PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024   

PostImage

'पार्सल'च्या माध्यमातून कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे


 

 निवडणूकीच्या निमित्ताने कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे होण्याची चर्चा झिरपल्यामुळे विविध यंत्रणांनी रेल्वेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या पार्सल विभागावर नजर रोखली आहे.

 

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

 

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतसा सर्वत्र मुक्त हस्ते पैसा उधळला जातो. खास करून मोठ्या प्रमाणात काळा पैसा (ब्लॅक मनी) मोठ्या प्रमाणात बाहेर काढला जातो. या पैशाचा वापर दारू, खाणे-पिणे, वाहने तसेच अन्य सोयी सुविधा खरेदीसाठी केला जातो. ते लक्षात घेता मतदान प्रक्रियेतील गैरप्रकाराला आळा घालणाऱ्या ठिकठिकाणच्या निवडणूक यंत्रणांसह पोलिसांनी प्रत्येक नाके आणि शहराला जोडणाऱ्या दुसऱ्या गावांच्या सिमांवर विविध वाहनांची तपासणी चालविली आहे. खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी मोठी रोकडही पकडण्यात आली आहे. पुढच्या काही तासात बसेसचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. हे सर्व लक्षात घेऊन मोठ्या रकमेची हेर-फेर करणाऱ्यांनी रेल्वेकडे नजर वळविली आहे.

 

विशेष म्हणजे, नागपुरात अशा प्रकारे कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर केल्या जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. कुरियर मॅन म्हणून काम करणारांच्या हातात मोठ्या रकमेचे पार्सल देऊन ते रेल्वे किंवा बसने पाहिजे त्या ठिकाणी पाठविण्यात येते. अनेकदा रेल्वेने वेगवेगळ्या बॉक्समध्ये, पिंपामध्येही लाखोंची रोकड भरूनही ती ईकडून तिकडे पाठविली जाते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या माणसांपर्यंत अशाच प्रकारे रक्कम पाठविण्यात येत असल्याची कुणकुण लागल्याने रेल्वे पोलिसांसह सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी नागपूर स्थानकावरील पार्सल विभागाची पाहणीही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना, आदेश देण्यात आले आहे.

 

अशीही क्लृप्ती !

रोकड पकडली जाऊ नये, फारशी तपासणी होऊ नये म्हणून संबंधितांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. मिठाईचे किंवा चॉकलेटचे बॉक्समध्ये लाखोंची रोकड घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविली जाते. आता मात्र औषधांच्या बॉक्समध्ये रोकड घालून ती संबंधितांपर्यंत पोहचविण्याची क्लृप्ती संबंधितांनी अवलंबिली असल्याची चर्चा वजा माहिती आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024   

PostImage

दोन बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले


 एएचटीयूने मध्यप्रदेशातून केली आरोपींना अटक

 

नागपूर : शहरातील निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामावर आलेल्या दोन तरुणांनी मित्राच्या दोन्ही बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरी कुणी नसताना दोघींनाही मध्यप्रदेशात पळवून नेले. 

 

लग्न करून संसार थाटण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे शाखेने चौघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देवा चेतराम गोस्वामी (२४) आणि राजू बल्लू गोस्वामी (२०) अशी आरोपींची नावे आहेत.

 

पीडित १७ आणि १९ वर्षीय तरुणी एकमेकींच्या चुलत बहिणी आहेत. त्यांचा भाऊ नागपुरातील निर्माणाधीन इमारतीवर मजुरी करतो. महिन्याभरापूर्वी दोघीही बहिणी भावाकडे राहायला आल्या होत्या.

भावाच्या सोबत बांधकामावर काम करणारे भावाचे मित्र राजू आणि देवा हे घरी येत होते. यादरम्यान दोन्ही बहिणीवर त्यांची नजर गेली. दोघांनीही त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे ठरविले. त्यामुळे मित्र घरी नसतानाही राजू आणि देवा घरी येऊन त्या तरुणींशी गप्पा करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत होते. महिन्याभरात दोन्ही बहिणी देवा आणि राजूच्या प्रेमात आकंठ बुडाल्या. चौघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. २१ फेब्रुवारीला मध्यप्रदेश-शिवनीमध्ये पळून जाऊन लग्न करण्याचे ठरले. नियोजनाप्रमाणे दोघीही बहिणी औषधी आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या. त्यांना पळून जाण्यासाठी मोहन चेतराम गोस्वामी (२०), मोंन्टी बल्लू गोस्वामी (२०) या दोघांनी मदत केली. दोन्हीं मुलींना राजू आणि देवाने पळवून शिवनी शहरात नेले. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

मारो सालो को, खतम करो म्हणत पोलिसांवर प्राणघातक हल्ला, 10 …


 

 

 

 

सत्र न्यायालयाचा निर्णय : एकूण ६५ हजार रुपये दंडही ठोठावला

 

नागपूर : कोंढाळी पोलिसांवर घातक हल्ला करणाऱ्या सर्व दहा आरोपींना गुरुवारी दोन वर्षे सहा महिने कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली व एकूण ६५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल भोसले यांनी हा निर्णय दिला.

