैत्री झाली. त्यामुळे दोघेही काहीकाळ एकाच खोलीत वास्तव्याला होते.

या काळात त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंधही प्रस्थापित केले. शुभमने मोबाइल फोनने तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते तर काही व्हिडीओ क्लिप तयार केल्या होत्या. या प्रेमसंबंधाविषयी दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती होती. मे 2024 मध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे तरुणीच्या भावासोबत शुभमचा वादही उदभवला होता.

दोघेही एकमेकांच्या विरोधात तक्रार नोंद‌विण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, तक्रार दाखल न करता निघून आले. त्यानंतर शुभमने तिचे आक्षेपार्ह फोटो टेलिग्रामवर व्हायरल केले. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 74, आयटी अॅक्ट सहकलम 67, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सचिन यादव व दीप्ती मोटघरे करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ


आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ

 

गडचिरोलीःनक्षलविद्यांनी एका आत्मसमर्पीत नक्षलवाद्याची र्गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा. आरेवाडा, तालुका भामरागड असे त्याचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार जयराम कोमटी गावडे आणि त्याची पत्नी नक्षल चळवळीत सामील होते. मागील सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथेच आपली शेती, मोलमजुरी करीत उदरनिर्वाह करीत होते 25 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी आरेवाडा येथे त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खडबड उडाली आहे.

नुकतेच 17 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगत छत्तीसगड सीमेवरील वांडोली जंगल परिसरात 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात मोठ्या कॅडरच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता. या घटनेला 10 दिवस उलटले नाही तोच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या केली.

विशेष म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलावर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, रस्ते बंद करणे अश्या घटना घडतात मात्र सप्ताहाच्या पूर्वीच भामरागड तालुका मुख्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.


PostImage

Pankaj Lanjewar

Yesterday   

PostImage

विष प्राशन करून वृध्द व्यक्तीची आत्महत्या


नागपूर सावनेर :


सावनेर पोलीस यांच्या माहितीनुसार

 

विषप्राशन करून मृतक:राजुभाउ गजभिये यांनी जीवनयात्रा

संपविली, मूकबधिर शाळेजवळ वॉर्ड no ३ येथील रहिवाशी


पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील घटना


रात्री ११.३० चे दरम्यान


त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. यांनी मृत

 घोषित केले.


टीप......


.रात्रीच वेळी मृतदेह मारचूरी मध्ये घेउन जातांना वाढलेले गवत

धोकादायक बसून येथे रात्री बे रात्री पोलिसांना ambulece

वाले, नातेवाईक, यांचा जीवाला धोका नाकारता येतं नाहीं

अशीच एक घटना काल रात्रीच वेळी राजू गजभिये याचा मृतदेह

 शवाविच्छेदन ब करण्याकरता मृतदेह रात्री ठेवत

असताना,गाडीतून उतरताना गवतावर पाय ठेवला असता,

सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच पायावरून धामण

जातीचा बिनविषारी साप गेला, त्याचं ठिकाणी विषारी साप

असता तर जीवावर बेतली असती, नगरपरिषद प्रशासनाने तिथे

वाढलेला गवत पूर्णपणे साफसफाई करण्यात यावी पुढील

तपास सावनेर पोलीस यंत्रणा करीत आहे

 

 


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले


नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले 


 गडचिरोली - : गडचिरोली जिल्ह्यातील लागुनच असलेल्या नवरगाव येथील नाल्याच्या पुरात वाहून जात असलेल्या तीन इसमास गावकऱ्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करीत वाचविल्याची घटना २५ जुलै रोजी घडली 

गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे चारही बाजुला पुराचा वेढा आहे. त्यामुळे चारही मार्ग बंद आहेत . अश्यातच  चुरचुरा- नवरगांव मार्गावरून नवरगाव च्या पुर्वीच येणारा पुल त्यावर पावसाच्या पाण्यामुळे पुर आलेला होता नवरगाव ला जाण्यासाठी नागपूर वरून येणारे तिन पाहुणे एक महिला, मुलगा व भाचा बाईक वरून नवरगांव पुलावरून पाणी असतांना सुद्धा पुलावर थोडे पाणी आहे आपण सहज पुल ओलांडू शकतो या हेतुने ते तिघेही नवरगाव फुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज चुकला व ते पुढे न जाता पुलाच्या खाली बाईक पडली तर दोघे जुझपाचा आधार घेवुन लटकले तर एकजन पुलावरच मध्यतरी थांबुन कढल्यांला धरून होते.  त्या ठिकाणी चुरचुरा गावकरी पोहचले असता भयावह स्थिती पाहून गडचिरोली पोलिसांना माहीती दिली गडचिरोली पोलीस त्या ठिकाणी पोहचले परंतु हतबल होवून  त्यांना आल्या पावली परत जावे लागले
 आता आप्पती व्यवस्थापन  DDRF पथक जाईल बोट च्या मदतीने त्या तिघांना काढण्याचा प्रयत्न होईल असे वाटत होते. 