 

आरोपींमध्ये शेख शरीफ शेख अझीझ, सरफराज शेख जब्बार शेख, शेख इकबाल शेख सत्तार, शेख जाहीद शेख समदानी, मो. सईद शेख अझीझ, शेख राशीद शेख अझीझ, शेख मुख्तार शेख सत्तार, सलमान शेख गफार शेख, सूरज ऊर्फ भोदू रमेश राऊत व शेख गफार शेख भुरू यांचा समावेश आहे. वर्धा रोडवरील सायखोड वस्तीमध्ये अवैध दारूचा साठा असल्याची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळाली

 

होती. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पवन भांबुरकर व त्यांचे सहकारी १६ मे २०१८ रोजी शहानिशा करण्यासाठी सायखोड वस्तीमध्ये गेले असता आरोपींनी त्यांना घेरून लाठ्या व दगडांनी घातक हल्ला केला. दरम्यान, आरोपी मारो सालो को, खतम करो, असे ओरडत होते. सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहीरकर यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. एल. बी. शेंदरे यांनी कामकाज पाहिले.

 

अशी आहे पूर्ण शिक्षा

 

• प्रत्येकाला भादंवि कलम १४३ अंतर्गत तीन महिने सश्रम कारावास.

 

• कलम 147 अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड.

 

• कलम १४८ अंतर्गत एक वर्ष सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड.

 

• कलम ३५३ अंतर्गत दोन वर्षे सहा महिने कारावास व तीन हजार रुपये दंड.

 

• कलम ३२३ अंतर्गत सहा महिने कारावास व ५०० रुपये दंड.

 

• कलम ३३२ अंतर्गत एक वर्ष सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड,

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024   

PostImage

Nagpur news: घराला भीषण आग; 2 चिमुकले जिवंत जळाले


बहीण थोडक्यात बचावली, परिसरात खळबळ

नागपूर. घराला आग लागल्याने दोन चिमुकले जिवंत जळाले. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत घडली. घटनेच्या वेळी मुलांची मोठी बहीणही तेथे होती, मात्र तिने वेळीच घरातून बाहेर पळ काढल्याने थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह गिट्टीखदान पोलिस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. दोन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत दोन्ही चिमुक्ल्यांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. देवांश रंजीत उईके (7) आणि प्रभास रंजीत उईके (2) रा. गौरखेडे कॉम्प्लेक्ससमोर, सेमिनरी हिल्स, अशी होरपळलेल्या मुलांची नावे आहेत. आमदार विकास ठाकरे आणि कमलेश चौधरी यांनीही घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती मिळाली आहे.

 

रंजीत आणि दीपाली उईके तीन मुलांसह सेमिनरी हिल्स परिसरात गौरखेडे कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. त्यांना देवांश आणि प्रभास अशी मुले आणि एक 11 वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास तिन्ही मुले घरात खेळत होती. वडील कामावरून परतायचे होते, तर आई शेजारच्या घरी गेली होती. देवांश आणि प्रभास आतल्या खोलीत कुत्र्यासोबत खेळत होते तर मुलगी बाहेरच्या खोलीत होती. या दरम्यान अचानक घराला आग लागली. मुलीने आरडा-ओरड करीत बाहेर पळ काढला. मात्र दोन्ही मुले आतल्या खोलीत असल्याने अडकून पडली. त्यांना निघताच आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

 

आगीचे कारण अस्पष्ट

 या घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश सागडे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनी घटनेची सूचना अग्निशमन विभागाला दिली. विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दोन्ही मुलांचे जळून खाक झालेले मृतदेहच बाहेर काढण्यात आले. या आगीत कुत्र्याचाही होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून परिसरात कुणी सिलिंडर लिकेज तर कुणी शेकोटीमुळे आग लागल्याचे सांगत होते.

 

 

 

 


PostImage

Rameshmohurle

Jan. 19, 2024   

PostImage

Nagpur News : घर में आग लगने से दो मासूम …


NAGPUR : मिट्टी के घर में आग लगने से दो मासूम सगे भाइयों की जलकर मौत हो गई. यह दुर्भाग्यपूर्ण घटना गुरुवार रात करीब 10 बजे हजारीपहाड़, सेमिनरी हिल्स इलाके के गोविंद गौरखेड़े कॉम्प्लेक्स में हुई।जब घर में आग लगी तो उसकी बड़ी बहन भी वहीं थी। उनकी जान तो बच गई लेकिन दोनों मासूम भाइयों की आंखें हमेशा के लिए बंद हो गईं। इस घटना से इलाके में सनसनी फैल गयी है.

मृतक भाइयों  के नाम देवांश रंजीत उइके (7) और प्रभास उइके (3) हैं। वह अपनी मां दीपाली के साथ मिट्टी के घर में रहते थे। उनका एक बड़ा भाई और 10 साल की बहन भी है। मां दीपाली काम से बाहर गई थी। प्राप्त जानकारी के अनुसार रात में ठंड होने के कारण बच्चों ने घर में आग जलायी. लेकिन उसकी वजह से घर में आग लग गयी. देखते ही देखते आग पूरे घर में फैल गई। घर बस्ती से थोड़ी दूर होने के कारण लोगों को बच्चों की चीख भी नहीं सुनाई दी। उसकी बहन भागने में सफल रही. लेकिन देवांश और प्रभास आग के चपेट में चपेट में आनेसे दोनों मासूम भाइयों की मौत हो गई 

👉 ऐसी जानकारी जानने के लिए व्हाट्सएप ग्रुप से जुड़ने के लिए यहां क्लिक करें 👈

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024   

PostImage

भर धाव येणारी कार दुभाजकावर आदळली.! कार चालक व महीला …


नागपूर:-

 नागपूर-अमरावती मार्गावरील  आठवा मैल भागात दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यात, कार चालक व एक महिला मृत्युमुखी पडले असून, मागच्या सीटवर बसलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातग्रस्त कारमधील कुटूंब अंजनगाव सुर्जी येथील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 
ही कार अमरावतीच्या दिशेने जात असताना अती वेगात असल्याने रस्ता दुभाजकावर धडकली व अनियंत्रीत होऊन नागपूर दिशेला जाणाऱ्या मार्गावर पलटली. 
तेव्हाच नागपूरकडे जात असणाऱ्या एका ट्रॅकवर ती धडकली. यात कारचालक व एक महिला समोरच्या सीटवर असल्याने जागीच मृत झाले. मागील सीटवर असणारी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. गाडी पूर्णपणे चकनाचूर झाली असून, स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे.  


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024   

PostImage

नव्या कायद्याविरोधात विदर्भात ट्रक व ट्रँकरचालकांचे बंद आंदोलन.!


नागपुर:-केंद्राच्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यातील ट्रक आणि टँकर चालकांनी अनिश्चितकालीन संप पुकारला असून त्याच फटका सर्वसामान्यांना बसला. त्यामुळे राज्य सरकारला महसूलावर पाणी सोडावे लागले तर कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.
ट्रकचालकांनी घोषणाबाजी करीत कायदा रद्द करण्याची मागणी केली. आंदोलन मंगळवारीही सुरू राहणार आहे.

ट्रकचालकांनी नागपूर सीमेच्या चारही बाजूच्या महामार्गावर ट्रक आडवे ठेवल्याने वाहतूक खोळंबली. जिल्हाधिकाऱ्यांनी जागेवर येऊन आमचे म्हणणे ऐकावे, अशी ट्रकचालकांची मागणी होती. आंदोलनामुळे विदर्भातील जवळपास १५ हजार ट्रक आणि ट्रँकर जागेवरच उभे राहिले. वेळेवर न पोहोचल्याने काही जणांची रेल्वे आणि विमाने सुटल्याची माहिती आहे.

राज्यात निर्माण होणार पेट्रोल व डिझेलचा तुटवडा
टँकर चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंदोलनात बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडिया ऑईल या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांच्या टँकर चालकांचा समावेश आहे. राज्याच्या विविध भागात टँकर बाहेर न पडल्याने इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला. टँकर चालकांचा संप लवकर मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा होण्यास अडचणी येऊ शकतात.

आंदोलकांनी ट्रक रस्त्यावर केले आडवे
सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचे पाहून ट्रकचालकांनी नागपुरात दुपारनंतर ट्रक महामार्गावर आडवे ठेवल्याने अनेक तास वाहतुकीचा खोळंबा झाला. हे ट्रक अनेक तास महामार्गावर आडवे उभे होते. त्यामुळे शहरी आणि शहराबाहेरील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. शिवाय शहरी आपली बस सेवेलाही फटका बसला. प्रवाशांना ऑटोने शहरात यावे लागले. अशी स्थिती सायंकाळपर्यंत होती. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक व्यवस्था हळूहळू पूर्ववत झाली.

ट्रकचालकाला जबाबदार धरले जाणार

नव्या मोटार वाहन कायद्यामध्ये अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रकचालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रकरणी ट्रक चालकांना १० वर्षांची शिक्षा आणि ७.५ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. या तरतुदीला देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध करून संप पुकारला. या कठोर कायद्यामुळे ट्रकचालक अडचणीत येणार आहे. चूक नसतानाही त्यांना जेलमध्ये जावे लागेल. सध्या ही तरतूद असली तरीही पुढे कायद्याचे स्वरूप आल्यास ट्रकचालकासह कारचालकही अडचणीत येतील. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा.
कुक्कू मारवाह, अध्यक्ष, नागपूर ट्रक ओनर्स असोसिएशन.