मात्र सांयकाळचे ७ वाजले तरीही  काहीच हालचाली दिसत नव्हत्या तेव्हा चुरचुरा येथील अनिल गेडाम व वासुदेव गेडाम यांनी दोरांच्या सहाय्याने सदर स्थळी जावून त्यां निघांना  सुखरूप बाहेर काढले चुरचुरा व नवरगांव चे अख्खे गावकरी त्या ठिकाणी पोहचले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढले 
आता सरकारी यंत्रणा चुरचुरा येथे त्यांना नेवून त्यांची चौकशी करीत आहेत. त्या तिघाचे नाव अजुनही कळले नाहीत


PostImage

Sajit Tekam

Yesterday   

PostImage

Chandrapur News: धक्कादायक ! घरी जाताना अचानक शेतकऱ्यासमोर आला वाघोबा, …


Chandrapur News: सावरगाव : वाघ म्हटले की, मनुष्याच्या अंगात एकदम धडकी भरते. मात्र, प्रत्यक्षात जर वाघ अचानक समोर आला तर नक्कीच बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एका शेतकऱ्यावर असा प्रसंग प्रत्यक्ष ओढवला.

नागभीड तालुक्यातील गोविंदपूर- मांगरूड मार्गावरील मांगरुडजवळील नागमोडी वळणावर शेताकडे आलेल्या व शेतातील कामे आटोपून परत घरी जाणाऱ्या एका शेतकऱ्याला रस्त्याने जात असताना अचानक वाघोबा उभे ठाकले असल्याचे दिसले आणि त्या शेतकऱ्याची पुरती भंबेरीच उडाली. रामदास खानदेवे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून गोविंदपूर येथील तो रहिवासी आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana: 'त्या' शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत 3 महिन्यांत निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

मंगळवार (दि. 22) गोविंदपूर येथील रामदास खानदेवे हा शेतकरी मांगरूड गोविंदपूर मार्गावरील मांगरूड शिवारातील शेतावर सायकलने गेला होता. आणि शेतावरील कामे आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तो आपल्या गोविंदपूर या गावाकडे सायकलने जायला निघाला.

मांगरूड ते गोविंदपूर या मार्गाने नहराच्या समोरील नागमोडी वळणावर जाणार इतक्यातच अचानक वाघोबा जंगलातून रस्त्यावर आले आणि अवघ्या काही अंतरावर दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले. दोघांच्याही मागेपुढे कुणीच नव्हते. काय करावे काय नाही हे त्यांना सुचनासे झाले. प्रत्यक्ष वाघोबाच समोर उभा असल्याने शेतकरी निःशब्द झाला.

हे देखील वाचा : Agriculture: बोगस बियाणे व खतांबाबतची तक्रार करा या WhatsApp नंबर वर, राज्यस्तरावर घेतली जाणार दखल

आता आपल्या जीवाचे काही बरेवाईट होणार असे त्याला वाटत असताना तेवढ्यातच मांगरूडवरून गोविंदपूरकडे जाणारी एसटी आली. वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमारे उभे असल्याचा थरारक प्रसंग चालकाने बघितला. लगेच चालकाने प्रसंगावधान साधत एसटी थांबविली आणि शेतकऱ्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Sanket dhoke

Yesterday   

PostImage

Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर …


Chandrapur :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी, कुठून समोर दिसणार, हे सांगणे अवघडच झालेले आहे. असाच एक काही होते जेंव्हा वाघाचे नाव  ग्रामस्थांचा ऐकतात आणि थरकाप उडतो,  तो अचानक समोर आला तर भीतीने बोलणेही बंद होते. 

असाच काही  प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आलेला आहे. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ आला आणि उभा राहिला. त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली. 

मात्र, त्याच वेळी तिथे ST महामंडळाची बस आली. बसचालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. चालकाने समय सूचकता दाखवत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचविले.

सध्या सर्वत्र मुसळधार, संततधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. गोविंदपूर येथील मंगरूड गावातील शेतामध्ये काम करण्यासाठी रामदास खांदेवे नामक शेतकरी सायकलने गेलेले होते. 

सायंकाळी ५:३० वजताच्या सुमारास काम पूर्ण झाल्यानंतर ते सायकलने गोविंदपूर या गावी परत येत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर खांदेवे यांच्या पुढे अचानक वाघ उभा होता. 

वाघ आणि शेतकरी दोघेही एकमेकांसमोर उभे, दोघांच्याही मागेपुढे कोणीच नव्हते. वाघ पाहून शेतकरी भयभीत झाला. दोघांची नजरानजर झाली. वाघ हालचाल करणारच एवढ्यात ST Bus  त्याच रस्त्याने आली. बसचालक नव्हे तर साक्षात देवदूतच शेतकऱ्यासाठी धाऊन आला.

शेतकरी आणि वाघाची नजर एमेकमेकांवर होती. तेवढ्यात मंगरुडहून गोविंदपूरकडे जाणारी ST Bus तेथे पोहोचली. बस चालकाने समय सूचकता दाखवत तत्काळ बस थांबवून वेळ न घालवता  शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसवले. त्याची सायकलही बसमध्ये घेतली. ST Bus मुळे वाघ लगेच जंगलाच्या दिशेने पळाला.

वाघ समोर असून प्राण वाचवले हा प्रकार शेतकऱ्याला एक जीवदान देणारा ठरला. ST Bus गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला या प्रकारे शेतकऱ्याचे प्राण वोचले. 

वाघाला आपल्या समोर उभा पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. ST Bus चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितला. वाघ आणि शेतकऱ्यामध्ये घडलेल्या या प्रकाराची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.


बिबट्या घरात शिरला अन्…

तळोधी बाळापूर वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) या गावांमध्ये घुसून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने सचिन रतिराम रंदे यांच्या घरात बांधून असलेल्या शेळ्यांवर हल्ला आणि त्यातील एका शेळीला ठार ही केले.

 त्यानंतर बिबट्याने त्यांच्याच घरात ठाण मांडले होते. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल सहा तास प्रयत्न करण्यात आले.

अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल

अधिक वाचा  :- Today Horoscope :- २५ जुलै २०२४ ; सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल

अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

   ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

SOCIAL MOVEMENTS: नाल्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या तिघांचे जीवाचा धोका पत्करून …


 

 शॉर्टकटने ओढवले संकट

पाणी वाहत असताना पुलावरून वाहन टाकू नये-जिल्हाधिकारी यांचे पुन्हा आवाहन*

गडचिरोली दि. २५ : नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना गडचिरोलीहून नागपूरला जाणाऱ्या  तिघांवर प्राण गमावण्याची वेळ आली होती. परंतु ही बाब स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळताच त्यांनी तत्परता दाखवून संबंधित तीघांचे प्राण वाचवले. याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी संबंधित नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे.

आज दिनांक 25 जुलै ला मौजा चुरचुरा माल येथे  चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नालावरील पाणी वाहत असताना नागपूर येथील रहिवासी राहुल किशोर मेंढे वय 32वर्ष, आशा किशोर मेंढे वय 65 व त्याचा भाचा दत्तश्री शरद गोडे वय 12 वर्ष  हे तिघे आपल्या दुचाकीने गडचिरोली वरून नागपूर ला जाताना नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकून काही अंतरावर वाहत गेले. त्याच वेळी त्यांनी गावातील जवळ असलेल्या लोकांना हाक दिल्याने चुरचुरा येथील तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी *यांनी जीवाची पर्वा न करता* त्या तिघांचे प्राण वाचविले. त्यानंतर जिल्हा पथके, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली ची चमू तहसीलदार हेमंत मोहरे, मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्रीमती भुरसे  यांनी त्यांना गावात आणून कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, CHO, आशा स्वयंसेवक, आपदा मित्र, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत  त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना  गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

 ही घटना मौजा  आज सायंकाळच्या सुमारास 7 ते 8 दरम्यान घडली.  यात मोटरसायकल पुरात वाहून गेली आहे.

पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.


PostImage

Sanket dhoke

Yesterday   

PostImage

Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश …


Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल 

मेष :- चंद्र तुमच्या राशीतून बाराव्या भावात असेल. आजचा दिवस अतिशय काळजीपूर्वक खर्च करा. सर्दी, खोकला, ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वतःला वेगळे करतील. दानधर्मात पैसा वाया जाण्याची परिस्थिती राहील.

वृषभ :- आज तुमचे उत्पन्न आणि व्यवसाय वाढेल. व्यवसायात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांसोबत हसण्याचे आणि आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास आणि पर्यटनाची शक्यता आहे

मिथुन :- तुमच्या राशीतून चंद्र दहाव्या भावात असेल. दिवसभर तुमचे शरीर आणि मन प्रसन्न राहील. व्यवसायात कौतुकामुळे कामात उत्साह वाढेल. सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात तुम्हाला सन्मान मिळेल

कर्क :- तुमच्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्र असेल. आज तुम्ही शुभ कार्ये आणि धर्मादाय कार्यात जास्त वेळ घालवाल. प्रवास संभवतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही आनंदी राहाल. भाग्य तुम्हाला साथ देईल. घरामध्ये भाऊ-बहिणींसोबत आनंदाने वेळ घालवाल

सिंह :- चंद्र तुमच्या राशीतून आठव्या भावात असेल. आज आपत्तीचा दिवस आहे. आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. आजारपणावर खर्च होईल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील

कन्या :- चंद्र तुमच्या राशीतून सातव्या भावात असेल. आज तुम्हाला प्रसिद्धी तसेच सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात नफा मिळेल. महिला गटाकडून विशेष लाभ होईल. वैवाहिक जीवनात परम आनंदाचे क्षण अनुभवाल. नवीन कपडे खरेदी आणि वापरण्याची संधी मिळेल. विरुद्ध लिंगी लोकांशी तुमची ओळख होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल.

तूळ :- आजचा दिवस खूप लाभदायक आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करा. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक योजना बनवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

वृश्चिक :- चंद्र तुमच्या राशीतून पाचव्या भावात असेल. आज तुमच्या घरगुती जीवनात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. आरोग्यही चांगले राहील. आजारी व्यक्तीची प्रकृती सुधारेल. कार्यालयातील सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल

धनु :- आज मानसिक ऊर्जा आणि शारीरिक आणि उत्साहाचा अभाव राहील. कौटुंबिक कलह आणि कलहामुळे मनात उदासीनता राहील. निद्रानाशाची समस्या राहील. आईची प्रकृती बिघडेल. सार्वजनिक जीवनात अपमानाची संधी मिळेल. धनहानी होईल.

मकर :- आजचा दिवस आनंदात जाईल. आज काही नवीन काम सुरू करू शकता, परिस्थिती अनुकूल राहिल्यास प्रत्येक काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. भागीदारीतून लाभ होईल. तुमच्या भावा-बहिणींसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. 

कुंभ :- आज तुमच्या द्विधा मनस्थितीमुळे निर्णयक्षमतेची कमतरता जाणवेल. याचे विपरीत परिणाम होतील. निसर्गही सहकार्य करणार नाही. वाणीवर संयम नसल्यामुळे प्रियजनांशी वाद व मतभेद होतील. कामात कमी यश मिळेल

मीन :- आज तुम्ही आनंद, उत्साह आणि आनंद अनुभवाल. नवीन सुरुवात फायदेशीर ठरेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. प्रवास संभवतो. आर्थिक लाभ होईल. सेवाकार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील.

अधिक वाचा :- Today Horoscope :- २५ जुलै २०२४ ; सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल

अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

अधिक वाचा :- Today Horoscope :- २४ जुलै २०२४ ; नए कार्य की योजना बनाने के लिए आज का दिन अनुकूल है

अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

अधिक वाचा :- Chandrapur News :- मुलानेच केली वडिलांची हत्या

अधिक वाचा :- मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवून पोलीस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले

अधिक वाचा  :- SRK ने ४० कोटीचे गिफ्ट तर सलमानने १५ कोटीचे, तर इतर बॉलीवूड स्टार्सनी अनंत अंबानी-राधिका काय गिफ्ट केलं

अधिक वाचा :- Chimur News :- पुरात वाहून गेलेल्या दोन बँक कर्माऱ्यांनी झाडाला अडकून जीव वाचवला

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

   ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.